गोकुळाष्टमी आता अवघ्या काही दिवसांवरच आली आहे. सगळ्यांच्याच घरोघरी गोकुळाष्टमीच्या निमित्ताने तयारी सुरु झाली असेल. या दिवशी खास लाडक्या बाळकृष्णाचा आवडता पदार्थ म्हणजे 'माखन मिश्री' घरोघर तयार केला जातो. गोकुळाष्टमीचा सण माखन मिश्रीशिवाय अपूर्णच आहे. कृष्णाला लोणी खायला (makhan mishri for lord krishna) खूपच आवडत असल्याने या दिवशी खास(makhan mishri prasad recipe)कृष्णाला लोणी आणि खडीसाखर यांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा (How to make makhan mishri) आहे. गोकुळात कृष्ण आपल्या मित्रांसोबत लोणी चोरून खायचा, म्हणून त्याला 'माखनचोर' असेही म्हणतात. आजही अनेक घरांमध्ये गोकुळाष्टमीला माखन मिश्रीचा नैवेद्य दाखवून हा दिवस साजरा केला जातो(janmashtami special sweet easy makhan mishri at home).
घरात तयार केलेली ताजी माखन मिश्री चवीला तर अप्रतिम लागतेच, पण ती तयार करण्याची प्रक्रिया देखील खूप सोपी आहे. सध्याच्या धावपळीच्या आणि बिझी लाईफस्टाईलमध्ये घरच्याघरीच लोणी, साजूक तूप तयार करण्याचे असे वेळखाऊ किचकट काम फार कमी जणी करतात. खरंतर, लोणी, साजूक तूप तयार करण्यासाठी फार वेळ आणि खूप (makhan mishri for lord krishna) मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते. यासाठीच, काही घरात लोणी, साजूक तूप चक्क बाजारांतून विकत आणलं जातं. गोकुळाष्टमी निमित्ताने 'माखन मिश्री' चा नैवेद्य करायचा असेल तर, बाजारांतील लोणी विकत न आणता सहज घरच्याघरीच इन्स्टंट पद्धतीने लोणी काढून 'माखन मिश्री' कशी तयार करायची याची सोपी रेसिपी पाहा...
इन्स्टंट माखन मिश्री तयार करण्याची सोपी रेसिपी...
इन्स्टंट माखन मिश्री तयार करण्यासाठी आपल्याला २ ते ३ टेबलस्पून साजूक तूप, ५ ते ६ बर्फाचे खडे, १ टेबलस्पून खडीसाखर, १० ते १२ केशर काड्या इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
तोंडात टाकताच विरघळणारे कापसाहून हलके गुलाबजाम करा घरीच! ६ टिप्स-विकतचे गुलाबजाम विसरुन जाल...
ना रवी-ना भांडं-मिक्सरमध्ये काढा लोण्याचा गोळा! रवाळ तूप करण्याची पाहा ही भन्नाट ट्रिक...
कृती :-
१. एक मोठा बाऊल घेऊन त्यात २ ते ३ टेबलस्पून साजूक तूप घालावे. मग त्यात ५ ते ६ बर्फाचे खडे घालावेत. यासोबतच, यात केशर काड्या देखील घालाव्यात. २. मग हाताने हे मिश्रण फेटून त्याचे घट्ट व दाटसर लोणी तयार होईपर्यंत फेटून घ्यावे. ३. लोणी तयार झाल्यानंतर त्यातील जास्तीचे पाणी निथळून घ्यावे. बर्फाचे खडे काढावेत. मग त्यात साखर किंवा खडीसाखर घालावी. आता पुन्हा एकदा हाताने फेटून घ्यावे. साखर संपूर्णपणे त्यात विरघळवून घ्यावी. ४. तयार लोणी एका बाऊलमध्ये काढून त्यावर केशर काड्या व खडीसाखरेचे दाणे घालून माखन मिश्रीचा नैवेद्य बाळकृष्णाला दाखवण्यासाठी तयार आहे.