Tap to Read ➤

वेटलॉससाठी हिवाळ्यातले 'हे' ५ सुपरफूड खायला विसरू नका

हिवाळा हा शरीर कमावण्याचा ऋतु. म्हणूनच वर्षभर ठणठणीत राहायचं असेल तर हिवाळ्यात सुपरफूड ठरणारे हे ५ पदार्थ खायला विसरू नका...
हे पदार्थ तुम्हाला भरपूर उर्जा तर देतीलच, पण वजन कमी करणाऱ्यांसाठीही विशेष फायदेशीर ठरतील.
यापैकी पहिला पदार्थ म्हणजे बाजरी. बाजरी उष्ण असल्याने ती हिवाळ्यात खाणं उत्तम मानलं जातं. कोलेस्टरॉल, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी बाजरी उत्तम आहे. बाजरीतील घटकांमुळे एजिंग प्रोसेसही हळू होते.
मक्यामध्ये प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात. त्यामुळे वेटलॉससाठी ते उत्तम आहे.
तिळामध्ये कॉपर, मॅंगनीज, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह, सेलेनियम यांचे प्रमाण चांगले असते. तसेच तीळ खाल्ल्याने केस आणि त्वचेलाही पोषण मिळते.
रताळ्यांमध्ये व्हिटॅमिन बी आणि सी, ॲण्टीऑक्सिडंट्स, बीटा केरॉटीन योग्य प्रमाणात असते. तसेच त्यात फायबर भरपूर प्रमाणात असल्याने अधिककाळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वेटलॉससाठी ते उत्तम आहे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आणि हाडांच्या मजबुतीसाठी थंडीमध्ये डिंक खायला पाहिजे.
क्लिक करा