सकाळच्या नाश्त्यात बऱ्याचजणांना इडली, डोसा, मेदू वडा यांसारखे साऊथ इंडियन पदार्थ खायला आवडतात. नाश्त्याला हे पदार्थ गरमागरम खाण्याची मज्जाच काही वेगळी असते. यातही डोसा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा. डोशासोबत (Loni Dosa recipe) आंबटगोट सांबार आणि नारळाची चटणी असली तर मग (How to make Loni Sponge dosa recipe) बेत अजूनच रंगतदार होतो. डोसा हा पदार्थ आता फक्त दाक्षिणात्य राज्यापुरता ( Loni Sponge Dosa) मर्यादित राहिला नसून तो देशभरात मोठ्या आवडीने खाल्ला जातो. यातही डोशाचे अनेक प्रकार असतात, साधा डोसा, रवा डोसा, म्हैसूर डोसा असे अनेक प्रकार खवय्यांचे फेव्हरेट आहेत(Soft Sponge Dosa Recipe).
डोशाचे अनेक लोकप्रिय प्रकार असले तरी, लोणी डोशाची खासियतच वेगळी! लोणी डोसा खुसखुशीत, मऊसूत, तोंडात टाकताच विरघळेल इतका चवीला अप्रतिम असतो. खरंतर, लोणीच्या स्वादाने डोसा अधिक चविष्ट, मऊ लुसलुशीत आणि सुग्रास होतो. तव्यावर लोणी घालून केलेला हा लुसलुशीत डोसा फक्त पाहायलाच नाही तर खायलाही तितकाच टेस्टी लागतो. घरच्याघरीच लोणी डोसा तयार करणे तितकेसे कठीण नाही, फक्त योग्य प्रमाण आणि कृती माहीत असणे गरजेचे असते. उडप्याकडे मिळतो तसा परफेक्ट लोणी स्पंज डोसा कसा करायचा ते पाहूयात...
साहित्य :-
१. तांदूळ - ४ कप
२. पांढरी उडीद डाळ - १/२ कप
३. साबुदाणा - १/२ कप
४. पोहे - १ कप
५. मेथी दाणे - १ टेबलस्पून
६. पाणी - गरजेनुसार
७. मीठ - चवीनुसार
८. लोणी - २ ते ३ टेबलस्पून
गरमागरम भाकरी आणि कांद्याच्या पातीची चमचमीत चटणी! अस्सल गावरान पारंपरिक पदार्थ - बेत होईल खास...
कृती :-
१. सगळ्यांतआधी एक मोठा बाऊल घेऊन त्यात तांदूळ, पांढरी उडीद डाळ, साबुदाणा, पोहे, मेथी दाणे असे सगळे जिन्नस योग्य त्या प्रमाणात घ्यावेत.
२. आता या मिश्रणात पाणी घालून हे सगळे घटक एकत्रित पाण्याने २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यानंतर यात पुन्हा पाणी भरुन ५ ते ६ तासांसाठी हे सगळे जिन्नस पाण्यांत भिजत ठेवावेत.
कणीक भिजवून फ्रिजमध्ये ठेवणार असाल तर कणीक भिजवायला ‘हे’ पाणी वापरा, काळी पडणार नाही...
३. ५ ते ६ तासांनंतर मिश्रणातील पाणी काढून ते मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्यावे. वाटून घेतलेलं डोशाच बॅटर झाकून ७ ते ८ तासांसाठी आंबवण्यासाठी ठेवून द्यावे.
४. ७ ते ८ तासांनंतर बॅटर फुलून आल्यावर गरम तव्यावर थोडे तेल लावून डोसा तयार करुन घ्यावा. डोसा तयार होत आल्यावर वरून थोडे लोणी सोडावे.
गरमागरम लोणी डोसा खाण्यासाठी तयार आहे. हिरवी चटणी व झणझणीत सांबारसोबत हा डोसा खायला अधिकच चविष्ट लागतो. डोसा गरम असतानाच सर्व्ह करताना देखील आपण त्यावर आपल्या आवडीनुसार लोणी पसरवून लावू शकतो.