सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्याला काय करायचे, हा प्रश्न अनेक गृहिणींना दररोज सतावतो. याचबरोबर, काहीवेळा फ्रिजमध्ये ब्रेडचे उरलेले स्लाईस देखील असतात त्याचे काय करायचे, हे समजत नाही. शक्यतो, घरात उरलेले ब्रेड स्लाईस असतील तर आपण ते चक्क फेकून देतो परंतु अशावेळी त्यापासून झटपट आणि चविष्ट पदार्थ तयार करता येतो. ब्रेड स्लाईसचे तयार होणारे इन्स्टंट मेदू वडे हा एक नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय ठरू शकतो. पारंपरिक पद्धतीने मेदू वडे तयार करण्यासाठी डाळ भिजवणे, वाटणे आणि आंबवणे यासाठी खूप वेळ लागतो, पण आता काळजी करण्याची गरज नाही...कमी वेळात, अगदी मोजकेच साहित्य वापरून आणि कोणत्याही झंझटीशिवाय हे इन्स्टंट मेदू वडे तयार करता येतात(how to make instant medu vada with leftover bread slices).
बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे हे ब्रेड स्लाईसचे मेदू वडे चवीलाही उत्तम लागतात आणि पोटभरीचा नाश्ता देखील होतो. फक्त काही मिनिटांत तयार होणारे, कुरकुरीत आणि चविष्ट असे हे मेदू वडे तुमच्या घाईगडबडीच्या वेळी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय आहेत. हे वडे तयार करायला अतिशय सोपे असून, चवीला पारंपरिक (leftover bread slice instant medu vada recipe) पद्धतीने केलेल्या मेदू वड्यांसारखेच लागतात. उरलेल्या ब्रेड स्लाईसचा (bread medu vada instant recipe) उपयोग करून झटपट मेदू वडे कसे तयार करायचे, याची सोपी इन्स्टंट रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. ब्रेड स्लाईस - ८ ते १०
२. बारीक रवा - १ कप
३. कडीपत्ता - ५ ते ७ पाने (बारीक केलेली)
४. चिलीफ्लेक्स - १ टेबलस्पून
५. मीठ - चवीनुसार
६. तेल - तळण्यासाठी
७. पाणी - ग्लासभर
विदर्भ स्पेशल! तुरीच्या दाण्यांचा ‘सोले भात'! अस्सल पारंपरिक वैदर्भिय चव, हिवाळ्यातला खास बेत...
कृती :-
१. सगळ्यात आधी ब्रेडच्या कडा कापून फक्त ब्रेड स्लाईस घेऊन ते पाण्यांत पूर्णपणे भिजवून घ्या.
२. पाण्यातून भिजवून घेतलेले ब्रेड स्लाईस हाताने दाबून त्यातील जास्तीचे पाणी निथळून घ्यावे.
३. मग हे ब्रेड स्लाईस हाताने हलकेच दाब देत कुस्करून त्याचा लगदा करुन घ्यावा.
४. या कुस्करून घेतलेल्या ब्रेड स्लाईसच्या लगद्यामध्ये, बारीक चिरुन घेतलेली कडीपत्याची पाने, चिलीफ्लेक्स व चवीनुसार मीठ घालावे.
ताज्या हिरव्यागार हिवाळी मिरचीचं इन्स्टंट लोणचं, असं तोंडीलावणं की म्हणाल भाजी नको मिरची वाढ!
गोडआंबट चवीचं पारंपरिक वरण करण्याची पाहा घरगुती रेसिपी, वरण-भात तूप म्हणजे सुख...
५. सगळे जिन्नस एकत्रित कालवून एकजीव करून घ्यावे, हाताने हलकेच दाब देत पिठासारखे घट्टसर मळून घ्यावे.
६. तयार पिठाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून त्याला बरोबर मधोमध छिद्र पाडून मेदू वड्याचा आकार द्यावा.
८. कढईत तेल व्यवस्थित गरम करून घ्यावे, गरम तेलात मेदू वडे सोडून दोन्ही बाजुंनी खरपूस असे हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यावेत.
बॅटर न करता इन्स्टंट, झटपट होणारे ब्रेडचे मेदू वडे खाण्यासाठी तयार आहेत. गरमागरम मेदू वडे चटणी आणि सांबार सोबत खाल्ल्यास त्याची चव दुपटीने वाढते.
