Join us

रवा आणि आंब्याचा सुपरस्पाँजी मँगो केक! मुलांना सुटीत द्या मस्त ट्रिट, घ्या अगदी सोपी रेसिपी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2025 16:19 IST

How To Make Mango Rava Cake: सध्या आंब्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे हा मस्त, चवदार मँगो केक एकदा करून बघाच..(summer special mango cake recipe)

ठळक मुद्देमुलांसकट घरातल्या मोठ्या माणसांनाही खूप आवडेल..

केक हा लहान मुलांच्या अतिशय आवडीचा पदार्थ. काही तुरळक अपवाद सोडले तर आंबा आणि केक हे दोन्ही पदार्थ पाहून बच्चे कंपनी एकदम खुश होऊन जाते. म्हणूनच आता मुलांच्या आवडीचे हे दोन्ही पदार्थ एकत्र आणा आणि मुलांसाठी घरच्याघरी मस्त मँगो केक करा. आंब्याचा हंगाम आता फक्त एवढाच महिना आहे. त्यामुळे अस्सल आमरस वापरून तयार केलेला हा चवदार केक एकदा खाऊन बघाच (summer special mango cake recipe).. मुलांसकट घरातल्या मोठ्या माणसांनाही खूप आवडेल (sooji cake recipe). लगेचच पाहून घ्या ही एकदम सोपी रेसिपी..(how to make mango rava cake?)

आंब्याचा केक कसा करावा?

 

साहित्य

१ वाटी आंब्याचा रस

१ वाटी रवा

अर्धी वाटी मैदा

दिड वाटी दूध

केसांना लावा टोमॅटो हेअर मास्क! डोक्यातला कोंडा कमी होऊन केस होतील मुलायम, सिल्की

अर्धी वाटी पिठीसाखर

पाऊण वाटी तेल

दिड टीस्पून बेकिंग पावडर

पाव टीस्पून बेकिंग सोडा

चिमूटभर मीठ

 

कृती 

सगळ्यात आधी एका आंब्याचा रस काढून घ्या. तसेच रवा मिक्सरमधून फिरवून त्याची बारीक पावडर करून घ्या.

त्यानंतर आंब्याच रस आणि रवा एका भांड्यात काढा आणि त्यामध्ये दूध घालून मिश्रण फेटून घ्या. मिश्रणामध्ये कुठेही गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्या. यानंतर भांड्यावर झाकण ठेवून मिश्रण १० ते १५ मिनिटे सेट होऊ द्या.

कोण म्हणतं विकतसारखं आईस्क्रिम घरी होत नाही? घ्या सोपी रेसिपी- आईस्क्रिम होईल सॉफ्ट चवदार

१५ मिनिटांनंतर मैदा, पिठीसाखर चाळणीने चाळून घ्या आणि ती रवा आणि आंब्याचा रस यांच्या एकत्रित केलेल्या मिश्रणामध्ये घाला.

यानंतर त्या मिश्रणात तेल घालावे. केक तयार करण्यासाठी कोणतेही उग्र वासाचे तेल वापरू नये. दूध घालून सगळे पदार्थ एकत्र केल्यानंतर पुन्हा ७ ते ८ मिनिटे मिश्रण हलवावे.

 

यानंतर ज्या भांड्यामध्ये केक करायचा आहे त्या भांड्याच्या तळाशी थोडे मीठ घाला. त्यावर थोडी उंच वाटी किंवा छोटे स्टॅण्ड ठेवा. भांड्यावर झाकण ठेवा आणि १० मिनिटे मंद आचेवर ते प्री हिट होण्यासाठी ठेवून द्या.

फक्त १ चमचा खोबऱ्याची चटणी रोज जेवणात खा- मिळतील ७ जबरदस्त फायदे

तोपर्यंत ज्या भांड्यात केक लावायचा आहे त्या भांड्याला ग्रिसींग करून घ्या आणि त्यामध्ये केकचे बॅटर ओतून ते मंद आचेवर २५ मिनिटे बेक होण्यासाठी ठेवून द्या. २५ ते ३० मिनिटांनंतर केक छान तयार झाला असेल. असा हा मँगो आणि रवा केक कसा करायचा याची रेसिपी Pallavi's Marathi Kitchen या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.समर स्पेशलआंबा