Join us

उत्तरप्रदेशातल्या पारंपरिक गुजिया यंदा होळीला खाऊन तर पाहा! अस्सल देसी गोड पदार्थ- रेसिपीही सोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2023 19:03 IST

Holi Special : How to make Gujiya Recipe for Holi at Home गुजिया हा उत्तर भारतातला खास होळी स्पेशल पदार्थ, यंदा त्याचीही चव चाखून पाहा..

होळीचा लय भारी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. होळी, धुळवड, रंगपंचमी, अशी कितीतरी नावं लाभलेला हा सण प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. भारतात विविध प्रांतातील लोकं आपल्या शैलीनुसार सण साजरा करतात. होळी हा सण फक्त रंगासाठी नाही तर, खाद्यपदार्थांसाठी देखील लोकप्रिय आहे. यादिवशी गोडाचा पदार्थ बनवून प्रियजनांचे तोंड गोड करण्यात येते.

महाराष्ट्रात पारंपारिक पद्धतीने पुरणपोळी बनवली जाते, तर उत्तर भारतात थंडाई व फेमस गुजिया हा पदार्थ बनवला जातो. करंजीप्रमाणे दिसणारी ही मिठाई चवीला गोड - खुसखुशीत लागते. याच्या सारणात खव्याचा समावेश असतो. आपण हा पदार्थ तयार करून बरेच दिवस घरी साठवूनही ठेऊ शकता. बाजारातून गुजिया आणण्यापेक्षा आपण घरी पारंपारिक पद्धतीने हा पदार्थ बनवू शकता. चला तर मग या खुसखुशीत गोड पदार्थाची कृती पाहूयात(Holi Recipe: Celebrate Holi With Traditional Gujiya Filled With Khoya And Saffron Bliss).

गुजियासाठी लागणारं साहित्य

खवा

रवा

तूप

ड्रायफ्रुट्स

मैदा

पाणी

तेल

मीठ

गुलाबजल

वांग्याचे काप करण्याची पारंपरिक खमंग रेसिपी! तोंडाला चव येईल असा मस्त झटपट पदार्थ

कृती

सर्वप्रथम, पॅन गरम करत ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यात खवा घाला. चमच्याने खवा सतत ढवळत राहा. सोनेरी रंग येऊपर्यंत खव्याला चांगले सुटसुटीत भाजून घ्या. खवा भाजून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. आता त्याच  पॅनमध्ये तूप घाला, तूप गरम झाल्यानंतर रवा घालून भाजून घ्या. रव्याला सोनेरी रंग आला की, त्यात आपल्या आवडीचे ड्रायफ्रुट्स बारीक चिरून घाला. हे दोन्ही मिश्रण एकत्र ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्या. आता त्यात भाजून घेतलेला खवा मिक्स करा. व हे तयार मिश्रण बाऊलमध्ये काढून घ्या. मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात पिठीसाखर घालून मिक्स करा. अशा प्रकारे, गुजियामधील सारण रेडी.

आता दुसरीकडे, एका बाऊलमध्ये मैदा घ्या, त्यात ३ टेबलस्पून तूप मिक्स करा. मिक्स झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, गुलाबजल आणि पाणी मिसळून पीठ घट्ट मळून घ्या. पीठ मळून झाल्यानंतर त्यावर कापड ठेवा, थोड्यावेळासाठी पीठ भिजत ठेवा.

अशा प्रकारे, पीठ आणि सारण रेडी झालेलं आहे, आता पीठाचे बारीक गोळे तयार करा, त्याची पुरी लाटून घ्या. आता त्यात सारण भरून करंजीचा आकार द्या. कढईत तेल गरम करत ठेवा, तेल गरम झाल्यानंतर त्यात गुजिया तळून घ्या. ब्राऊन रंग येईपर्यंत गुजिया खरपूस भाजून घ्या. अशा प्रकारे होळी स्पेशल खुसखुशीत गुजिया खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स