Lokmat Sakhi >Food > अण्णाच्या हॉटेलमध्ये मिळतो तसा जाळीदार डोसा घरीच हवा? पिठामध्ये २ पदार्थ मिसळा- डोसा होईल परफेक्ट 

अण्णाच्या हॉटेलमध्ये मिळतो तसा जाळीदार डोसा घरीच हवा? पिठामध्ये २ पदार्थ मिसळा- डोसा होईल परफेक्ट 

South Indian Style Udupi Dosa Recipe: डोसा छान जाळीदार, कुरकुरीत होण्यासाठी काय करावं याच्या या काही खास ट्रिक्स..(tips and tricks for tasty and crunchy dosa)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2025 20:42 IST2025-09-09T20:41:47+5:302025-09-09T20:42:25+5:30

South Indian Style Udupi Dosa Recipe: डोसा छान जाळीदार, कुरकुरीत होण्यासाठी काय करावं याच्या या काही खास ट्रिक्स..(tips and tricks for tasty and crunchy dosa)

how to make jalidar dosa at home? south Indian style Udupi dosa recipe  | अण्णाच्या हॉटेलमध्ये मिळतो तसा जाळीदार डोसा घरीच हवा? पिठामध्ये २ पदार्थ मिसळा- डोसा होईल परफेक्ट 

अण्णाच्या हॉटेलमध्ये मिळतो तसा जाळीदार डोसा घरीच हवा? पिठामध्ये २ पदार्थ मिसळा- डोसा होईल परफेक्ट 

Highlights या पिठाचे एकदा डोसे करून पाहा. डोशावर खूप छान जाळी तर येईलच, पण ते अतिशय हलके आणि चवीला छान होतील. 

डोसा आणि चटणी किंवा डोसा आणि बटाट्याची भाजी असे पदार्थ कित्येकांच्या आवडीचे. त्यात चीज डोसा, बटर डोसा, लोणी डोसा असे कित्येक वेगवेगळे प्रकारही असतातच. आता डोसा अनेकांना आवडतो. पण घरी करायला गेलं की मात्र बऱ्याचदा तो फसतो. तव्याला न चिकटता कधी चांगला डाेसा जमलाच तरी त्यावर छान बारीक जाळी येत नाही. मग उडपी हॉटेलमध्ये मिळणारा छान जाळीदार डोसा आठवू लागतो (South Indian Style Udupi Dosa Recipe). असाच जाळीदार डोसा जर तुम्हाला घरी करायचा असेल तर डोशाचे पीठ तयार करताना या काही टिप्स लक्षात ठेवा...(tips and tricks for tasty and crunchy dosa)

 

डोसा जाळीदार, कुरकुरीत होण्यासाठी खास टिप्स..

डोसा जाळीदार आणि कुरकुरीत करायचा असेल तर सगळ्यात आधी डोशाचं पीठ भिजवताना काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तांदूळ आणि उडदाची डाळ यांचं प्रमाण नेहमीच ३: १ असं असावं. डाळीचं प्रमाण कमी- जास्त झाल्यास त्याचा परिणाम डोशाच्या जाळीवर होतो.

Navratri colors 2025 : पाहा नवरात्रीचे ९ रंग, कोणत्या दिवशी कोणता रंग-कोणत्या रंगाची नेसाल साडी

दुसरी गोष्ट म्हणजे डाळ आणि तांदूळ भिजल्यानंतर जेव्हा तुम्ही मिक्सरमधून वाटून घेणार असाल त्याच्या साधारण १ तास आधी जेवढी डाळ घेतली होती तेवढेच पोहे घ्या आणि ते थोड्याशा पाण्यामध्ये भिजत घाला. भिजलेले पोहे डाळ आणि तांदुळासोबत वाटून घ्या.

 

आता वाटून घेतलेल्या डाळ तांदुळाच्या पिठामध्ये तुम्हाला पोह्यासोबतच आणखी एक खास पदार्थ घालायचा आहे आणि तो पदार्थ म्हणजे नारळ. नारळाचा बाहेरचा काळपट भाग काढून घ्या आणि त्याच्या बारीक चकत्या करा.

अतिशय पौष्टिक असणारे ५ भारतीय पदार्थ- तब्येत राहील ठणठणीत, वजनही वाढणार नाही

या चकत्या मिक्सरमधून फिरवून बारीक करून घ्या. आता हे वाटलेले नारळ डाळ- तांदळाच्या पिठामध्ये घाला आणि सगळं पीठ एकदा व्यवस्थित हलवून घ्या. यानंतर ते पीठ आंबवण्यासाठी ठेवून द्या. या पिठाचे एकदा डोसे करून पाहा. डोशावर खूप छान जाळी तर येईलच, पण ते अतिशय हलके आणि चवीला छान होतील. 

 

Web Title: how to make jalidar dosa at home? south Indian style Udupi dosa recipe 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.