Join us
Daily Top 2Weekly Top 5

थंडीत दगडासारखा कडक झालेला गूळ मऊ कसा कराल? वापरा 'या' सोप्या टिप्स, हातानेच तुटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 11:13 IST

How To Make Jaggery Soft : जर तुम्हालाही अशीच अडचण येत असेल, तर काळजी करू नका. कडक झालेला गूळ पुन्हा मऊ करण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय आहेत. चला तर मग जाणून घेऊया हे भन्नाट टिप्स...

How To Make Jaggery Soft : हिवाळ्याच्या दिवसांत गूळ खाणे अनेकांना खूप आवडते. गुळापासून अनेक पदार्थ तयार करता येतात. मात्र अनेक घरांमध्ये ठेवलेला गूळ काही दिवसांनी दगडासारखा कडक होतो, ज्यामुळे तो तोडून खाणे कठीण होते. काही जण तर असा कडक गूळ बेकार समजून फेकूनही देतात. जर तुम्हालाही अशीच अडचण येत असेल, तर काळजी करू नका. कडक झालेला गूळ पुन्हा मऊ करण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय आहेत. चला तर मग जाणून घेऊया हे भन्नाट टिप्स...

कडक गूळ मऊ कसा करावा?

एअरटाइट डब्यात ठेवा

गूळ मऊ ठेवायचा असेल तर तो नेहमी हवाबंद डब्यात ठेवा. हवा आणि ओलसरपणाच्या संपर्कात आल्यामुळेच गूळ कडक होतो. त्यामुळे हा उपाय खूप उपयोगी ठरतो.

कापडात गुंडाळून ठेवा

गूळ कडक होऊ नये यासाठी तो स्वच्छ कापडात गुंडाळून ठेवू शकता. यामुळे गुळात हवा थेट शिरत नाही आणि तो लवकर कडक होत नाही.

लवंग आणि लिंब्याचा वापर करा

गूळ खराब होऊ नये आणि मऊ राहावा यासाठी डब्यात 2–3 लवंगा किंवा अर्धा लिंब्याचा तुकडा ठेवा. यामुळे गूळ मऊ राहतो आणि चवही चांगली लागते.

गूळ छोटे तुकडे करून ठेवा

मोठा गुळाचा गोळा ठेवण्याऐवजी छोट्या तुकड्यांमध्ये कापून ठेवा. यामुळे गूळ लवकर कडक होत नाही आणि वापरणेही सोपे जाते.

चांगल्या दर्जाचा गूळ वापरा

नेहमी चांगल्या क्वालिटीचा गूळ खरेदी करा. असा गूळ चवीला चांगला असतो आणि लवकर खराब किंवा कडकही होत नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Soften Hard Jaggery: Simple Tips to Solve the Problem

Web Summary : Hard jaggery? Keep it airtight, wrap in cloth, or add cloves/lemon. Cut into pieces and buy good quality jaggery to keep it soft.
टॅग्स :अन्नकिचन टिप्स