Lokmat Sakhi >Food > कॅफेस्टाईल कोल्ड कॉफीची झकास रेसिपी! विकतची महागडी कॉफी वाटेल फिकी

कॅफेस्टाईल कोल्ड कॉफीची झकास रेसिपी! विकतची महागडी कॉफी वाटेल फिकी

How To Make Cafe Style Cold Coffee At Home?: कोणतंही महागडं मशिन न वापरता घरच्याघरी अगदी विकतसारखी कोल्ड कॉफी करता येते.. त्याचीच ही एकदम सोपी रेसिपी..(most simple recipe of making cold coffee)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2025 18:09 IST2025-04-10T15:44:33+5:302025-04-11T18:09:48+5:30

How To Make Cafe Style Cold Coffee At Home?: कोणतंही महागडं मशिन न वापरता घरच्याघरी अगदी विकतसारखी कोल्ड कॉफी करता येते.. त्याचीच ही एकदम सोपी रेसिपी..(most simple recipe of making cold coffee)

how to make cafe style cold coffee at home, most simple recipe of making cold coffee, cold coffee recipe in 5 steps | कॅफेस्टाईल कोल्ड कॉफीची झकास रेसिपी! विकतची महागडी कॉफी वाटेल फिकी

कॅफेस्टाईल कोल्ड कॉफीची झकास रेसिपी! विकतची महागडी कॉफी वाटेल फिकी

Highlightsथोडं चॉकलेट सिरप आणि थोडी कॉफी पावडर घालून सर्व्ह करा.. बघा कॉफी किती मस्त लागेल.

उन्हाळा म्हटला की कोल्ड कॉफी हवीच.. कॉफी लव्हर लोकांचा तर हा एक अतिशय आवडीचा पदार्थ. पण जे लोक एरवी वर्षभर फारशी कॉफी घेत नाहीत, त्यांनाही उन्हाळ्यात मात्र कोल्ड कॉफी घ्यायला भारी आवडतं.. उन्हामुळे पाणी पाणी होत असताना थंडगार कोल्ड कॉफीचा सावकाशपणे आस्वाद घेत बसणं यासारखं सूख नाही... आता दरवेळी एखाद्या कॅफेमध्ये जाऊन महागडी कोल्ड कॉफी घेणं काही शक्य नाही. त्यामुळे घरीच अगदी सोप्या पद्धतीने कोल्ड कॉफी कशी करायची ते पाहा (How To Make Cafe Style Cold Coffee At Home?).. या काॅफीची चव एवढी मस्त जमून येते की ती प्यायल्यानंतर तुम्हाला कधीच कोल्ड कॉफी पिण्यासाठी महागड्या कॅफेमध्ये जाण्याची गरज वाटणार नाही.(most simple recipe of making cold coffee)

 

कॅफेस्टाईल कोल्ड कॉफी करण्याची रेसिपी

साहित्य

१ चमचा चॉकलेट सिरप

२ ग्लास दूध

रोज १ लवंग चावून खा! फायदे वाचाल तर न विसरता नियमितपणे खाल, बघा कमाल

३ टेबलस्पून काॅफी पावडर

४ टेबलस्पून साखर

व्हॅनिला आईस्क्रिम

 

कृती

सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये चॉकलेट सिरप घ्या आणि त्यात दूध घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्या.

यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये कॉफी पावडर, साखर आणि अगदी थोडे गरम दूध घाला. आता हे तिन्ही पदार्थ व्हिस्क वापरून चांगले फेटून घ्या. जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होऊन फुलून येत नाही, तोपर्यंत ते फेटत राहावे. यासाठी तुम्ही ब्लेंडरचा वापरही करू शकता..

करण जोहरने ओजेम्पिक डाएट करून वजन घटवलं? आहारतज्ज्ञ सांगतात  ते करणं कोणासाठी चांगलं..

आता एक छानसा स्टायलिश ग्लास घ्या. त्यामध्ये चॉकलेट सिरप थोडे शिंपडल्यासारखे करा.. यामुळे तुमचा काॅफीचा ग्लास अगदी कॅफेप्रमाणे मस्त सजलेला दिसेल. यानंतर त्यामध्ये थंड दूध आणि ब्लेंड केलेली कॉफी घाला. यावर आता व्हॅनिला आईस्क्रिमचा एक स्कूप ठेवा. त्यावर थोडं चॉकलेट सिरप आणि थोडी कॉफी पावडर घालून सर्व्ह करा.. बघा कॉफी किती मस्त लागेल 

 

Web Title: how to make cafe style cold coffee at home, most simple recipe of making cold coffee, cold coffee recipe in 5 steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.