गाजर हलवा करताना अनेकजणींना सगळ्यात मोठी अडचण वाटते ती गाजर किसत बसण्याची. कारण गाजर किसत बसण्यात खूप वेळ जातो. शिवाय ज्या घरांमध्ये खूप सदस्य असतात, त्यांना खूप जास्त हलवा करावा लागतो आणि मग गाजर किसून किसून हात गळून येतो. दुखायला लागतो. त्यामुळे मग तो गाजराचा हलवा करायलाच नको, असं होऊन जातं. म्हणूनच आता गाजर न किसता हलवा कसा करायचा ते पाहूया. यामध्ये गाजर किसण्यात तुमचा अजिबात वेळ जाणार नाही आणि शिवाय गाजर किसून किसून हात गळून येण्याचं टेन्शनही नाही..(cooking tips for making gajar ka halwa with no grating carrots)
गाजर न किसता गाजराचा हलवा कसा करायचा?
या रेसिपीने गाजराचा हलवा करण्यासाठी सगळ्यात आधी गाजर स्वच्छ धुवून घ्या. गाजराची पुढची आणि मागची टोकं काढून टाका. यानंतर गाजराची सालं काढून घ्या.
रेस्टॉरंटसारखी चमचमीत मटार मेथी करण्याची सोपी ट्रिक- महागडे काजू, बटर, क्रिम घालण्याचीही गरज नाही
आता त्यानंतर गाजराचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या. गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये गाजराचे तुकडे घाला. ते सगळे तुकडे बुडतील एवढं दूध घाला. कढईवर झाकण ठेवून द्या आणि गाजरं दुधामध्ये शिजवून घ्या. जशी जशी गाजरं शिजत जातील तसं तसं दूध आटत जाईल.
दूध सगळं आटून झाल्यानंतर एक मॅशर घ्या आणि उकडलेले गाजर मॅश करून घ्या. यानंतर त्यामध्ये बटर किंवा तूप घाला आणि हलवा चांगला परतून घ्या. यानंतर सगळ्यात शेवटी साखर, वेलची पूड घाला.
त्वचेच्या सगळ्या समस्या चुटकीसरशी दूर होतील, पपईची सालं 'या' पद्धतीने वापरा- त्वचेवर येईल रौनक...
हे सगळं पुन्हा १० ते १२ मिनिटे चांगलं परतून घेतलं की गरमागरम गाजर हलवा झाला तयार. यामध्ये थोडा तुमच्या आवडीचा सुकामेवा घाला आणि गारेगार थंडीत गरमागरम गाजर हलवा खाण्याचा आस्वाद घ्या.
Web Summary : Make carrot halwa without grating! Simply boil chopped carrots in milk, mash, then sauté with ghee, sugar, and cardamom. Enjoy this quick, delicious dessert.
Web Summary : बिना कसे गाजर का हलवा बनाएं! बस कटे हुए गाजर को दूध में उबालें, मैश करें, फिर घी, चीनी और इलायची के साथ भूनें। इस त्वरित, स्वादिष्ट मिठाई का आनंद लें।