बुंदी रायता हा पदार्थ कितीही खा कमीच वाटतो. चवीला अगदी मस्त लागतो. (How to make masala bundi for raita? A very easy recipe to make crispy bundi)मात्र बुंदी आपण कायम विकतच आणतो. पण तुम्हाला माहिती आहे का? घरी बुंदी करणे फारच सोपे आहे.अगदी कमी पदार्थात करता येते. घरी तिखट बुंदी करणेही अगदी सोपे आहे. तिखट बुंदी असेल तर खायला आणखी मज्जा येते. पाहा कशी करायची.
साहित्य
बेसन, पाणी, लाल तिखट, काळी मिरी पूड, चाट मसाला, मीठ, हळद, तेल
कृती
१. बेसन मस्त चाळून घ्यायचे. चाळलेले बेसना एका खोलगट पातेल्यात घ्यायचे. त्यात पाणी घालायचे आणि मस्त
ढवळायचे. बेसन आणि पाणी एकजीव व्हायला हवे. त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची कालजी घ्यायची. छान ढवळायचे. त्यात थोडे मीठ घालायचे. (How to make masala bundi for raita? A very easy recipe to make crispy bundi)चमचाभर हळद घालायची. मीठ हळद नाही घातले तरी चालते. रंग जास्त पिवळा व्हावा यासाठी हळद घालायची. तसेच मीठ आत नाही घातले तरी चालते तसेच वरतूनही घालता येते. त्यामुळे मीठ व हळद नाही घातले तरी चालते.
२. छान पातळ मिश्रण तयार केल्यावर त्यात चमचाभर गरम तेल घालायचे. व्यवस्थित ढवळायचे. गरम तेलामुळे गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे नीट ढवळायचे. कढईत तेल गरम करत ठेवायचे. तेल छान तापल्यावर बुंदी करायचे यंत्र वापरुन बुंदी पाडा. यंत्र नसेल तरी काही हरकत नाही तळणीसाठी जो झारा वापरता त्याचा उपयोग करायचा आणि मस्त बुंदी पाडायची. छान कुरकुरीत होऊ द्यायची. पिवळी होईपर्यंत तळायची.
३. काढून घ्यायची मग थोडावेळ तेल तिथळत ठेवायचे. जाळीवर घालून ठेवा. नंतर त्यावर मीठ घाला. लाल तिखट घाला आणि थोडी मिरी पूड घालायची. तेसच चाट मसाला घालायचा. नाही घातला तरी हरकत नाही. सगळे मसाले बुंदीला नीट लागतील याची काळजी घ्यायची. छान मिक्स झाल्यावर हवाबंद डब्यात काढून ठेवायची.
इतर पदार्थ न वापरता फक्त बेसन, मीठ व लाल तिखट घेतले तरी बुंदी अगदी चविष्टच होते.