उन्हाळा सुरु झाला की, मुलांना सुट्ट्या लागतात. या काळात गारवा देणारे पेय किंवा पदार्थ खावेसे वाटतात.(Gluten-Free Muffins Recipe for Kids) मुलांना सुट्ट्या लागल्या की, सतत उन्हात त्यांना खेळावेसे वाटते. त्यामुळे त्यांना भूक लागते.(Healthy Muffins with Jowar and Jaggery) पाणी पिऊन पोट भरले असेल तरी आरोग्याला काही हेल्दी पौष्टिक पदार्थांची गरज असते. भाजी-चपाती खाताना मुले नाक मुरडतात. अशावेळी मुलांना नेमके काय खाऊ घालावे असा प्रश्न पालकांना पडतो. (Jowar Jaggery Muffins for Children)
आपल्यालाही असा प्रश्न पडला असेल तर मुलांसाठी साखर आणि मैदा न घालता बनवा मफिन्स. (Gluten-Free Summer Snacks for Kids)यामध्ये आपण मैदाऐवजी ज्वारीचे पीठ घालू शकतो. ज्वारीमध्ये असणारे तंतूमय घटक पचनास फायदेशीर ठरतात. यातील मॅग्नेशिअम, तांबे आणि कॅल्शियम हाडे आणि ऊती मजबूत करतात. यामुळे ब्लडप्रेशर देखील नियंत्रणात राहाते. आतड्यांसह हृदयाचे आरोग्य देखील मजबूत राहाते. ग्लूटन फ्री ज्वारीचे मफिन्स कसे बनवायचे पाहूया रेसिपी. (Easy Gluten-Free Muffins for Kids’ Snack)
Summer Special : उन्हाळ्यात महाराष्ट्रीयन कोशिंबीरीची चव काही खास, पाहा कोशिंबीरीचे ८ आंबटगोड प्रकार
साहित्य
तेल - १/४ कप
गूळ पावडर - १/२ कप
इसेंन्स - १/२ चमचा
ज्वारीचे पीठ - ३/४ कप
बेकिंग पावडर - ३/४ चमचा
बेकिंग सोडा - १/२ चमचा
दूध - १/४ कप
दही - १/४ कप
चॉको चिप्स - आवडीनुसार
अक्रोड - आवडीनुसार
कृती
1. सगळ्यात आधी एका भांड्यात तेल, गुळाचा पावडर आणि इसेंन्स घालून चांगले फेटून घ्या.
2. त्यात दूध आणि दही घालून पुन्हा फेटून घ्या. आता यामध्ये ज्वारीचे पीठ, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घाला.
3. मिश्रणाला चांगले फेटून घ्या. त्यानंतर मफिन्सच्या पेपरला बटर लावून त्यात तयार मिश्रण घाला.
4. वरुन चॉको चिप्स आणि अक्रोड घालून ओव्हनमध्ये १८० डिग्रीवर २० मिनिटे प्रीहिट करा.
5. तयार होतील ज्वारीचे ग्लूटन फ्री मफिन्स. मुलेही आवडीने खातील.