उन्हाळा म्हटलं की, आंब्याचा सिझन आठवतो. या ऋतूंत प्रत्येकाच्याच घरात हमखास आंब्यांची गोडसर चव आणि सुगंध दरवळू लागतो. आंब्याचा सुगंध, गोडसर रस आणि तोंडात विरघळणारी चव मन मोहून टाकते आणि कायम जिभेवर रेंगाळत राहते. उन्हाळ्यात आपण घरी आंब्याची पेटी (How to Make Mango Yogurt at Home) आणली की आंबे (Aam Doi) खाऊन फस्त करतो, एवढंच नाही तर आंब्याच्या रसाचे अनेक चविष्ट पदार्थ घरोघरी केले जातात. आंब्याच्या पदार्थांच्या (Sweet Yogurt, Mishti Doi Recipe) यादीतील एक खास आणि पारंपरिक बंगाली मिठाई म्हणजे 'आम दोही'(EASIEST AAM DOI RECIPE TO TRY AT HOME).
बंगालच्या गोड पदार्थांची एक खास ओळख आणि चव आहे आणि 'मिष्टी दोही' हा त्यातीलच एक लोकप्रिय प्रकार. याच गोड दहीला आंब्याची चव देऊन तयार केलं जातं 'आम दोही' जे अगदी मऊ, गोडसर आणि ताज्या आंब्याचा रस वापरुन तयार केलेलं असत. बंगाली पारंपरिक चवीचं 'आम दोही' करायला सोपं आणि सण, पार्टी किंवा गोड खायची इच्छा झाली की अगदी घरच्याघरीच सहज तयार करता येते. आंब्याच्या सिझनचा आनंद द्विगुणित करणाऱ्या या 'आम दोही' (Bangoli Aam Doi) पारंपरिक बंगाली डेझर्टची रेसिपी पाहूयात...
साहित्य :-
१. फुल फॅट आणि क्रीम असलेले दूध - १ लिटर
२. साखर - १ टेबलस्पून
३. आंब्याचा पल्प - १ कप
४. फ्रेश क्रीम - २ ते ३ टेबलस्पून
५. दही - ३ ते ४ टेबलस्पून
गरमागरम चहा पिण्याची तलफ आता भागवा कधीही, कुठेही! पाहा २ मिनिटांत ‘चहा’ची भन्नाट आयडिया...
शिळ्या पोळ्या आणि डाळीचे डोसे? विश्वास नाही बसणार पण ‘असे’ डोसे करुन पाहा, कोंड्याचा मांडा...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यात दूध घेऊन ते दूध मंद आचेवर गरम करून घ्यावे. दूध मंद आचेवर ठेवूनच थोडेसे आटवून घट्ट - दाटसर करावे.(समजा जर आपण १ लिटर दूध घेतले आहे तर ते आटवून ७०० मि. ली इतके करावे.) दूध आटवून झाल्यावर ते थोडे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यावे.
२. आता एक आंबा घेऊन त्याचे लहान - लहान तुकडे करून घ्यावेत. मिक्सरच्या मोठ्या भांड्यात हे लहान तुकडे घेऊन त्यात थोडे फ्रेश क्रीम घालावे. आता हे दोन्ही जिन्नस एकत्रितपणे मिक्सर मध्ये वाटून त्याची त्याचा पल्प तयार करून घ्यावा.
३. आता आटवून थोडे थंड केलेल्या दुधात आंब्याचा पल्प घालूंन तो व्यवस्थित मिसळवून घ्यावा.
एका मिनिटांत काढा किलोभर भाजलेल्या शेंगदाण्याची टरफलं! रणबीर ब्रारची पाहा १ भन्नाट ट्रिक...
४. त्यानंतर एक मातीच भांड घेऊन त्याच्या आत संपूर्ण भांड्याला चमचाभर दही व्यवस्थित पसरवून लावावे. याचबरोबर थोडेसे दही आटवून घेतलेल्या दुधात देखील घालावे. आता सगळे मिश्रण एकजीव करून दही लावलेल्या मातीच्या भांडयात ओतून घ्यावे.
५. मातीच भांडं झाकून ५ ते ७ तासांसाठी एका उबदार जागेत तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर दही थोडे थंड होण्यासाठी आपण फ्रिजमध्ये देखील ठेवू शकता.
६. दही फ्रिजमध्ये ठेवून व्यवस्थित सेट झाल्यावर बंगाली पद्धतीचं 'आम दोही' सर्व्ह करताना त्यावर आंब्याचे तुकडे पसरवून घालावेत.
अशाप्रकारे आपण घरच्याघरीच बंगाली पद्धतीचं 'आम दोही' अगदी झटपट तयार करू शकता. नेहमीचे तेच ते दही खाण्यापेक्षा आपण आंब्याच्या सिझनमध्ये मस्त आंबट - गोड चवीचं घट्ट - दाटसर दही चवीने खाऊ शकता.