Join us

गौरी- गणपतीच्या नैवेद्याला हवीच गिलक्याची खमंग, खुसखुशीत भजी- घ्या परफेक्ट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2025 14:51 IST

How to Make Gilkyachi Bhaji: एरवी आपण गिलक्यांची भजी खात नाही. पण गौरी गणपतीच्या नैवेद्यामध्ये मात्र त्यांचा मोठाच मान असतो.

ठळक मुद्देमहालक्ष्मी किंवा गौरींच्या नैवेद्यात तर गिलक्याची भजी हमखास असतातच.

गौरी गणपतीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या सणांचा उत्साह सगळीकडे सारखाच असला तरी प्रथा आणि परंपरा मात्र प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या असतात. गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी असणाऱ्या पदार्थांमध्येही खूप विविधता दिसून येते. पण काही पदार्थ मात्र सगळ्याच ठिकाणी नैवेद्याच्या ताटामध्ये असतात. त्यापैकी एक पदार्थ म्हणजे गिलक्याची भजी. महालक्ष्मी किंवा गौरींच्या नैवेद्यात तर गिलक्याची भजी हमखास असतातच. पण गणपतीच्या नैवेद्यासाठीही गिलक्याची भजी केली जातात. ती भजी चवदार आणि खमंग कशी करायची ते पाहूया..

गिलक्यांची भजी करण्याची रेसिपी

 

साहित्य

२ गिलके

१ वाटी बेसन 

पाव वाटी रवा

१ चमचा मोहन

सणासुदीला नाकात हवीच ठसठशीत मराठमोळी नथ, अगदी १०० रुपयांत सुंदर डिझाईन्स, बघा नवे पॅटर्न

१ टीस्पून ओवा

१ टीस्पून लाल तिखट

धणे आणि जिरेपूड प्रत्येकी एकेक चमचा

चवीनुसार मीठ

 

कृती

गिलक्यांची भजी करण्यासाठी सगळ्यात आधी गिलके स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचे बारीक बारीक काप करून घ्या.

यानंतर एका भांड्यामध्ये बेसन पीठ आणि रवा घ्या. त्यात आधी मोहन घाला. रव्यामुळे गिलक्याची भजी गचका न होता थोडी कुरकुरीत होतात.

विराट कोहलीच्या ४ फिटनेस टिप्स बदलून टाकतील तुमचंही आयुष्य, व्हाल विराट इतकेच एनर्जेटिक

आता त्यामध्ये तिखट, मीठ, ओवा, जिरेपूड, धणेपूड असं सगळं घाला आणि पाणी टाकून पीठ सरसरीत भिजवून घ्या. 

आता भिजवलेल्या पिठामध्ये गिलक्यांचे काप घाला. गिलके खूप आधीपासून चिरून ठेवू नका. अगदी ऐनवेळी चिरावे.

आता बटाट्याचे किंवा कांद्याचे भजी करतो तसेच गिलक्याची एकेक फोड पिठामध्ये छान कालवून घ्यावी आणि कढईत अलगदपणे तळणासाठी सोडून द्यावी. 

 

टॅग्स :गणेशोत्सव 2025पाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्न