Join us  

नेहमीच्याच पोह्यांना द्या इंदोरी तडका! बघा इंदोरी पोहे करण्याची परफेक्ट रेसिपी, १० मिनिटांत गरमागरम पोहे तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2023 4:03 PM

How To Make Indori Poha: इंदोरी पाेहे करण्याची मस्त रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी शेअर केली आहे (Indori pohe recipe by chef Kunal Kapoor). बघा १० मिनिटांत कसे करायचे गरमागरम वाफाळते इंदोरी पाेहे....

ठळक मुद्देइंदोरी पोहे रेसिपी फेमस आहे. म्हणूनच आता नेहमीपेक्षा जरा वेगळ्या स्टाईलने पोहे करून पाहा.

पोहे हा अनेकांचा विक पॉईंट आहे. नाश्त्याला गरमागरम वाफाळते पोहे असणारी प्लेट हातात आली की आहाहा... क्या बात है.. सगळा दिवसच कसा मग मस्त जातो. शिवाय त्यासोबत जर लिंबू किंवा लोणच्याची फोड मिळाली तर मग काही विचारायलाच नको. तसं पाहायला गेलं तर पोहे करण्याच्या अनेक पद्धती आहे. त्यापैकी इंदोरी पोहे रेसिपी फेमस आहे (How to make Indori poha). म्हणूनच आता नेहमीपेक्षा जरा वेगळ्या स्टाईलने पोहे करून पाहा. इंदोरी पोहे कसे करायचे, याची रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Indori pohe recipe by chef Kunal Kapoor) यांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे. (easy recipe for making Indori pohe in just 10 minutes)

 

इंदोरी पोहे करण्याची रेसिपी

साहित्य

२ वाट्या पोहे

१ टीस्पून हळद

चवीनुसार मीठ

१ टीस्पून साखर

वेटलॉससाठी हिवाळ्यातले 'हे' ५ सुपरफूड खायला विसरू नका

फोडणीसाठी तेल, हिंग आणि मोहरी

कढीपत्त्याची ५ ते ७ पाने

२ टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे 

१ टेबलस्पून डाळिंबाचे दाणे

१ टेबलस्पून जाड शेव किंवा फरसाण

आवडीनुसार १ किंवा २ हिरव्या मिरच्या

 

रेसिपी 

सगळ्यात आधी पोहे स्वच्छ धुवून भिजवून घ्या. भिजवलेल्या पोह्यांमध्ये हळद, मीठ आणि साखर टाका आणि सगळं मिश्रण व्यवस्थित कालवून घ्या.

सततच्या सर्दी- खोकल्याने वैतागलात? १ आयुर्वेदिक उपाय करा, २ दिवसांतच मिळेल आराम- कफ होईल कमी

आता गॅसवर कढई तापायला ठेवा. त्यात तेल, मोहरी, हिंग टाकून फोडणी करून घ्या.

फोडणी करून झाली की शेंगदाणे आणि कढीपत्ता टाकून परतून घ्या.

यानंतर कांदा आणि हिरव्या मिरच्या टाकून परतून घ्या.

 

आता त्यात अर्धी वाटी पाणी टाका. पाण्याला उकळी आली की मग भिजवलेले पोहे टाकून चवीनुसार मीठ घालून सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि कढईवर झाकण ठेवून वाफ येऊ द्या.

वजन वाढू नये यासाठी ५ सवयी स्वत:ला लावून घ्या- बॉडी होईल डिटॉक्स- वाचा आहारतज्ज्ञांचा सल्ला

वाफ आली की पोहे प्लेटमध्ये सर्व्ह करा. त्यावर डाळिंबाचे दाणे आणि शेव टाका. सोबतीला एखादी लिंबाची फोड द्या.. चवदार गरमागरम, वाफाळते इंदोरी पोहे झाले तयार... 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीकुणाल कपूर