दिवाळीच्या फराळाची तयारी आता घरोघर सुरू झालेली आहे. त्यामुळे कित्येक जणी या कामात गुंतलेल्या आहेत. चिवडा हा त्यातल्या त्यात सोपा आणि खूप वेळ न लागणारा पदार्थ. पण चकली, शेव, लाडू, शंकरपाळे, करंजी यासारखे पदार्थ करायचे म्हटलं की त्यात खूप वेळ जातो. म्हणूनच आता तुमचा वेळ थोडासा वाचावा यासाठी अगदी झटपट करंज्या कशा करायच्या याची ही एक खास रेसिपी पाहा.. या पद्धतीने जर तुम्ही करंज्या केल्या तर करंजी करण्याचं काम तुम्हाला अगदी सोपं झाल्यासारखं वाटेल.(simple and easy trick to make karanji or gujiya quickly)
झटपट करंजी करण्याची ट्रिक
साधारणपणे आपण जेव्हा करंजी करतो तेव्हा पिठाचे छोटे छोटे पेढ्यांच्या आकाराएवढे गोळे करून घेतो. त्यानंतर एकेक गोळा घेऊन तो पुरीएवढ्या आकाराचा लाटतो.
पारंपरिक पद्धतीने केलेले रव्याचे पाकातले लाडू, पाक कच्चा राहण्याचं टेन्शनच नाही, घ्या रेसिपी
त्यानंतर त्यात सारण भरून मग पुरी दुमडून त्याची करंजी करतो. आता या पद्धतीने करंजी करायची तर त्यासाठी बराच वेळ लागतो.
म्हणूनच आता ही एक खास पद्धत पाहा. यासाठी पोळी करण्यासाठी लागतो, त्यापेक्षाही मोठा पिठाचा गोळा घ्या. तो मोठ्या परातीवर ठेवून लाटा. यानंतर त्याची मोठी पोळी लाटून झाली की त्याच्या काठाकडचा काही भाग सोडून गोलाकार पद्धतीने करंजीचे सारण टाका.
दिवाळीत पाहुण्यांच्या पानात नक्की वाढा चमचाभर टोमॅटोची चटणी! ताेंडाला चव येऊन जेवणाची रंगत वाढेल
यानंतर जिथे जिथे सारण घातले आहे ती पोळी दुमडून घ्या आणि वाटीने किंवा ग्लासने तेवढी करंजी कापून घ्या. एकाच मोठ्या आकाराच्या पोळीमध्ये तुम्ही ८ ते १० करंजी नक्कीच करू शकता. बघा ट्राय करून. ही रेसिपी pree_tikirasoi या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.