Join us
Daily Top 2Weekly Top 5

अस्सल वैदर्भीय खमंग तडका! ना भाजणे, ना तळणे - करा ५ मिनिटांत चमचमीत कच्चा चिवडा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2026 17:03 IST

Vidarbha Special Kachha Chivda Recipe : Kachha Chivda Recipe : How To Make Kachha Chivda Recipe At Home : विदर्भ स्पेशल 'कच्च्या चिवड्याची' चव चाखली नसेल, तर ही घ्या सोपी रेसिपी...

विदर्भात पाऊल ठेवलं की पोहे आणि सावजी रश्यासोबतच एका पदार्थाचा दरवळ कायम जाणवतो, तो म्हणजे खमंग विदर्भ स्पेशल 'कच्चा चिवडा'. विदर्भातील खाद्यसंस्कृतीत साध्या - घरात सहज उपलब्ध होणाऱ्या, पण चवीला अफलातून अशा पदार्थांना खास मान आहे. त्यापैकीच एक म्हणजे विदर्भ स्पेशल कच्चा चिवडा... अगदी कच्चे पोहे आणि मुरमुऱ्यांपासून तयार होणारा हा चिवडा हलका, कुरकुरीत आणि झणझणीत चवीचा असतो( How To Make Kachha Chivda Recipe At Home).

शेंगदाणे, हिरवी मिरची आणि खास वैदर्भीय मसाल्यांची फोडणी यामुळे या चिवड्याला एक वेगळीच चव मिळते. कोणताही जादा तामझाम न करता, पोहे न तळता किंवा न भाजता तयार होणारा हा चिवडा चवीला इतका भन्नाट लागतो की एकदा खाल्ला तर थांबवत नाही. बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, भरपूर कोथिंबीर आणि वरून पिळलेला लिंबाचा रस... हा नुसता चिवडा नाही तर विदर्भाचं प्रेम आहे. कमीत कमी साहित्यात आणि अवघ्या ५ मिनिटांत (Vidarbha Special Kachha Chivda Recipe) तयार होणारा हा पदार्थ आरोग्यासाठी हलका आणि चविष्ट लागतो. कुरकुरीत पोहे, मुरमुरे व घरगुती मसाल्यांची फोडणी जेव्हा एकत्रित येते, तेव्हा जो स्वाद तयार होतो तो शब्दांत सांगणं कठीणच! जर तुम्ही अजून या (Kachha Chivda Recipe) विदर्भ स्पेशल 'कच्च्या चिवड्याची' चव चाखली नसेल, तर ही घ्या सोपी रेसिपी... 

साहित्य :- 

१. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)२. हिरव्या मिरच्या - २ ते ३ (बारीक चिरलेल्या)३. कांद्याची पात - १/२ कप (बारीक चिरलेली)४. तेल - १ टेबलस्पून५. हळद - १/२ टेबलस्पून६. धणेपूड - १/२ टेबलस्पून७. जिरेपूड - १/२ टेबलस्पून८. मीठ - चवीनुसार ९. साखर - १/२ टेबलस्पून १०. शेंगदाणे - १/२ कप ११. चणे - १/२ कप    १२. पातळ पोहे - २ कप १३. मुरमुरे - २ कप १४. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)१५. लिंबाचा रस - १/२ टेबलस्पून १६. फिंगर्स / बॉबी - ३ ते ४ (तळलेल्या)  १७. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून 

इडलीचं पीठ आंबवण्याची पाहा नवी ट्रिक आणि परफेक्ट प्रमाण, तांदूळ कसेही असोत इडल्या होतील मऊ लुसलुशीत...

इडली पात्रात साबुदाणा वडा करण्याची 'स्मार्ट' ट्रिक! तेल कमी- चव अप्रतिम - करा 'झिरो ऑईल' साबुदाणा वडा...

कृती :- 

१. एका मोठ्या भांड्यात तेल घेऊन त्यात चवीनुसार लाल तिखट मसाला, हळद, धणेपूड, जिरेपूड, चवीनुसार मीठ, साखर, शेंगदाणे, चणे, बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, कांद्याची पात घालावी. हे सगळे मिश्रण चमच्याने कालवून घ्यावे. २. मग या तयार मसाल्यात पातळ पोहे, मुरमुरे घालून सगळे मिश्रण चमच्याने कालवून घ्यावे. 

तेलाचा थेंबही न वापरता करा दलियाचे जाळीदार, कुरकुरीत आप्पे! पोट भरेल, वजनही वाढणार नाही असा पौष्टिक पदार्थ... 

३. सगळ्यात शेवटी या तयार चिवड्यावर वरून लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आवडीनुसार तळलेली कुरकुरीत बॉबी किंवा फिंगर्स कुस्करुन घालावेत. तयार चिवडा चमच्याने कालवून घ्यावा. 

विदर्भ स्पेशल कच्चा चिवडा खाण्यासाठी तयार आहे. संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी किंवा टी टाईमच्या वेळी काहीतरी पोटभरीच किंवा चविष्ट, चमचमीत खाण्यासाठी चिवडा तयार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Vidarbha's Instant Raw Chivda: A 5-Minute Savory Snack Recipe

Web Summary : Vidarbha's special raw chivda is a quick, flavorful snack made from poha and murmura. This no-cook recipe uses peanuts, green chilies, and Vidarbha spices. Mix ingredients, add lemon, coriander and serve.Ready in 5 minutes!
टॅग्स :अन्नपाककृती