थंडीच्या दिवसात वेगवेगळे चटकदार पदार्थ खाण्याची मजा काही औरच असते. अशात आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत लसूण मेथीची, चव आणि सुगंधाने भरलेली जबरदस्त भाजी. मेथीची हलकी कडवट चव, लसणाचा तीखट सुगंध आणि देशी मसाल्यांचा अप्रतिम संगम ही भाजी इतकी टेस्टी बनवतो की टेस्ट बराच काळ स्मरणात राहते. ही भाजी बनायला लागतात फक्त काही मिनिटे… आणि खायला? बस, बोटं चाटत रहाल!
लसूण मेथीसाठी लागणारं साहित्य
एक जुडी मेथी
दोन चमचे तूप
दोन चमचे तेल
एक चिमूट हिंग
एक चमचा जिरे
3 कांदे
3 टोमॅटो
1 चमचा काश्मीरी लाल तिखट
अर्धा चमचा हळद
1 चमचा धणे पावडर
अर्धा चमचा जिरे पावडर
दोन चमचे शेंगदाणे
एक चमचा पांढरे तीळ
एक चमचा भाजलेली चणा डाळ
एक चमचा आले–लसूण पेस्ट
12-15 लसणाच्या पाकळ्या
लसूण मेथी कशी बनवायची?
सर्वप्रथम मेथीची जुडी घ्या आणि स्वच्छ पाण्यात चांगली धुवा. मेथीवरील सर्व माती पूर्णपणे निघणे आवश्यक आहे. नंतर मेथी बारिक चिरून ठेवा. नंतर कढईत तेल गरम करा आणि त्यात 8–10 लसणाच्या पाकळ्या घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. लसूण लालसर होऊ लागले की त्यात चिरलेली मेथी घाला, झाकण ठेवा आणि मंद आचेवर शिजू द्या.
नंतर वेगळ्या पॅनमध्ये शेंगदाणे, पांढरे तीळ आणि भाजलेली चणा डाळ घालून हलके सोनेरी होईपर्यंत भाजा. भाजून झाल्यावर हे मिश्रण मिक्सरमध्ये टाकून बारीक पूड करून घ्या.
त्यानंतर कांदे आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या. एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे घाला. जिरे तडतडू लागले की चिरलेला कांदा घाला आणि ब्राऊन होईपर्यंत परता. आता त्यात धणे पावडर, जिरे पावडर आणि काश्मीरी तिखट घालून छान परता. त्यानंतर चिरलेला टोमॅटो घालून तो छान मऊ होईपर्यंत मॅश करा.
टोमॅटो मऊ झाल्यावर त्यात तयार केलेली शेंगदाणा–चणा डाळ–तीळ यांची पेस्ट घाला आणि छान मिसळा. शेवटी त्यात आधी केलेली मेथीची भाजी घालून सगळे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. बस! तुमची सुगंधी व स्वादिष्ट लसूण मेथीची भाजी तयार आहे!
