गाजराचा हलवा हा हिवाळ्यातला खास पदार्थ. त्यामुळेच हिवाळ्यातल्या लग्नसराईत कित्येक लग्नांमध्ये गाजराचा हलवा असतोच. आता लग्नकार्यात जो गाजराचा हलवा केला जातो तो आपल्या घरी होणाऱ्या हलव्यापेक्षा खूप जास्त चवदार असतो, असं अनेकांचं मत आहे. त्यामुळेच तुम्हीही जर लग्नसराईमध्ये केल्या जाणाऱ्या गाजर हलव्याचे शौकिन असाल तर गाजराचा हलवा करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवा (Winter Special Gajar ka Halwa Recipe). कारण याच काही गोष्टी लग्नामधले आचारी किंवा हलवाई करतात आणि त्यामुळेच त्यांनी केलेल्या गाजराच्या हलव्याची चव अगदी वेगळी होते...(how to make halwai style shaadi wala gajar ka halwa at home?)
लग्नात करतात तसा खमंग गाजर हलवा करण्यासाठी टिप्स....
१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गाजराचा हलवा जर चवदार हवा असेल तर गाजर मिक्सरमधून काढून किंवा ते शिजवून त्याचा हलवा करू नका. थोडे कष्ट जास्त पडतील पण गाजर किसूनच गाजराचा हलवा करा. कारण त्याची चव खूप वेगळी होते.
डोश्याचा तवा तेलकट, चिकट झाला? बघा सोपी ट्रिक- ५ मिनिटांत तवा नव्यासारखा स्वच्छ होईल
२. गाजर हलवा करताना तूप थोडं मोकळ्या हातानेच घाला. कारण भरपूर तूप घातल्यानंतरच तो हलवा छान खमंग लागतो.
३. गाजराचा किस अगदी तांबूस रंगाचा होईपर्यंत तो तुपामध्ये परतत राहावा. गाजराचा किस तुम्ही जेवढा खमंग परतून घ्याल तेवढी हलव्याची चव खुलत जाते. तुपामध्ये गाजराचा किस परतत असताना गॅस नेहमी मंद ते मध्यम आचेवरच ठेवावा. मोठा गॅस केल्यास हलव्याला जळकट वास लागतो.
४. घरी गाजराचा हलवा करताना आपण त्यात जे दूध घालतो ते तापवून घेतलेलं असतं आणि त्याची साय काढून घेतलेली असते. पण तुम्हाला लग्नातल्यासारख्या गाजर हलव्याची चव हवी असेल तर हलवा करताना त्यात नेहमी निरसं, साय न काढलेलं दूध घाला. हलवा आणखी जास्त चवदार होण्यासाठी तुम्ही त्यात खवाही घालू शकता.
पांढरे केस होतील काळे! फक्त १ चमचा काळे तीळ घेऊन करा 'हा' उपाय, केस गळणंही थांबेल
५. हलव्यामध्ये घालायचा सुकामेवा नेहमी तुपामध्ये तळूनच घ्या.
६. सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे जेव्हा हलवा पुर्ण तयार असेल तेव्हा गॅस बंद करा आणि हलव्यावर थोडं तूप सोडा. वरतून सोडलेल्या तुपामध्ये हलव्याला एकदम रिच फ्लेवर येतो. ट्राय करून पाहा.
