Lokmat Sakhi >Food > ताज्या-कच्च्या कैरीची झणझणीत आमटी, फक्त १० मिनिटांत करा मस्त पारंपरिक मालवणी पदार्थ

ताज्या-कच्च्या कैरीची झणझणीत आमटी, फक्त १० मिनिटांत करा मस्त पारंपरिक मालवणी पदार्थ

Malvani Aamti Recipe: Traditional Raw Mango Curry: Kacchya Karichi Amti Recipe: Authentic Malvani Cuisine: Raw Mango Amti Maharashtra: Kairichi Amti Recipe: Summer Special Raw Mango Curry: मालवणी भागात बनवली जाणारी कच्चा कैरीच्या आमटीला तोराची आमटी म्हणूनही ओळखले जाते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2025 10:47 IST2025-04-02T10:47:14+5:302025-04-02T10:47:49+5:30

Malvani Aamti Recipe: Traditional Raw Mango Curry: Kacchya Karichi Amti Recipe: Authentic Malvani Cuisine: Raw Mango Amti Maharashtra: Kairichi Amti Recipe: Summer Special Raw Mango Curry: मालवणी भागात बनवली जाणारी कच्चा कैरीच्या आमटीला तोराची आमटी म्हणूनही ओळखले जाते.

how to make malavni style traditional authentic raw mango amati kacchya karichi aamti recipe | ताज्या-कच्च्या कैरीची झणझणीत आमटी, फक्त १० मिनिटांत करा मस्त पारंपरिक मालवणी पदार्थ

ताज्या-कच्च्या कैरीची झणझणीत आमटी, फक्त १० मिनिटांत करा मस्त पारंपरिक मालवणी पदार्थ

उन्हाळा म्हटलं की वाळवणाच्या पदार्थांची पर्वणीच असते. या काळात अनेक फळांची चव चाखायला मिळते.(Malvani Aamti Recipe) रसाळ आंबे आणि कच्च्या कैरीच्या अनेक पदार्थांची चव आपल्याला चाखायला मिळते. उन्हाळ्यात डिहायड्रेशनच्या समस्या अधिक होतात त्यामुळे आपण सतत पाणी पितो. त्यामुळे रसाळ फळे अधिक खातो. (Traditional Raw Mango Curry:)
उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला सर्वत्र कैरी पाहायला मिळते. कैरीचे लोणचे, मुंरबा, छुंदा, चटणी, पन्ह यांसारख्या पदार्थांची चव चाखता येते.(Kacchya Karichi Amti Recipe) परंतु, मालवणमध्ये कैच्च्या कैरीची आमटी उन्हाळ्यात बनवली जाते. मालवणी भागातील हा पारंपरिक पदार्थ आहे.(Authentic Malvani Cuisine) प्रामुख्याने या भागात आपल्याला मासांहारी पदार्थांची चव चाखायला मिळते. पण इथे आंबेडाळ, ओल्या काजूची उसळ, सोलकढी, धोंडस, मालवणी मसाला आणि मालवणी थाळीला विशेष असे महत्त्व आहे. मालवणी भागात बनवली जाणारी कच्चा कैरीच्या आमटीला  तोराची आमटी म्हणूनही ओळखले जाते. चव इतकी भारी लागते की, एखादी पोळी जास्तीच खाल. (Raw Mango Amti Maharashtra)

ऑफिसच्या डबा होईल टेस्टी, करा चमचमीत चना मसाला! रस्सा दाट आणि चव झणझणीत

साहित्य:

कैरी - १ 
ओले खोबरे - अर्धा कप 
आले - १ इंच
लसूण - ४-५ पाकळ्या 
धणे - १ चमचा
हिरव्या मिरच्या - ३ ते ४ 
कांदा - १ मोठा 
कडीपत्ता - 
मोहरी - १ चमचा
हळद - १ चमचा
मीठ - चवीनुसार
तेल - आवश्यकतेनुसार 
पाणी

https://www.instagram.com/reel/DHdUbr8iv2h/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

कृती:

1. सगळ्यात आधी कैरी कापून तिचे तुकडे करुन घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात खोबरं, आले लसुण, कांदा, हिरव्या मिरच्या, धणे आणि कापलेली कैरीच्या फोडी पाणी घालून वाटून घ्या. 

2. कढईमध्ये तेल तापवून त्यात मोहरी, लसूण, कडीपत्ता घालून तयार वाटण चांगले परतवून घ्या. 

3. वरुन पाणी, मीठ आणि हळद घालून ५ मिनिटे आमटी शिजवा. हवे असल्यास आपण यात कैरीच्या फोडी देखील घालू शकतो. 

 

 

Web Title: how to make malavni style traditional authentic raw mango amati kacchya karichi aamti recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.