महाराष्ट्रात होळी आणि धुलिवंदनाचा सण म्हटला की डोळ्यांसमोर येते ती गरमागरम पुरणपोळी. पण ही पुरणपोळी झणझणीत कटाच्या आमटीसोबत खाल्ली जात नाही. तोपर्यंत जेवणाची खरी मजा येत नाही.(Katachi Amti recipe) पुरणपोळीचा गोडवा आणि कटाच्या आमटीचा तिखटपणा हे वेगळ समीकरण आगे. महाराष्ट्रामध्ये जितके गोड पदार्थ चवीने खाल्ले जातात तितकेच चमचमीत पदार्थ हवेहवेसे वाटतात.(Holi special recipe) पदार्थ फक्त चवीला चांगला असून चालत नाही तर तो दिसायला ही तेवढचा रुचकर हवा. ज्यामुळे पदार्थही टेस्टी लागतो.(Puran Poli side dish) पुरणपोळीसोबत खाल्ला जाणारा पदार्थ कटाची आमटी. अनेकदा याला तवंग किंवा तर्री येत नाही. होळीच्या दिवशी घराघरात दरवळणारा या आमटीचा सुगंध सणाची ओढ अधिकच वाढवतो.(Maharashtrian curry) जर आपल्यालाही या होळीला हॉटेलसारखी परफेक्ट तर्री असलेली आणि जिभेवर रेंगाळणारी आमटी बनवायची असेल, तर परफेक्ट रेसिपी पाहा.
साहित्य
सुके खोबरे- १/४ वाटी दालचिनी- १ लवंग- 2 तीळ- १ चमचाकांदा- १ उभा कापून लसूण पाकळ्या- १५-२०आले- १ इंच कोथिंबीर- १/४ वाटी तेल- ४ चमचेमोहरी- १ चमचा जिरे-१ चमचा हिंग- १/४ चमचा कढीपत्ता हळद- १/४ चमचा बेडगी मिरची पावडर- १ चमचा कांदा लसूण मसाला / काळं तिखट / येसूर- १ चमचा साधी तिखट मिरची पावडर- १ चमचा पुरण- १ छोटा गोळा तयार कटाचे पाणीमीठ बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती
1. पुरण शिजवताना अनेकदा त्यात पाणी राहते. ते फेकण्याऐवजी बाजूला काढून ठेवा. कटाची आमटी करण्यासाठी सगळ्यात आधी पॅनवर दालचिनी, लवंग आणि तीळ भाजून थंड होण्यास ठेवा. आता त्याच पॅनमध्ये किसलेले खोबरे भाजून घ्या.
2. आता पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात कांदा परतवून घ्या. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये भाजलेल सर्व साहित्य, कांदा, आले-लसूण आणि कोथिंबीर घालून वाटण तयार करा.
3. मोठ्या पातेल्यात तेल गरम करुन त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला घालून चांगले परतवून घ्या. वरुन वाटण घालून पुन्हा परतवून घ्या. हळद, लाल तिखट, काळा मसाला, कोथिंबीर आणि कटाचे पाणी घालून पुन्हा ढवळून घ्या.
4. वरुन त्यात कटाचे पाणी घाला. मीठ, पुरणाचा गोळा घालून उकळी येऊ द्या. आमटी थोडी घट्ट झाल्यानंतर कोथिंबीर घाला. तयार होईल झणझणीत कटाची आमटी.
Web Summary : Puran Poli is incomplete without Katachi Amti during Holi in Maharashtra. This recipe provides a detailed guide to making restaurant-style Katachi Amti with perfect tarri (layer of oil) to complement the sweetness of Puran Poli.
Web Summary : महाराष्ट्र में होली के दौरान पुरण पोली कटाची आमटी के बिना अधूरी है। यह रेसिपी रेस्तरां-शैली की कटाची आमटी बनाने के लिए एक विस्तृत गाइड प्रदान करती है, जो पुरण पोली की मिठास को पूरा करती है।