दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये 'इडली' हा घरातील प्रत्येकाचाच आवडता पदार्थ आहे. शक्यतो इडली तयार करण्यासाठी इडली पात्र किंवा एका विशिष्ट प्रकारचे स्टँड वापरले जाते. इडली पात्र किंवा इडली तयार करण्याच्या स्टँडचा वापर करून आपण हमखास इडली तयार करतो. परंतु अनेकदा हे इडली पात्र आणि इडली स्टँड स्वच्छ करणे म्हणजे खूपच वेळखाऊ आणि किचकट काम वाटते. इतकेच नाही तर इडली घरीच तयार करायची म्हटलं तर खूप मोठा घाट घालावा लागतो. इडली पात्र, इडली स्टँड पासून पीठ आंबवण्यापर्यंत सगळी जय्यत तयारी करावी लागते. परंतु घरात इडली पात्र किंवा इडली तयार करण्याचा स्टॅन्ड नसताना अचानक इडली करायची वेळ आली, तर अनेकजणी गोंधळून जातात(how to make idli in pressure cooker in 15 min).
घरात सहज उपलब्ध असलेल्या प्रेशर कुकर आणि स्टीलच्या ग्लासच्या मदतीने झटपट, मऊसूत इडली सहज तयार करता येते. वेगळ्या भांड्यांची गरज न पडता ही पद्धत वेळ वाचवणारी आणि अतिशय सोपी आहे. कमी साहित्य, फारशी मेहेनत न घेता आणि झटपट नाश्ता किंवा जेवणासाठी परफेक्ट अशा या स्मार्ट ट्रिकमुळे घरच्या घरी इडली तयार करणं अजून सोपं होत...प्रेशर कुकर आणि रोजच्या वापरातील ग्लासांच्या मदतीने झटपट इडली कशी तयार करायची, याची एक खास ट्रिक पाहूयात. यामुळे इडल्या फक्त छान फुगतच नाहीत, तर दिसायलाही अगदी वेगळ्या आणि आकर्षक दिसतात. स्टँडशिवाय इडली बनवण्याचा हा भन्नाट 'जुगाड' नेमका काय आहे ते पाहा...
प्रेशर कुकर आणि ग्लासच्या मदतीने इडली कशी बनवावी?
जर तुमच्याकडे इडली मेकर नसेल, तर तुम्ही प्रेशर कुकर आणि ग्लासच्या मदतीने अतिशय सोप्या पद्धतीने इडली बनवू शकता.
१. सर्वात आधी इडलीचे पीठ तयार करून घ्या. आजकाल बाजारात रेडीमेड इडली बॅटर देखील सहज उपलब्ध होते, तुम्ही त्याचाही वापर करू शकता.
२. एका प्रेशर कुकर आणि दोन स्टीलचे ग्लास व्यवस्थित ठेवता येतील असे ग्लास घ्या.
३. कुकरमध्ये थोडे पाणी टाका. त्यामध्ये ॲल्युमिनियमची जाळीदार प्लेट ठेवा.
४. आता दोन स्टीलचे ग्लास घ्या आणि त्यांच्या आतील बाजूला ब्रशच्या मदतीने थोडे तेल लावून घ्या. तेल लावल्यामुळे इडली शिजल्यानंतर ग्लासमधून सहज बाहेर निघण्यास मदत होईल.
५. तयार इडली बॅटर ग्लासमध्ये भरा. ग्लास पूर्ण वरपर्यंत भरू नका, कारण इडली वाफेवर शिजताना ती फुलून वरच्या बाजूला येते. जर तुम्ही ग्लास पूर्ण भरला तर पीठ बाहेर येऊ शकते.
उरलेल्या बेरीतूनही निघेल वाटीभर साजूक तूप! पाहा भन्नाट ट्रिक - रवाळ, दाणेदार तुपाची चवच भारी...
६. हे दोन्ही ग्लास कुकरमध्ये ठेवून झाकण लावावे. एक शिट्टी होईपर्यंत किंवा मध्यम आचेवर १० मिनिटे इडली शिजवून घ्यावी.
७. कुकर उघडून ग्लास बाहेर काढावेत. ग्लास प्लेटवर उलटा केला की इडली सहज बाहेर येईल. या इडलीचे गोल काप करून ती चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करावी.
अशाप्रकारे आपण इडली पात्र किंवा इडली स्टँडचा वापर न करता प्रेशर कुकर आणि ग्लासच्या मदतीने इडली तयार करु शकता.
