Lokmat Sakhi >Food > कारल्याचं झणझणीत भरीत खाऊन पाहिलं का? अजिबात कडू लागणार नाही- बच्चेकंपनीही आवडीने खाईल.. 

कारल्याचं झणझणीत भरीत खाऊन पाहिलं का? अजिबात कडू लागणार नाही- बच्चेकंपनीही आवडीने खाईल.. 

How To Make Karela Bharit?: कारल्याची भाजी तर नेहमीच करता. आता कारल्याचं झणझणीत भरीत खाऊन पाहा..(karlyacha bharit recipe in Marathi)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2025 09:25 IST2025-07-06T09:16:07+5:302025-07-06T09:25:01+5:30

How To Make Karela Bharit?: कारल्याची भाजी तर नेहमीच करता. आता कारल्याचं झणझणीत भरीत खाऊन पाहा..(karlyacha bharit recipe in Marathi)

how to make karela bharit, karlyacha bharit recipe in Marathi, karela bharta recipe, karela sabji recipe | कारल्याचं झणझणीत भरीत खाऊन पाहिलं का? अजिबात कडू लागणार नाही- बच्चेकंपनीही आवडीने खाईल.. 

कारल्याचं झणझणीत भरीत खाऊन पाहिलं का? अजिबात कडू लागणार नाही- बच्चेकंपनीही आवडीने खाईल.. 

Highlightsकारल्याचं भरीत खाऊन पाहा. रेसिपी अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे.

कडू कारलं कित्येक जणांना अजिबात आवडत नाही. कारण कारल्याचे पदार्थ करताना त्यात थोडा का होईना पण कडूपणा राहतोच. त्यामुळे लहान मुलं तर ते पानातही घेत नाहीत. पण आता कारल्याचं भरीत जर तुम्ही त्यांना करून दिलंत, तर ते मात्र मुलं आवडीने खातील. कारण या रेसिपीमध्ये कारल्याचा कडूपणा अजिबात जाणवत नाही. आतापर्यंत कारल्याचे काप करून ते फ्राय केलेली भाजी, चिंच गूळ घातलेली कारल्याची भाजी, भरली कारली असे वेगवेगळे प्रकार तुम्ही खाल्ले असतीलच (how to make karela bharit?). आता कारल्याचं भरीत खाऊन पाहा. रेसिपी अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे.(karlyacha bharit recipe in Marathi) 

 

कारल्याचं भरीत कसं करायचं?

साहित्य

२ मध्यम आकाराचे हिरवे कारले

२ लाल टोमॅटो

२ कांदे

किचनमधला पसारा काही केल्या कमी होईना? ४ टिप्स- स्वयंपाक घर नेहमीच दिसेल टापटीप- आवरलेलं

५ ते ६ लसूण पाकळ्या 

२ ते ४ हिरव्या मिरच्या

२ चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट

२ चमचे चिंचेचा कोळ

चवीनुसार तिखट, मीठ, काळा मसाला

 

कृती

सगळ्यात आधी कारल्याच्या गोलाकार चकत्या किंवा उभे काप करून घ्या आणि त्याच्या आतल्या बिया काढून टाका. यानंतर चिरलेले काप १५ मिनिटे पाण्यात घालून ठेवा.

तुमचा सगळा स्ट्रेस, थकवा १ मिनिटात पळूवन लावणारा खास उपाय, ताठ बसा आणि फक्त....

कांदा आणि टोमॅटोच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घ्या. कढईमध्ये तेल घालून मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करून घ्या.

 

यानंतर कांदा, टोमॅटो, कारले, लसूण, मिरच्या हे सगळं कढईमध्ये घाला आणि परतून घ्या. उलटून पालटून सगळे पदार्थ खमंग परतले जातील याची काळजी घ्या. त्यावर थोडं मीठ घाला आणि कढईवर एखाद्या मिनिटासाठी झाकण ठेवून द्या.

डबलचीन आल्याने चेहरा खूप प्रौढ दिसतो? १ सोपा उपाय- परफेक्ट जॉ लाईन मिळून दिसाल तरुण

यानंतर सगळे पदार्थ व्यवस्थित परतून मऊ झाल्यानंतर गॅस बंद करा. आता या कढईमध्येच दाण्याचा कूट, चिंचेचा कोळ, लाल तिखट, गरम मसाला आणि हवं असल्यास थोडा किचन किंग मसाला घाला. वांग्याचं भरीत ठेचून घेतो तसंच हे भरीतही ठेचून एकजीव करून घ्या. झणझणीत भरीत झालं तयार. हे भरीत भाकरीसोबत विशेष चवदार लागतं.
 

Web Title: how to make karela bharit, karlyacha bharit recipe in Marathi, karela bharta recipe, karela sabji recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.