Lokmat Sakhi >Food > राखी पौर्णिमा स्पेशल : झटपट करा ब्रेडचा कलाकंद! विकतपेक्षा भारी मऊमऊ-रवाळ कलाकंद करा झटपट...

राखी पौर्णिमा स्पेशल : झटपट करा ब्रेडचा कलाकंद! विकतपेक्षा भारी मऊमऊ-रवाळ कलाकंद करा झटपट...

How To make Kalakand from bread Slice : Bread kalakand recipe : Instant bread kalakand : Easy bread kalakand recipe : How to make kalakand using bread : Kalakand sweet with bread : Homemade bread kalakand : अगदी १५ मिनिटांत ब्रेड स्लाईसचे इन्स्टंट 'कलाकंद' घरच्याघरीच करण्याची रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2025 14:43 IST2025-08-07T14:39:00+5:302025-08-07T14:43:35+5:30

How To make Kalakand from bread Slice : Bread kalakand recipe : Instant bread kalakand : Easy bread kalakand recipe : How to make kalakand using bread : Kalakand sweet with bread : Homemade bread kalakand : अगदी १५ मिनिटांत ब्रेड स्लाईसचे इन्स्टंट 'कलाकंद' घरच्याघरीच करण्याची रेसिपी...

How to Make Kalakand from Bread Slices Bread kalakand recipe Instant bread kalakand Easy bread kalakand recipe How to make kalakand using bread Homemade bread kalakand | राखी पौर्णिमा स्पेशल : झटपट करा ब्रेडचा कलाकंद! विकतपेक्षा भारी मऊमऊ-रवाळ कलाकंद करा झटपट...

राखी पौर्णिमा स्पेशल : झटपट करा ब्रेडचा कलाकंद! विकतपेक्षा भारी मऊमऊ-रवाळ कलाकंद करा झटपट...

श्रावण म्हणजे सणासुदीचा महिना, या दिवसांत आपण सगळेच सण मोठ्या आनंद, उत्साहात साजरे करतो. श्रावण महिन्यांत एकामागोमाग एक येणाऱ्या सणानिमित्ताने घराघरांत वेगवेगळ्या प्रकारचे गोडाधोडाचे (How to Make Kalakand from Bread Slices) पदार्थ केले जातात. इतकंच नाही तर पूजा - अर्चा, नैवेद्य आणि प्रसाद म्हणून देण्यासाठी आपण गोडाचे पदार्थ विकत आणतो किंवा घरच्याघरीच तयार करतो. नेहमीचे तेच ते गोड पदार्थ खाऊन (Homemade bread kalakand) काहीवेळा खूपच कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होतेच(How to make kalakand using bread).

यंदा श्रावणात येणाऱ्या सणावाराला जर आपल्याला गोडाचा नवीन पदार्थ करायचा असेल तर आपण चक्क ब्रेड स्लाईसचे झटपट इन्स्टंट पद्धतीने होणारे 'कलाकंद' करु शकता. कलाकंद हा मिठाईच्या प्रकारांतील सगळ्यात फेमस आणि सगळ्यांच्याच आवडीचा प्रकार. मस्त, गोड, रवाळ, ड्रायफ्रुटस घातलेलं मऊ, लुसलुशीत कलाकंद खाण्याची मज्जा काही औरच...जिभेवर ठेवताच विरघळणारे कलाकंद खाण्याचा मोह कुणालाही आवरता येणार नाही. परंतु सणावारानिमित्ताने बाजारांत कलाकंद (Easy bread kalakand recipe) फार महाग आणि काहीवेळा भेसळयुक्त विकले जाते. अशावेळी आपण अगदी १५ मिनिटांत ब्रेड स्लाईसचे इन्स्टंट 'कलाकंद' घरच्याघरीच तयार करु शकता. यासाठीच, घरच्याघरीच कलाकंद करण्याची झटपट रेसिपी पाहूयात..        

साहित्य :- 

१. पाणी - २ ते ३ टेबलस्पून 
२. दूध - १.५ लिटर 
३. साखर - ६ टेबलस्पून 
४. केशर काड्या - १५ ते २० केशर काड्या 
६. स्लाईस ब्रेड - १० ते १५ ( ब्रेडच्या कडा काढून घेतलेल्या)
७. ड्रायफ्रुट्स काप - १/२ कप 

गार झाल्यावरही टम्म फुगलेल्याच राहतील पुऱ्या! पाहा ६ टिप्स- मस्त पुऱ्या डब्यात द्या, सावकाश खा...


श्रावण स्पेशल : उपवासाचे कुरकुरीत मेदू वडे! दही-चटणीसोबत मारा ताव, उपवासाचा खास पदार्थ...

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यात चमचाभर पाणी ओतून मग त्यात दूध ओतून घ्यावे. आधी पाणी घातल्यामुळे दूध भांड्याच्या तळाशी लागून करपत नाही. 
२. दूध व्यवस्थित गरम करून घ्यावे. या गरम दुधातील थोडे दूध घेऊन त्यात केशर काड्या भिजत घालाव्यात. 
३. गॅसवरील पातेल्यातील गरम दुधात साखर घालून ती व्यवस्थित हलवून विरघळवून घ्यावी. त्यानंतर या तयार झालेल्या साखरेच्या दुधातील वाटीभर दुध बाजूला काढून बाऊलमध्ये ठेवावे. 
४. उरलेल्या दुधात केशर मिसळून रंग आलेले दूध ओतावे आणि ते मंद आचेवर चमच्याने हलवत थोडे आटवून त्याची घट्टव दाटसर अशी रबडी तयार करुन घ्यावी. 

रक्षाबंधन स्पेशल : दूध आटवून तासाभरात करा भावासाठी खास मलई लाडू, प्रेमाची खास भेट...

५. एक मोठा कडा असलेला ट्रे किंवा डिश घ्यावी. यात सगळ्यात आधी चमचाभर रबडी घालून ती व्यवस्थित पसरवून घ्यावी मग त्यावर कडा काढून घेतलेले ब्रेडचे स्लाइस ठेवावेत. मग त्यावर थोडे दूध पसरवून घालावे. त्यानंतर तयार रबडी घालावी. मग पुन्हा एक ब्रेडचा थर, त्यावर दूध व रबडी असे एक एक करून ओतून कलाकंदचे थर व्यवस्थित सेट करून घ्यावे. मग या ट्रे वर ॲल्युमिनियम फॉईल लावून पॅक करून घ्यावे. 
६. हा ट्रे २ ते ३ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवून कलाकंद व्यवस्थित सेट होऊ द्यावे. ३ तासांसानंतर कलाकंद फ्रिजबाहेर काढून त्यावर ड्रायफ्रुट्सचे काप भुरभुरवून घालावेत. 

मस्त गोडधोड आणि फारशी मेहनत न घेता अगदी इन्स्टंट पद्धतीने झटपट होणारे कलाकंद खाण्यासाठी तयार आहे.

Web Title: How to Make Kalakand from Bread Slices Bread kalakand recipe Instant bread kalakand Easy bread kalakand recipe How to make kalakand using bread Homemade bread kalakand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.