Join us

दही भेंडी ‘अशी’ करा फक्त १० मिनिटांत, भेंडी आवडत नाही म्हणणारेही खातील चाटूनपुसून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2025 20:00 IST

Dahi Bhindi Recipe : Dhaba Style Dahi Bhindi : dahi wali bhindi recipe : How To Make Dahi Bhendi At Home : मस्त घट्ट चमचमीत ग्रेव्ही असणारी रेस्टोरंन्ट स्टाईल दही भेंडी १० मिनिटांत करण्याची परफेक्ट रेसिपी...

'भेंडी' ची  भाजी म्हटलं की, घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच नाकं मुरडतात. भरपूर बिया असणारी, चिकचिकीत भेंडी फारशी कुणाला आवडत नाही. काहीवेळा जेवणाच्या ताटात भेंडीची (Dahi Bhindi Recipe) भाजी बघून नको म्हणून मान डोलावली जाते. भेंडीची भाजी म्हटलं की नको पण तीच भाजी जरा हटके स्टाईलने (Dhaba Style Dahi Bhindi) तयार केली तर अगदी बोट चाटत, ताट पुसून, जिभल्या चाटत ही भाजी गट्टम केली जाते. मसाला भेंडी, भरली भेंडी, कुरकुरी भेंडी, दही भेंडी अशा वेगवेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी अनेक प्रकारे करता येऊ शकते( dahi wali bhindi recipe).

हॉटेलमध्ये गेल्यावर आपण काहीवेळा थोडं वेगळं खावंसं वाटलं की, मस्त घट्ट चमचमीत ग्रेव्ही असणारी दही भेंडी ऑर्डर करतो. अशी चटपटीत भेंडी खायला अतिशय टेस्टी आणि तयार करायला फारच (How To Make Dahi Bhendi At Home) सोपी अशी असते. अनेकदा आपण रेस्टोरंन्ट स्टाईलने दही भेंडी घरच्याघरीच करून देखील पाहतो, पण काहीवेळा ती पचपचीत किंवा चिकट होते. असे होऊ नये यासाठी, रेस्टोरंन्ट स्टाईल दही भेंडी घरच्याघरीच करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.

साहित्य :- 

१. भेंडी - १/२ किलो २. दही - १ कप ३. तेल - २ ते ३ टेबलस्पून ४. जिरे - १ टेबलस्पून ५. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून  ६. हळद - १ टेबलस्पून  ७. आमचूर पावडर - १ टेबलस्पून  ८. धणे पूड - १ टेबलस्पून  ९. गरम मसाला - १ टेबलस्पून  १०. बेसन - १ टेबलस्पून ११. मीठ - चवीनुसार १२. पाणी - गरजेनुसार १३. कसुरी मेथी - १ टेबलस्पून १४. धणे - १ टेबलस्पून१५. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली) 

क्षिती जोगला फार आवडते आजीच्या हातचे आंबट वरण! पाहा आंबट वरणाची पारंपरिक रेसिपी...

चांगल्या क्वालिटीचा गूळ विकत घेण्यासाठी पंकज भदौरिया सांगतात ३ टिप्स, निवडा योग्य गूळ...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी भेंडी स्वच्छ धुवून, पुसून घ्यावी. २. त्यानंतर या भेंडीचे थोडे मोठे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. ३. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात जिरे फोडणीला घालूंन मग त्यात चिरलेली भेंडी घालून तेलावर हलकेच परतून घ्यावी. ४ भेंडी तेलात चांगली परतून झाल्यावर त्यात लाल तिखट मसाला, हळद, आमचूर पावडर, धणे पूड, गरम मसाला असे सगळे मसाले घालून भेंडी मसाल्यात परतून व्यवस्थित कोट करून घ्यावी. 

पारंपरिक हुरडा थालीपीठ आवडतं, ‘असं’ हुरडा धिरडंही करुन पाहा, पोटभर-पौष्टिक खाण्याचं सुख...

५. एका बाऊलमध्ये दही घेऊन त्यात बेसन घालून दही आणि बेसन एकजीव करून घ्यावे. दही आणि बेसनाचे तयार मिश्रण या भेंडीत घालून भाजी व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यावी. ६. आता या भाजीत गरजेनुसार थोडे पाणी घालून घ्यावे. ७. मिक्सरच्या भांड्यात थोडे धणे आणि लाल तिखट मसाला घेऊन हे दोन्ही घटक एकत्रित वाटून त्याची जाडसर भरड करून घ्यावी.  ८. आता एका छोट्या भांड्यात तेल घेऊन ते गरम करावे. या गरम तेलात मिक्सरमध्ये जाडसर भरड करून घेतलेली धणे आणि लाल तिखट मसाल्याची पूड घालावी. ही तयार फोडणी भेंडीच्या भाजीत वरुन घालावी. आता भाजी एकदा चमच्याने हलवून सगळे जिन्नस एकजीव करून घ्यावेत. 

हॉटेल स्टाईल दही भेंडी खाण्यासाठी तयार आहे. चपाती, फुलका किंवा पराठ्यासोबत आपण ही दही भेंडी खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.