श्रावणी सोमवारचा उपवास खूप खास असतो. कारण घरात सगळ्यांनाच उपवास असल्याने उपवासाचे वेगवेगळे पदार्थ हमखास खायला मिळतात. साबुदाणा खिचडी, खमंग भाजणीचे पीठ हे तर सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ आहेतच. पण या पदार्थांसोबत जर छान खमंग कुरकुरीत डोसा उपवासाच्या दिवशी खायला मिळाला तर... म्हणूनच आता ही एक रेसिपी ट्राय करून पाहा. या रेसिपीनुसार तुम्हाला अगदी १५ मिनिटांत उपवासाचा डोसा खायला मिळेल (how to make dosa for fast?). शिवाय उपवासाच्या दिवशी थोडी चव बदलही होईल (upvasacha dosa recipe in Marathi). बघा हा डोसा नेमका कसा करायचा..(instant dosa for shravani somvar fast)
उपवासाचा डोसा रेसिपी
उपवासाचा डोसा कसा करायचा याची रेसिपी शेफ स्मिता देव यांनी साेशल मीडियावर शेअर केली आहे.
साहित्य
१ वाटी साबुदाणा
२ वाट्या भगर
शाळेतून घरी आल्यानंतर मुलांना ३ प्रश्न नक्की विचारा- शाळेत ते नेमकं काय करतात परफेक्ट कळेल
२ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
२ ते ३ हिरव्या मिरच्या
चवीनुसार मीठ
४ टेबलस्पून दही
कृती
सगळ्यात आधी बटाटे उकडून घ्या आणि साबुदाणा मध्यम आचेवर हलका सोनेरी रंगाचा होईपर्यंत खमंग भाजून घ्या.
गुलाबाचं रोप नुसतंच वाढतं- फुलांचा पत्ताच नाही? ४ पदार्थ मातीत मिसळा- रोपांना येतील फुलंच फुलं
यानंतर भाजून घेतलेला साबुदाणा थंड झाल्यानंतर तो मिक्सरच्या भांड्यात घाला.
त्यामध्येच २ वाट्या भगर, उकडलेल्या बटाट्याचे बारीक काप, २ हिरव्या मिरच्या, दही असे सगळे पदार्थ घाला आणि ते मिक्सरमधून चांगले बारीक वाटून घ्या.
यानंतर मिक्सरमधले पीठ एका भांड्यात काढून घ्या. त्यामध्ये आणखी थोडे पाणी घालून पीठ अगदी सरसरीत करून घ्या. यानंतर चवीनुसार मीठ घाला.
कमी वयातच मुलींना पाळी का येते? तज्ज्ञांनी सांगितली ४ मुख्यं कारणं, मुलींची काळजी घेण्यासाठी...
आता डोसा करण्याच्या तवा गॅसवर गरम करून त्याला तेल लावून घ्या. यानंतर नेहमीप्रमाणे तयार केलेल्या पिठाचे डोसे करा. शेंगदाण्याच्या चटणीसोबत उपवासाचा डोसा अगदी मस्त लागतो. मुलांना कधीतरी डब्यात देण्यासाठीही हा पदार्थ अगदी उत्तम आहे.