हल्ली वजन कमी करण्यासाठी अनेकजण गव्हाच्या पिठाच्या पोळ्या खाण्याऐवजी ज्वारीच्या भाकरी खाण्यास प्राधान्य देत आहेत. आहारतज्ज्ञ आणि डाॅक्टरदेखील असाच सल्ला देतात. कारण गव्हाच्या पिठामध्ये असणारं ग्लुटेन पचायला जड असतं. शिवाय त्यामुळे वजनही वाढतं. म्हणून हल्ली बरेचजण पोळ्यांवरून भाकरीवर आले आहेत. पण यामध्ये एक अडचण अशी होते की घरातल्या महिलांना पोळ्या जेवढ्या चांगल्या करता येतात, तेवढी चांगली भाकरी जमत नाही. भाकरी जाड होते किंवा चिकट होते. काही जणी भाकरी थापायला गेल्या की ती तुटूनच जाते. म्हणून मग भाकऱ्या कराव्याच वाटत नाहीत (jwariche fulake recipe). तुमचीही हीच अडचण असेल तर आता भाकरी करण्याच्या फंदात न पडता सरळ ज्वारीचे फुलके करून खा.(how to make jowar fulake?)
ज्वारीच्या पिठाचे फुलके करण्याची रेसिपी
ज्वारीच्या पिठाचे फुलके करण्याची रेसिपी अतिशय सोपी आहे. यासाठी सगळ्यात आधी १ वाटी ज्वारीचे पीठ घ्या. त्यामध्ये साधारण पाऊण वाटी गरम पाणी घाला. गरम पाणी घातल्यानंतर पीठ हलकं कालवून घ्या. यानंतर ते १० मिनिटांसाठी झाकून ठेवा.
एका रात्रीत त्वचेवर होईल जादू, रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' उपाय; सकाळी आरशात स्वत:कडे पाहातच राहाल
त्यानंतर ते कालवलेलं पीठ घ्या आणि हाताला थोडं तेल लावून ते चांगलं मळा. मळून झालेलं पीठ पुन्हा १० मिनिटांसाठी झाकून ठेवा.
यानंतर मग त्याचे लहान लहान गोळे करून घ्या आणि फुलके लाटतो तसे ते लाटून घ्या. लाटताना गरज पडल्यास थोडं पीठ किंवा तेलाचा हात लावू शकता.
प्या वजन कमी करणारी कॉफी! कॉफी 'अशी' की कॅलरी कमी होऊन भराभर घटू लागते वजन
फुलका एका बाजुने थोडा कमी भाजा आणि दुसऱ्या बाजुने पक्का भाजून घ्या. आता कमी भाजलेली फुलक्याची बाजू तव्यावरून थेट गॅसवर टाकूनही भाजू शकता. हळूहळू सरावाने खूप छान फुलके जमायला लागतील आणि घरच्या मंडळींनाही भाकरीऐवजी ज्वारीचे फुलकेच आवडू लागतील.
Web Summary : Ditch difficult Bhakri; make soft, puffed jowar fulkas easily. This recipe uses hot water, kneading, and proper roasting for best results. Enjoy a healthy, gluten-free alternative!
Web Summary : कठिन भाकरी को छोड़ें; आसानी से नरम, फूले हुए ज्वार के फुलके बनाएं। इस रेसिपी में सर्वोत्तम परिणामों के लिए गर्म पानी, गूंधना और ठीक से भूनना शामिल है। एक स्वस्थ, ग्लूटेन-मुक्त विकल्प का आनंद लें!