Lokmat Sakhi >Food > मुलांच्या डब्यासाठी करा इंस्टंट रवाबेसन मसाला इडली! नाश्त्यासाठी परफेक्ट मेन्यू-घ्या रेसिपी

मुलांच्या डब्यासाठी करा इंस्टंट रवाबेसन मसाला इडली! नाश्त्यासाठी परफेक्ट मेन्यू-घ्या रेसिपी

How to Make Instant Rava Besan Masala Idli: रवा आणि बेसन यांच्यापासून तयार केलेली रवा बेसन मसाला इडली घरातल्या सगळ्यांनाच अतिशय आवडू शकते.(rava besan instant masala idli recipe)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2025 16:06 IST2025-08-28T15:57:13+5:302025-08-28T16:06:46+5:30

How to Make Instant Rava Besan Masala Idli: रवा आणि बेसन यांच्यापासून तयार केलेली रवा बेसन मसाला इडली घरातल्या सगळ्यांनाच अतिशय आवडू शकते.(rava besan instant masala idli recipe)

how to make instant rava besan masala idli, rava besan instant masala idli recipe by chef Kunal Kappor | मुलांच्या डब्यासाठी करा इंस्टंट रवाबेसन मसाला इडली! नाश्त्यासाठी परफेक्ट मेन्यू-घ्या रेसिपी

मुलांच्या डब्यासाठी करा इंस्टंट रवाबेसन मसाला इडली! नाश्त्यासाठी परफेक्ट मेन्यू-घ्या रेसिपी

Highlightsरवा बेसन मसाला इडली कशी तयार करायची याची रेसिपी शेफ कुणाल कपूर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

मुलांना डब्यात काय द्यायचं हा प्रश्न प्रत्येक आईला रोजच पडतो. कारण मुलांना भाजी पोळी किंवा मग आपले नेहमीचे तेच ते पदार्थ डब्यात न्यायचे नसतात. त्यांना काहीतरी वेगळं हवं असतं. असं वेगळं काय द्यायचं याचा विचार मग प्रत्येक आईच्या डोक्यात असतो. त्यासाठीच रवा बेसन मसाला इडली हा एक चांगला पर्याय आहे. नेहमीच्या इडल्या करण्यासाठी डाळ- तांदूळ भिजत घालणे, नंतर ते वाटणे ही सगळी कामं करावी लागतात. ही इडली मात्र इंस्टंट असून नेहमीच्या इडलीपेक्षा जास्त चवदारही होऊ शकते (rava besan instant masala idli recipe). नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी हा पदार्थ नक्की ट्राय करून पाहा.(how to make instant rava besan masala idli?)

 

रवा बेसन मसाला इडली रेसिपी

रवा बेसन मसाला इडली कशी तयार करायची याची रेसिपी शेफ कुणाल कपूर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. यासाठी एका भांड्यामध्ये १ कप रवा, अर्धा कप बेसन, १ कप दही आणि चवीनुसार मीठ घाला.

सकाळी उठल्याउठल्या अंग आखडल्यासारखं वाटतं? ५ गोष्टी करा, शरीर होईल कापसासारखं हलकं

याच मिश्रणात थोडी हळद आणि एक ते दिड चमचा पावभाजी मसालाही घाला. आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्या आणि १५ मिनिटांसाठी झाकून घ्या. त्यानंतर त्यात थोडा बेकिंग सोडा घालून त्याच्या इडल्या करून घ्या.

 

आता तोपर्यंत दुसरीकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये तेल घालून ते गरम करून घ्या. या तेलात थोडी हरबरा डाळ आणि थोडी उडीद डाळ घालून ती हलकी परतून घ्या. आता यामध्ये धणे, जिरे आणि बडिशेप घालून परतून घ्या. यानंतर चिरलेला कांदा घालून तो ही परतून घ्या. कांदा परतून झाल्यानंतर गॅस बंद करा. त्यामध्ये थोडा चिंचेचा कोळ, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि किंचित गूळ घाला.

रोज कुकर लावताना ४ गोष्टी नक्की तपासा, कुकरचा स्फोट होऊन दुर्घटना होण्याचा धोका टळेल 

परतून घेतलेले पदार्थ थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून त्याची पेस्ट करून घ्या. यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट घाला. ती पेस्ट थोडीशी पातळ करा आणि त्यात तयार केलेल्या रवा- बेसन इडल्या घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घेतले की रवा बेसन मसाला इडली तयार.. खाऊन पाहा. 


 

Web Title: how to make instant rava besan masala idli, rava besan instant masala idli recipe by chef Kunal Kappor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.