उन्हाळा सुरू झाला की गारेगार कुल्फीची आपाेआप आठवण येऊ लागते. आईस्क्रिम, कुल्फी, मिल्क शेक असे थंडगार पदार्थ हवेहवेसे वाटू लागतात. दरवेळी हे पदार्थ विकत घेऊन खायचे म्हटलं तर पैसाही खूप जातो आणि समाधानही होत नाही. त्यापेक्षा हे पदार्थ जर घरीच करता आले तर ते अगदी मनसोक्त आणि हवे तेव्हा खाता येतात. पण कुल्फी, आईस्क्रिम घरी जमतच नाही अशी अनेकींची तक्रार असते. तुमचंही हेच म्हणणं असेल तर पुढे सांगितलेली एक अतिशय सोपी रेसिपी पाहा आणि घरीच अगदी झटपट कुल्फी तयार करा (how to make kulfi at home?). ही रेसिपीने तयार केलेली कुल्फी नक्कीच अगदी परफेक्ट होईल आणि घरातल्या सगळ्यांनाही आवडेल.(Summer Special Kulfi Recipe)
घरी कुल्फी कशी तयार करावी?
साहित्य
१ लीटर फुल फॅट दूध
अर्धी ते पाऊण वाटी साखर
चुकीच्या पद्धतीने मखाने खाल्ले तर फायदे मिळणारच नाहीत, पाहा मखाने खाण्याची योग्य पद्धत
मखाना, बदाम, काजू मिळून अर्धी वाटी
४ ब्रेड स्लाईस आणि चवीसाठी केशर आणि वेलची पूड
कृती
कुल्फी तयार करण्यासाठी ब्रेड स्लाईस घ्या आणि त्याचे बाजुचे काठ काढून ते मिक्सरमधून फिरवा. त्याची पावडर करून घ्या.
दूध गॅसवर गरम करायला ठेवा. त्यामध्ये केशर घालून ते चांगले उकळवून थोडेसे आटवून घ्या.
यानंतर त्यामध्ये ब्रेडची पावडर, सुकामेव्याची पावडर, वेलची पूड असं सगळं घाला आणि दूध आणखी घट्ट होऊ द्या. जेव्हा दूध चांगले घट्ट होईल तेव्हा त्यात साखर घाला.
पीस लीलीला फुलं येतच नाहीत- पानंही पिवळी पडतात? ४ टिप्स- भरपूर येतील फुलं
पुन्हा थोडे उकळू द्या आणि नंतर गॅस बंद करून ते थंड होऊ द्या.
थंड झालेले दूध कुल्फीच्या साच्यात भरून फ्रिजरमध्ये ७ ते ८ तासांसाठी सेट व्हायला ठेवून द्या. कुल्फी करायची नसेल तर तुम्ही याचे आईस्क्रिमही लावू शकता. एकदा ट्राय करून पाहाच.
