Join us  

भर उन्हाळ्यात आजीनं केलेल्या चिंच- गुळाच्या आमटीची पारंपरिक रेसिपी! करा आंबट- गोड बेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2024 9:19 AM

How To Make Chinch Gulachi Amti: त्याच त्या नेहमीच्या चवीचं वरण खाऊन कंटाळा आला असेल तर हा एक छानसा आंबट- गोड बेत करून पाहा. बघा चिंच- गुळाच्या आमटीची सोपी रेसिपी. (Maharashtrian amti recipe)

ठळक मुद्देउन्हाळ्यात ही रेसिपी एकदा करून पाहायलाच पाहिजे अशी आहे.

वरण हा रोजच्या स्वयंपाकातला अगदी अविभाज्य भाग. पाेळी, भात या दोन्हींसोबतही वरण आवडीने खाल्लं जातं. पण बऱ्याचदा वरणाच्या त्याच त्या रेसिपी खूप कंटाळवाण्या वाटतात. त्याच त्या नेहमीच्या चवीच्या वरणापेक्षा काहीतरी वेगळं, चटपटीत खावं वाटतं. अशावेळी चिंच- गुळाच्या आमटीची ही रेसिपी एकदा ट्राय करून पाहा (How to make amti or dal using tamarind). मऊ भात किंवा पोळी असं दोन्हींसोबत तुम्ही ते खाऊ शकता (How to make Chinch Gulachi Amti). उन्हाळ्यात ही रेसिपी एकदा करून पाहायलाच पाहिजे अशी आहे. (Maharashtrian amti recipe)

चिंच- गुळाची आमटी किंवा वरण करण्याची रेसिपी

 

चिंच गुळाची आमटी कशी करायची याची रेसिपी smitadeoofficial या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

साहित्य

१ वाटी तूर डाळ

चिमूटभर हिंग

फोडणीसाठी मोहरी, जिरे आणि तेल

उन्हाळ्यात डोक्यातून खूप कुबट वास येतो? १ उपाय - केसांमधली दुर्गंधी जाईल-कोंडाही होणार नाही

२ टेबलस्पून चिंचेचा कोळ

१ ते दिड टेबलस्पून गूळ

चवीनुसार तिखट आणि मीठ

१ टीस्पून गोडा मसाला

बघा समंथा प्रभुचं सुपरस्टायलिश ब्लाऊज कलेक्शन

१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

कडिपत्त्याची ८- १० पाने

१ टेबलस्पून खोबऱ्याचा किस

 

कृती

तुरीची डाळ ७ ते ८ तास भिजत ठेवा. यानंतर थोडासा हिंग आणि चिमूटभर हळद टाकून ती शिजवून घ्या.

आता शिजलेली तुरीची डाळ एका कढईमध्ये काढा आणि कढई गॅसवर गरम करायला ठेवा. या डाळीमध्ये तुम्हाला जेवढं वरण करायचं आहे, तेवढं पाणी टाका.

बटाट्याचे चिप्स लालसर- काळे पडतात?८ खास टिप्स, पांढरेशुभ्र होतील वेफर्स-वर्षभर टिकतील

त्यातच लाल तिखट, गोडा मसाला, पाहिजे असल्यास एखादी हिरवी मिरची, खोबऱ्याचा किस, चिंचेचा कोळ, गुळाचा खडा आणि गरजेनुसार मीठ घाला. 

आमटीला चांगली उकळी येऊ द्या.

घरगुती हेअर डाय बनविण्याची आजीबाईंची खास पद्धत- बघा पांढरे केस काळे करण्याचा नैसर्गिक उपाय

आमटीला उकळी येईपर्यंत एका छोट्या कढईमध्ये फोडणी तयार करा. त्या फोडणीमध्ये हिंग, हळद, लाल तिखट, कडिपत्त्याची पाने घाला आणि आमटी उकळल्यानंतर ही फोडणी आमटीमध्ये वरतून टाका.

सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि आमटीला पुन्हा एकदा चांगली उकळी येऊ द्या.

ही झाली आंबट- गोड चवीची चटपटीत आमटी तयार. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती