Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > किलोभर गाजराचे करा कापसाहून मऊ गुलाबजाम, १५ मिनिटांत होतील, तोंडात टाकताच विरघळतील - चवीलाही मस्त

किलोभर गाजराचे करा कापसाहून मऊ गुलाबजाम, १५ मिनिटांत होतील, तोंडात टाकताच विरघळतील - चवीलाही मस्त

Gajar gulab jamun: Carrot gulab jamun recipe: Instant gulab jamun: पाहूया गाजराचे गुलाबजाम कसे करायचे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2025 16:15 IST2025-12-15T16:08:23+5:302025-12-15T16:15:28+5:30

Gajar gulab jamun: Carrot gulab jamun recipe: Instant gulab jamun: पाहूया गाजराचे गुलाबजाम कसे करायचे.

How to make carrot gulab jamun at home easily Soft and spongy gajar gulab jamun recipe Instant gulab jamun without mawa using carrots | किलोभर गाजराचे करा कापसाहून मऊ गुलाबजाम, १५ मिनिटांत होतील, तोंडात टाकताच विरघळतील - चवीलाही मस्त

किलोभर गाजराचे करा कापसाहून मऊ गुलाबजाम, १५ मिनिटांत होतील, तोंडात टाकताच विरघळतील - चवीलाही मस्त

हिवाळ्यात बाजारात सगळीकडे आपल्याला गाजर पाहायला मिळते. बाजारात लालचुटूक गाजरांची रेलचेल असते. अशावेळी घरोघरी सुगंध दरवळतो तो लालचुटूक गाजराच्या हलव्याचा.(Gajar gulab jamun) प्रत्येक घरात गाजराचा हलवा, कोशिंबीर, सूप असे विविध पदार्थ बनतात.(Carrot gulab jamun recipe) पण याच गाजरांपासून आपल्याला गुलाबजाम देखील करता येतील. याची चव इतकी भारी की पारंपरिक पद्धतीने केलेले माव्याचे गुलाबजाम देखील फिके पडतात. (Instant gulab jamun)
गुलाबजाम म्हटलं की मैदा, खोया, तळणं डोळ्यांसमोर येते. पण गाजराचे गुलाबजाम हे हलके, मऊसुत, नैसर्गिकरित्या गोड आणि वेगळ्या चवीचे असतात.(Homemade gulab jamun) दिसायला आकर्षित आणि पण चवीला वेगळे लागतात. गाजरांमधील नैसर्गिक साखर, रंग आणि चवीमुळे या गुलाबजामला खास ओळख मिळते.(Indian sweet recipe) दिसायलाही आकर्षक असल्यामुळे सण-समारंभ, पाहुण्यांची खास बेत किंवा घरच्या घरी काहीतरी नवीन करायचं असेल, तर हा पर्याय उत्तम ठरतो. पाहूया गाजराचे गुलाबजाम कसे करायचे. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. 

हिवाळ्यात खा पौष्टिक डिंकाचे लाडू, योग्य प्रमाण- महिनाभर टिकतील, कंबरदुखी-सांधेदुखीवरही बहुगुणी, पाहा रेसिपी

साहित्य 

किसलेला गाजर - ४०० ग्रॅम
दूध - ३ कप 
साखर - १ कप 
तूप - १ चमचा 
रवा - १/४ कप 
वेलची पावडर - १ चमचा 
दूध पावडर - १/४ कप 
केशर काड्या - २ ते ३
खवा - १/४ कप 
पिस्त्याचे काप - आवश्यकतेनुसार 

कृती 

1. सगळ्यात आधी गाजर धुवून त्याचे साल काढून घ्या. त्यानंतर त्याचे तुकडे करुन वाटून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात वाटलेले गाजर, दूध, साखर घालून त्याची बारीक पेस्ट तयार करा. 

2. गॅसवर कढई गरम करुन त्यात तूप घाला. मिक्सरमधील गाजरचे मिश्रण घालून त्यातील पाणी पूर्णपणे सुकू द्या. त्यात रवा, खवा आणि वेलची पावडर घाला. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करा. थंड झाल्यानंतर मिश्रणाचे गोळे तयार करा. 

3. रबडी बनवण्यासाठी आपल्याला एका भांड्यात दूध गरम करुन त्यात दूध पावडर घालून चमच्याने ढवळावे लागेल. त्यानंतर साखर आणि केशर घाला. वरुन खवा, ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड घाला. दूध घट्ट् झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात तयार केलेले गुलाबजाम ५ ते १० मिनिटे ठेवा. तयार होईल मऊसुत गुलाबजाम. चवीलाही अगदी मस्त. 
 


Web Title : गाजर का गुलाब जामुन: 15 मिनट में, मुँह में घुल जाने वाला

Web Summary : गाजर का गुलाब जामुन पारंपरिक मिठाई का एक अनूठा, प्राकृतिक रूप से मीठा विकल्प है। यह रेसिपी कद्दूकस किए हुए गाजर, दूध और कुछ अन्य सामग्रियों का उपयोग करके एक नरम, स्वादिष्ट व्यंजन बनाती है, जो त्योहारों या विशेष घरेलू मिठाई के लिए एकदम सही है।

Web Title : Make soft carrot gulab jamun in 15 minutes, melts instantly.

Web Summary : Carrot gulab jamun offers a unique, naturally sweet alternative to traditional versions. This recipe uses grated carrots, milk, and a few other ingredients to create a soft, delicious treat, perfect for festivals or a special homemade dessert.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.