बाजारात वेगवेगळे पाकिटबंद चिप्स मिळतात. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांनाच ते चिप्स खायला खूप आवडतात. प्रवासाला निघालेले असो किंवा सिनेमा पाहताना असो किंवा संध्याकाळी चहा- कॉफीसोबत असो... असे कधीही ते चिप्स अगदी आवडीने खाल्ले जातात. पण त्या पाकिटबंद चिप्समध्ये कित्येक प्रिझर्व्हेटीव्हचा मारा केलेला असतो. त्यामुळे ते आरोग्यासाठी चांगले नसतात. म्हणूनच जर तुम्हाला ते चिप्स आवडत असतील तर पुढे सांगितलेली रेसिपी एकदा ट्राय करून पाहा (how to make instant potato chips at home?). एवढे खमंग कुरकुरीत चिप्स तयार होतील की चवीला विकतच्या चिप्सपेक्षाही भारी लागतील.(Instant Potato Chips Recipe)
बटाट्याचे खमंग, कुरकुरीत इंस्टंट चिप्स करण्याची रेसिपी
साहित्य
२ मध्यम आकाराचे बटाटे
तळण्यासाठी तेल आणि चवीनुसार मीठ, तिखट
उन्हाळ्यात घरात घालण्यासाठी कॉटनचे हलकेफुलके कॉर्ड सेट- ४०० रुपयांत घ्या सुंदर ट्रेण्डी ड्रेस
वेगवेगळे घरगुती मसाले
कृती
बटाट्याचे चिप्स करण्यासाठी लाल बटाटा वापरल्यास जास्त चांगले. किंवा बाजारात चिप्ससाठी एक वेगळा बटाटा मिळतो तो घ्यावा.
बटाटा धुवून त्याची सालं काढून घ्या. यानंतर कढई गॅसवर गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये तेल घाला. आता किसणीने बटाट्याचे चिप्स करून घ्या. तोपर्यंत कढईतलं तेल गरम झालं की त्यात चिप्स घालून तळून घ्या. मंद ते मध्यम आचेवर चिप्स तळावेत जेणेकरून ते जळणार नाही.
चुकूनही चेहऱ्याला लावू नका 'हे' पदार्थ, त्वचा खराब होऊन ऐन तारुण्यातच दिसाल म्हाताऱ्या
तळून झालेले चिप्स चाळणीमध्ये काढावे. त्यावर नुसतं तिखट, मीठ घालून खाल्लं तरी चालतं. पण तुम्हाला जर त्या चिप्सला विकतसारखी चव हवी असेल तर एका वाटीमध्ये आमचूर पावडर, चाट मसाला, काळं मीठ, पुदिना पावडर, चिमूटभर साखर, मीरेपूड, धनेपूड असं सगळं एकत्र करा. आता हा मसाला चिप्सवर घाला. अगदी विकतसारखीच चव चिप्सला येईल. करून पाहा..
Web Summary : Enjoy homemade potato chips without preservatives! This simple recipe uses potatoes, oil, and spices. Skip boiling and drying. Fry thin slices until golden and add your favorite seasonings for a delicious snack, better than store-bought.
Web Summary : घर पर बिना प्रिजर्वेटिव के आलू के चिप्स का आनंद लें! यह आसान रेसिपी आलू, तेल और मसालों का उपयोग करती है। उबालने और सुखाने की झंझट छोड़ें। पतले स्लाइस को सुनहरा होने तक भूनें और स्वादिष्ट नाश्ते के लिए अपनी पसंदीदा सीज़निंग डालें, जो दुकान से बेहतर है।