गरमागरम पिठलं म्हणजे अस्सल महाराष्ट्रीयन फेमस पारंपरिक पदार्थ. या गरमागरम पिठल्यासोबत भाकरी, फोडलेला कांदा, हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणजे बहारदार जेवण (Kulthacha Pithala Recipe) झालेच म्हणून समजा. पिठलं म्हटलं की आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभरात लोकप्रिय असलेलं बेसनाच पिठलंच आठवत. परंतु आपण बेसनाच्या (Traditional Kulith Pithla recipe) पिठल्यापेक्षा पौष्टिक आणि हेल्दी तसेच सुपरफूड (Horse Gram Flour Curry) म्हणून ओळखले जाणारे कुळथाचे पिठलं देखील तयार करु शकतो. खरंतर कुळथाची पिठी अनेकांना आवडत नाही. काहींना तर त्याचा वासही नकोसा वाटतो. परंतु काहींना पिठी इतकी आवडते की, जेवणात चार घास जास्तच जातात(How To Make Kulthacha Pithala At Home).
गरमागरम भात, चपाती, भाकरी सोबत कुळथाचं पिठलं खाण्याची मज्जा काही औरच असते. गरमागरम कुळथाचं पिठलं, भाकरी, भात सोबत कुरडई किंवा पापड असा झक्कास बेत होऊ शकतो. कुळथाला स्वतःची अशी एक छान चव असल्याने हे पिठलं पटापट खाऊन फस्त केलं जातं. कुळीथ पौष्टिक व आरोग्यासाठी चांगले असल्याने ते आहारात असणे फायदेशीर ठरते. घरातील लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनीच कुळीथ खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. नेहमीचं तेच ते बेसनाचं पिठलं खाऊन कंटाळा आला असेल तर आपण हे पौष्टिक कुळथाचं झटपट होणार पिठलं तयार करु शकतो. अस्सल पारंपरिक कुळथाचं पिठलं बनवण्याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. तेल - २ टेबलस्पून
२. जिरे - १ टेबलस्पून
३. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ मिरच्या
४. लाल सुक्या मिरच्या - १ ते २ सुक्या मिरच्या
५. लसूण - २ टेबलस्पून (बारीक चिरलेला)
६. कांदा - १ कप
७. हळद - १ टेबलस्पून
८. हिंग - १/२ टेबलस्पून
९. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
१०. कुळीथ पीठ - ४ ते ५ टेबलस्पून
११. पाणी - गरजेनुसार
१२. मीठ - चवीनुसार
१३. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
१४. ओलं खोबरं - १ टेबलस्पून (बारीक किसलेलं)
१५. कोकम - ३ ते ४
विकतसारखे मसाला ताक करण्यासाठी घरीच करा वर्षभर टिकणारा सिक्रेट मसाला, ताकाची चव वाढेल दुप्पट...
आज नाश्त्याला काय करायचं? हे घ्या उत्तर-पाहा नाश्त्याचे १० झटपट पदार्थ, स्कुल टिफिनसाठीही मस्त...
कृती :-
१. सगळ्यांत आधी एक मोठा बाऊल घेऊन त्यात कुळीथ पीठ गरजेनुसार घेऊन त्यात पाणी ओतावे. आता हाताने किंवा चमच्याने ढवळून मिश्रण पाण्यांत व्यवस्थित कालवून घ्यावे.
२. या तयार मिश्रणात चवीनुसार मीठ घालावे. मिश्रण थोडे जास्त पाणी ओतून पातळसर करून घ्यावे.
३. आता एका कढईत तेल ओतून ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. या गरम तेलात जिरे, हिरव्या आणि लाल सुक्या मिरच्या घालाव्यात.
४. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला लसूण, कांदा, हळद, हिंग, लाल तिखट मसाला घालून खमंग अशी फोडणी तयार करून घ्यावी.
फक्त वाफेवर, इडली पात्रात करा साबुदाण्याचे कुरकुरीत पापड, पीठ शिजवणे - वाळवणे अशी झंझट विसरा!
५. आता या तयार फोडणीत कुळीथाचे भिजवून घेतलेले पीठ ओतावे. सतत चमच्याने ढवळत हे पिठलं थोडं घट्टसर करुन घ्यावे. पिठल्याची कंन्सिस्टंसी आपल्या आवडीनुसार ठेवावी. मग कोकम घालावे. या पिठल्याला एक हलकी उकळी येऊ द्यावी.
५. १० ते १५ मिनिटे पिठलं शिजवून झाल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेलं ओलं खोबरं भुरभुरवून घालावे.
गरमागरम कुळथाचं पिठलं खाण्यासाठी तयार आहे. गरम भाकरी किंवा भातासोबत हे पिठलं खाण्यासाठी सर्व्ह करावे. या मेन्यूसोबत लोणच्याची एखादी फोड असेल तर जेवणाचे चार घास नेहमीपेक्षा जास्तच जातात.