Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > घरी केलेला मसाला पापड ओलसर- वाकडा होतो? विष्णू मनोहर सांगतात हाॅटेलसारखा मसाला पापड करण्याची ट्रिक

घरी केलेला मसाला पापड ओलसर- वाकडा होतो? विष्णू मनोहर सांगतात हाॅटेलसारखा मसाला पापड करण्याची ट्रिक

Masala Papad Recipe: हॉटेलमध्ये मिळतो तसा मसाला पापड घरी जमतच नाही असं तुम्हालाही वाटत असेल तर ही एक रेसिपी ट्राय करून पाहा...(how to make hotel style masala papad at home?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2025 12:09 IST2025-12-05T12:09:02+5:302025-12-05T12:09:45+5:30

Masala Papad Recipe: हॉटेलमध्ये मिळतो तसा मसाला पापड घरी जमतच नाही असं तुम्हालाही वाटत असेल तर ही एक रेसिपी ट्राय करून पाहा...(how to make hotel style masala papad at home?)

how to make hotel style masala papad at home, trick to make masala papad at home, masala papad recipe  | घरी केलेला मसाला पापड ओलसर- वाकडा होतो? विष्णू मनोहर सांगतात हाॅटेलसारखा मसाला पापड करण्याची ट्रिक

घरी केलेला मसाला पापड ओलसर- वाकडा होतो? विष्णू मनोहर सांगतात हाॅटेलसारखा मसाला पापड करण्याची ट्रिक

Highlightsया दोन ट्रिक वापरून मसाला पापड करून पाहा. बघा त्याला एकदम हॉटेलसारखीच चव येईल. 

मसाला पापड हा अनेकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. हॉटेलमध्ये गेल्यानंतर वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी ते जेवढे आतूर असतात तेवढीच वाट ते मसाला पापडचीही पाहतात. हॉटेलमधे जो मसाला पापड दिला जातो तो अगदी सरळ, सपाट असतो. अजिबात वाकडा- तिकडा झालेला नसतो. शिवाय त्यावर कांदा, टोमॅटो हे ओलसर पदार्थ घालूनही तो अजिबात सादळत नाही.. उडदाचाच नेहमीसारखाच पापड असूनही हॉटेलवाल्यांना तो एवढा छान कसा जमतो असा प्रश्न मसाला पापड खाताना हमखास पडतोच. आता त्याच प्रश्नाचं पाहा हे उत्तर.. शेफ विष्णू मनोहर यांनी अगदी हॉटेलसारखाच मसाला पापड घरी कसा तयार करायचा याची ट्रिक सांगितली आहे..(how to make hotel style masala papad at home?)

 

हॉटेलमध्ये मिळतो तसा मसाला पापड घरी कसा तयार करायचा?

मसाला पापड करण्यासाठी सगळ्यात आधी तर गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा. कढई थोडी पसरट बूड असणारी निवडा. आता या कढईमध्ये भरपूर तेल घालून पापड तळून घ्या.

थंडीमुळे पाय कोरडे पडून काळवंडले? घरच्याघरीच १५ मिनिटांत पेडिक्युअर करा- पाय होतील स्वच्छ, कोमल

तळून घेतलेला पापड जसा तुम्ही कढईच्या बाहेर काढाल तसाच तो एका ताटामध्ये घ्या आणि कॉटनचा स्वच्छ कपडा घेऊन पापड तळताना जिथे जिथे वाकला आहे, तो भाग सपाट करून घ्या. पापड थोडा गरम असताना तुम्ही तो या पद्धतीने सरळ करून घेतला तर तो अगदी हॉटेलमध्ये असतो तसा सपाट होईल.

 

आता टोमॅटो चिरल्यानंतर त्यातून सगळ्यात जास्त पाणी बाहेर येतं. त्यामुळे टोमॅटो चिरून झाल्यानंतर तो ३० ते ३५ सेकंदासाठी गरम तव्यावर टाका आणि त्याचवेळी त्याच्यातलं जास्तीचं पाणी कॉटनच्या कपड्याने टिपून घ्या.

पनीरची भाजी नेहमीचीच, आता पनीर घोटाळा करून खा, चव अशी भारी की एखादी पोळी जास्तच खाल

ही क्रिया करताना टाेमॅटो जळणार नाही किंवा त्याला भाजका वास लागणार नाही याची काळजी घ्या. यानंतर जेव्हा तुम्ही टोमॅटो पापडवर घालाल तेव्हा पापड अजिबात ओलसर होणार नाही. या दोन ट्रिक वापरून मसाला पापड करून पाहा. बघा त्याला एकदम हॉटेलसारखीच चव येईल. 


 

Web Title : शेफ विष्णु मनोहर की होटल जैसे मसाला पापड़ की आसान ट्रिक

Web Summary : होटल जैसा मसाला पापड़ बनाना चाहते हैं? शेफ विष्णु मनोहर ने एक आसान ट्रिक बताई है। पापड़ को तलें, कपड़े से सपाट करें। टमाटरों को गरम करके अतिरिक्त नमी निकालें और फिर टॉपिंग करें। अब स्वादिष्ट मसाला पापड़ का आनंद लें!

Web Title : Chef Vishnu Manohar's trick for hotel-style masala papad at home.

Web Summary : Want perfect masala papad like hotels? Chef Vishnu Manohar shares a trick. Fry papad, flatten with cloth. Briefly heat tomatoes to remove excess moisture before topping. Enjoy non-soggy, delicious masala papad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.