मसाला डोसा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येते ती बटाट्याची भाजी, लाल चटणी. (wheat flour dosa) डोसा खायला जितका सोपा असतो तितकं कठीण तो बनवणं. डोसा बनवण्यासाठी डाळ, तांदळाच्या प्रमाणापासून ते आंबवण्यापर्यंत अनेक प्रक्रिया करावी लागते.(crispy dosa recipe) डोसा बनवणे खरंतर वेळखाऊ काम पण जर झटपट डोसा बनवायचा असेल तर आपण गव्हाच्या पीठाचा वापर करु शकतो.(instant wheat dosa) गव्हाचे पीठ वापरुन बनवलेला हा डोसा कुरकुरीत तर होतोच पण त्याची चवही पांरपरिक डोशासारखीच अप्रतिम लागते. हा डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया.
साहित्य
गव्हाचे पीठ- १ कप
रवा - २ चमचे
मीठ - १/२ चमचा
दही - १/२ कप
पाणी - आवश्यकतेनुसार
बेकिंग पावडर - १/२ चमचा
कृती
1. सगळ्यात आधी आपल्याला एका भांड्यात गव्हाचे पीठ, रवा, मीठ, दही घालून चांगले फेटून घ्यावे लागेल. त्यात थोडे थोडे पाणी घाला नंतर सतत ढवळत राहा. पीठ पातळ व्हायला हवे याची काळजी घ्या. पीठात गुठळ्या ठेऊ नका. ५ मिनिटानंतर त्यात बेकिंग पावडर घालून पुन्हा नीट मिसळा.
2. मसाला बनवताना एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात हिंग, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि चिरलेले आले घाला. मोहरी तडतडल्यानंतर त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो घाला. यात हळद, लाल मिरची आणि मसाले, मीठ घालून चांगले परतवून घ्या. पाणी घालून उकडून मॅश केलेले बटाटे घाला. तयार होईल मसाला बटाटे.
3. डोसा बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर नॉनस्टिक पॅन ठेवावा लागेल. त्यावर थोडे तेल घालून गरम करा. पॅन गरम झाल्यावर गॅस स्लो करा, थोडे पाणी शिंपडा आणि कापडाने पुसून घ्या. आता पॅनवर बॅटर पसरवून घ्या. बाजून तेल पसरवा. ज्यामुळे कडा लवकर वेगळ्या होतील. वरुन बटाट्याची भाजी पसरवून घ्या. डोसा दोन्ही बाजूने कुरकुरीत झाल्यावर गॅस बंद करा.
