Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > शिळी झाली तरी कापसासारखी मऊ राहील चपाती! पीठ मळताना घाला २ सिक्रेट पदार्थ; चपाती होईल लुसलुशीत

शिळी झाली तरी कापसासारखी मऊ राहील चपाती! पीठ मळताना घाला २ सिक्रेट पदार्थ; चपाती होईल लुसलुशीत

soft chapati recipe: how to make soft chapati: chapati dough secrets: स्वयंपाकघरात असणारे दोन पदार्थ कणिक मळताना घातल्यास चपाती वातड होण्याऐवजी कापसासारखी मऊ राहिल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2026 15:14 IST2026-01-25T15:13:29+5:302026-01-25T15:14:39+5:30

soft chapati recipe: how to make soft chapati: chapati dough secrets: स्वयंपाकघरात असणारे दोन पदार्थ कणिक मळताना घातल्यास चपाती वातड होण्याऐवजी कापसासारखी मऊ राहिल.

how to make chapatis soft and fluffy at Home secret ingredients to keep chapati soft overnight why chapati becomes hard after cooling tips to make soft chapati for lunch box homemade chapati stays soft for hours | शिळी झाली तरी कापसासारखी मऊ राहील चपाती! पीठ मळताना घाला २ सिक्रेट पदार्थ; चपाती होईल लुसलुशीत

शिळी झाली तरी कापसासारखी मऊ राहील चपाती! पीठ मळताना घाला २ सिक्रेट पदार्थ; चपाती होईल लुसलुशीत

भारतीय ताटात रोज चपाती आवडीने खाल्ली जाते. चपातीशिवाय जेवण अपूर्णच. रोजच्या जेवणात चपातीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.(soft chapati recipe) रोज बनवली जाणारी चपाती मऊ राहत नाही, थोड्या वेळात कडक होते, शिळी झाली की खाण्यायोग्य राहत नाही अशा अनेक तक्रारी गृहिणी करत असतात. (how to make soft chapati)
सकाळी डबा भरताना किंवा प्रवासासाठी चपात्या करायच्या असतील तर त्या दिवसभर लुसलुशीत आणि मऊ राहणं फार गरजेचं असतं.(chapati dough secrets) अनेकजण बाजारातून रेडीमेड पीठ आणतात आणि त्याच्या चपात्या करतात. पण स्वयंपाकघरात असणारे दोन पदार्थ कणिक मळताना घातल्यास चपाती वातड होण्याऐवजी कापसासारखी मऊ राहिल. 

टक्कल पडलेल्या जागी केस उगवतील नव्याने; १० रुपयांचा घरगुती उपाय, वयाच्या पन्नाशीतही केस लांबसडक-घनदाट, वाढतील भरपूर

कणिक मळताना फक्त साध पाणी वापरण्याऐवजी त्यात थोडंसं कोमट दूध घातल्यास चपातीचा पोत बदलतो. दुधात असणारे नैसर्गिक फॅट आणि प्रथिने पीठात मुरतात, ज्यामुळे चपाती कोरडी न पडता मऊ राहते. आपण कणिक मळताना अर्ध दूध आणि पाणी घालू शकतो. 

पीळ मळून झाल्यानंतर त्यात एक किंवा दोन चमचे तेल किंवा तूप घाला आणि पुन्हा मळा. ज्यामुळे कणिक कडक होण्याऐवजी ती लवचिक होईल. यामुळे लाटताना चपाती तुटत नाही किंवा भाजल्यानंतर देखील ती मऊ राहते. तूप वापरल्यास चवही छान येते. 

चपाती मऊ- लुसलुशीत करण्यासाठी कणिक मळण्याची पद्धत देखील तितकीच महत्त्वाची आहे. कणिक एकदम घट्ट न मळता थोडं सैल ठेवावं. मळलेलं कणिक किमान १५ ते २० मिनिटं झाकून ठेवणं आवश्यक आहे. यामुळे पीठ नीट फुलून पोळ्या मऊ राहतात. 

चपाती भाजताना तवा योग्य प्रमाणात तापलेला हवा. चपाती मंद आचेवर भाजल्यास कोरडी होते, तर फास्ट गॅसवर भाजल्यास कडक होते. त्यासाठी मध्यम आचेवर भाजल्यास चांगली फुलते आणि मऊ देखील राहते. 
 

Web Title : नरम चपाती का राज: दूध और घी से पाएं लंबे समय तक मुलायमपन

Web Summary : नरम चपाती पाने के लिए आटा गूंथते समय गरम दूध और घी मिलाएं। थोड़ा ढीला आटा गूंथें, 20 मिनट के लिए आराम दें और मध्यम आंच पर पकाएं। इन सरल चरणों से आपकी चपाती घंटों तक नरम और स्वादिष्ट बनी रहेगी।

Web Title : Soft Chapati Secrets: Milk and Ghee for Long-Lasting Softness

Web Summary : Achieve soft chapatis by adding warm milk and ghee while kneading the dough. Knead to a slightly loose consistency, rest for 20 minutes, and cook over medium heat for best results. These simple steps ensure your chapatis remain soft and delicious for hours.