ढोकळा हा पदार्थ लहानांपासून- मोठ्यांपर्यंत अनेकांना खायला आवडतो. सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची छोटी भूक गरमागरम, मऊ आणि जाळीदार ढोकळा समोर आला की त्यावर ताव मारल्याशिवाय कुणीच राहू शकत नाही. पण अनेकदा घरी ढोकळा बनवताना तो मऊ किंवा स्पंजी होत नाही.(dhokla recipe) कधी कडक होतो तर कधी व्यवस्थित फुगत नाही. आपल्याकडे ढोकळ्याचे स्टीमर असले तरी तो आतून कच्चा राहतो. पण आपण कुकरमध्ये अवघ्या काही मिनिटांत मऊ-जाळीदार ढोकळा बनवू शकतो. (khaman dhokla recipe step by step)
कुकरचा वापर करुन विकत मिळतो तसा कापसासारखा मऊ आणि जाळीदार ढोकळा बनवू शकता.(Tips to make perfect soft dhokla) हा ढोकळा इतका हलका आणि चवदार होतो की तोंडात टाकताच विरघळेल. कोणतीही फॅन्सी भांडी न वापरता, स्वयंपाकघरातील साहित्यांनी आपण विकतपेक्षा हलका ढोकळा घरीच करु शकतो. पाहूया रेसिपी.
साहित्य
पीठ (Batter) तयार करण्यासाठी:
बेसन: १ कप
दही: १/२ कप
पाणी: १/२ कप (गरजेनुसार थोडे जास्त)
लिंबाचा रस: १ छोटा चमचा
साखर: १ छोटा चमचा
आले-हिरवी मिरची पेस्ट: १ छोटा चमचा
इनो (Eno): १ पाकीट (किंवा १ छोटा चमचा बेकिंग सोडा)
मीठ: चवीनुसार
फोडणीसाठी (Tadka):
तेल: १ मोठा चमचा
मोहरी: १ छोटा चमचा
हिरव्या मिरच्या: २ (उभ्या चिरलेल्या)
कढीपत्ता: ७ ते ८ पाने
पाणी: १/२ कप
साखर: १ छोटा चमचा
कृती
1. सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यात बेसन, दही आणि पाणी एकत्र करुन चमच्याने फेटून गुळगुळीत पेस्ट तयार करा. पिठात गुळळ्या राहणार नाही याची काळजी घ्या.
2. आता या पिठात चवीनुसार मीठ, साखर, लिंबाचा रस, आले-हिरवी मिरची पेस्ट घालून मिश्रण चांगले एकजीव करा. हे पीठ १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा, ज्यामुळे बेसन फुलण्यास मदत होईल.
3. गॅसवर कुकर ठेवा आणि त्यात १ ग्लास पाणी घाला. कुकरच्या आत एक छोटा स्टीलचा स्टँड किंवा वाटी उलटी करुन ठेवा. ढोकळ्याचे बॅटर ओतण्यासाठी केकचे भांडे किंवा छोटी थाळी घ्या. त्याला आतून थोडे तेल किंवा तूप लावून ग्रीस करा.
4. ढोकळ्याचे पीठ खूप जाडसर वाटत असेल तर त्यात थोडे पाणी घाला. नंतर इनो किंवा बेकिंग सोडा घाला आणि एकाच दिशेने चमचा फिरवा. इनो टाकल्यावर पीठ लवकर फुलेल. हे फुगलेले पीठ तेल लावलेल्या भांड्यात ओता आणि भांडे कुकरमधील स्टँडवर ठेवा.
5. मंद आचेवर ढोकळा १५ ते २० मिनिटे शिजवून घ्या. कुकरचे झाकण लावताना त्याची शिट्टी काढून लावा. २० मिनिटांनी कुकर उघडून ढोकळ्याच्या मध्यभागी चाकू किंवा टूथपिक घालून तपासा. जर चाकू साफ बाहेर आला, तर ढोकळा तयार आहे. ढोकळा पूर्ण थंड झाल्यावर कडा मोकळ्या करून प्लेटमध्ये काढा आणि चाकूने चौकोनी तुकडे करून घ्या.
6. फोडणी पात्रात तेल गरम करुन त्यात मोहरी, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालून तडका द्या. ही फोडणी ढोकळ्याच्या वर ओता. तयार होईल मऊ- सॉफ्ट ढोकळा.
Web Summary : Make soft, spongy Dhokla at home in a cooker in 20 minutes! This simple recipe uses kitchen ingredients for a delicious, light Dhokla that melts in your mouth. Perfect for snacks or breakfast; no fancy equipment needed.
Web Summary : घर पर कुकर में 20 मिनट में नरम, स्पंजी ढोकला बनाएं! यह आसान रेसिपी स्वादिष्ट, हल्का ढोकला बनाने के लिए रसोई सामग्री का उपयोग करती है जो मुंह में पिघल जाती है। नाश्ते के लिए बिल्कुल सही; किसी फैंसी उपकरण की जरूरत नहीं।