संध्याकाळच्या नाश्त्यात मुलांना काही तरी चटपटीत हवं असतं.(Indian Snack) त्यासाठी ते कायम काही ना काही तरी खाण्यासाठी मागत असतात.(Breakfast Idea) बाहेरुन काहीतरी मागवूयात किंवा हॉटेलात जाऊन काही तरी खाऊयात. पण सतत बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होतो.(Tasty healthy food) हल्ली मुलांना पिझ्झा, बर्गर आणि फ्राइजसारख्या गोष्टी खायला अधिक आवडतात. (Kids lunchbox idea)
बर्गर हा मुलांच्या आवडीचा पदार्थ. बाजारात मिळणारा बर्गरचा पाव हा मैदाचा असतो.(Healthy Indian-style wrap recipe) ज्यामुळे आरोग्याला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.(Chapati burger patties) जर आपल्याला हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ बनवायचा असेल तर चपाती बर्गर पॅटीज रॅप बनवून मुलांना खाऊ घालू शकतो.(Homemade burger wrap) हा घरी बनवल्यामुळे हेल्दी आणि टेस्टी असेल. पाहूया घरच्या घरी हेल्दी बर्गर बनवण्याची सोपी कृती.
Shravan Food : साबुदाणा न वापरता करा उपवासाचा बटाटावडा- एकदम कुरकुरीत आणि पोटभरीचा
साहित्य
बटाटे- ४
गाजराचे तुकडे - १ वाटी
हिरवे वाटाणे - १ वाटी
पाणी - आवश्यकतेनुसार
मीठ - चवीनुसार
लाल तिखट - १ चमचा
धने पावडर - १ चमचा
गरम मसाला - १ चमचा
हळद - १ चमचा
तांदळाचे पीठ - २ चमचे
तेल
मळलेल कणिक
श्रावण स्पेशल: साबुदाणा अजिबात न वापरता करा पचायला हलके उपवासाचे मऊसूत लाडू, आठवडाभर टिकतील
कृती
1. सगळ्यात आधी बटाटे, गाजर आणि वाटाणे व्यवस्थित धुवून स्वच्छ करा. आता कुकरमध्ये बटाटे, गाजराचे तुकडे आणि हिरवे वाटाणे घाला. त्यात ३ ते ४ कप पाणी आणि मीठ घालून कुकरचे झाकण बंद करा. ३ ते ४ शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करुन थंड होण्यास ठेवा.
2. कुकर थंड झाल्यानंतर त्यातील बटाटे काढून घ्या. बटाट्याचे सालं काढून मॅश करुन घ्या. आता शिजवलेले गाजर आणि वाटाण्यातील पाणी काढून घ्या. या दोघांनाही व्यवस्थित मॅश करुन घ्या. मॅश केलेले बटाटे आणि गाजराचे मिश्रण एकत्र करा. आता त्यात लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला, मीठ, हळद आणि तांदळाचे पीठ घालून व्यवस्थित एकजीव करा.
3. हाताला तेल लावून याचे व्यवस्थित गोळे करा. तयार गोळ्यांचे पॅटीज बनवून घ्या. आता कढईत तेल गरम करुन बर्गर पॅटीज मंद आचेवर शॅलो फ्राय करुन घ्या. त्यानंतर कणिक मळून त्याचे गोळे तयार करा. चपाती लाटून अर्धी कच्ची भाजा.
4. आता चपातीच्या एका भागाला थोडेसे कट करुन घ्या. एका भागात कोबीची पाने, टोमॅटो घाला. त्यानंतर दुसऱ्या भागात तयार पॅटीज, तिसऱ्या भागात चीज आणि चौथ्या भागात सॉस घालून त्यावर टोमॅटो आणि कांद्याचे काप ठेवा. चारही बाजू व्यवस्थित पॉकेटसारखे बंद करा. तव्यावर नीट फ्राय करुन घ्या. तयार होईल चपाती बर्गर...