सध्या लग्नसराई सुरू आहे. अशामध्ये जर गावाकडच्या लग्नाच्या पंगतीमध्ये जाण्याचा योग आलाच तर त्या पंगतीमध्ये मसालेभात आवर्जून वाढला जातो. शिवाय शहरात किंवा ग्रामीण भागातही जे भंडाऱ्याचे कार्यक्रम होतात, त्यातही मसालेभात असतोच. हा मसालेभात एवढा चवदार असतो की त्यामुळे आपण दोन घास नक्कीच जास्त जेवतो. तुम्हीही त्या मसालेभाताचे चाहते असाल आणि त्याच चवीचा मसालेभात तुम्हाला तुमच्या घरी करून खायचा असेल तर पुढे सांगितलेली एक रेसिपी नक्की ट्राय करून पाहा (how to make masala bhat at home?). अगदी मोजक्या पदार्थांमध्ये उत्तम चवीचा मसालेभात करता येतो...(simple and easy recipe of masale bhat)
मसाले भात रेसिपी
साहित्य
१ वाटी तांदूळ
१ मध्यम आकाराचा कांदा, बटाटा, टोमॅटो
१ चमचा आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट
अर्धी वाटी फ्लॉवर आणि पाव वाटी मटार आणि मटार
चवीनुसार मीठ, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला
१ वाटी दही
फोडणीसाठी तेल, जिरे, कडिपत्ता
कृती
सगळ्यात आधी तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर ते अर्ध्या तासासाठी भिजत ठेवा. यानंतर कुकरमध्ये किंवा कढईमध्ये फोडणी करून घ्या.
फोडणी झाल्यानंतर कांदा, बटाटा, फ्लॉवर, मटार, गाजर अशा सगळ्या भाज्या परतून घ्या. भाज्या खूप जास्त परतू नयेत. भाज्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण, मिरची पेस्ट घाला आणि ती देखील परतून घ्या.
त्वचेची काळजी घेण्यासाठी फक्त ४ सोप्या टिप्स, ना पिंपल्स येतील ना सुरकुत्या... करून पाहा
आता परतलेल्या भाज्यांमध्ये दही आणि बाजारात विकत मिळणारा बिर्याणी मसाला घाला. कढईवर झाकण ठेवून दह्यामध्ये भाज्या ५ ते ७ मिनिटे वाफवून घ्या.
यानंतर भिजलेला तांदूळ कढईमध्ये घाला. गरम पाणी घाला आणि चवीनुसार मीठ, गरम मसाला घालून भात शिजवून घ्या. या भाताची चव अगदी पंगतीमधे मिळते तशा मसालेभातासारखीच लागेल. ट्राय करून पाहा.
