>फूड > ताकातली खिचडी..रात्रीच्या जेवणासाठी खास वन डिश मिल! टेस्टी- हेल्दी फाॅर्म्युला

ताकातली खिचडी..रात्रीच्या जेवणासाठी खास वन डिश मिल! टेस्टी- हेल्दी फाॅर्म्युला

खिचडीचा असाच एक चविष्ट आणि आरोग्यदायी प्रकार म्हणजे ताकातली खिचडी. हा प्रकार अजून इतका रूळला नसल्यानं हा खिचडीचा प्रकार नवीन वाटू शकतो. पण भारतात विविध ठिकाणी ताकातली खिचडी केली जाते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 05:36 PM2022-01-21T17:36:03+5:302022-01-21T17:45:15+5:30

खिचडीचा असाच एक चविष्ट आणि आरोग्यदायी प्रकार म्हणजे ताकातली खिचडी. हा प्रकार अजून इतका रूळला नसल्यानं हा खिचडीचा प्रकार नवीन वाटू शकतो. पण भारतात विविध ठिकाणी ताकातली खिचडी केली जाते.

How To Make Buttermilk Khichadi: Khichadi in Buttermilik is Special one dish meal for dinner! Tasty - Healthy formula | ताकातली खिचडी..रात्रीच्या जेवणासाठी खास वन डिश मिल! टेस्टी- हेल्दी फाॅर्म्युला

ताकातली खिचडी..रात्रीच्या जेवणासाठी खास वन डिश मिल! टेस्टी- हेल्दी फाॅर्म्युला

Next
Highlightsताकातली खिचडी प्रकार नवीन वाटला तरी भारतात अनेक ठिकाणी ताकातली खिचडी केली जाते. ताकातली खिचडी करण्याची एकच एक पध्दत नाही. दोन ते तीन पध्दतीने ताकातली खिचडी केली जाते. ताकातली खिचडी करताना गाजर , फ्लाॅवर या  भाज्या आणि साजूक तूप हवंच!

जेवायला काय? असं उत्साहानं आपल्याला घरातल्यांनी विचारलं आणि आपण खिचडी म्हटल्यावर जर त्यांनी खिचडी ऐकून तोंड वाकडं केलं असेल तर आपल्याला वाईट वाटतं. पण जर नेहमी खिचडी म्हणून जर एकाच प्रकारची खिचडी आपण करत असू तर अशाच प्रतिक्रिया मिळणार हे नक्की!

Image: Google

खिचडी हा जरी नरम गरम तब्येतीला पचणारा हलका प्रकार असला तरी खिचडी हा वन डिश मिल प्रकार पोषण मुल्यांचा खजिना म्हणून ओळखला जातो. आपल्या भारतात खिचडी हा केवळ एक खाद्य प्रकार नसून ती एक आरोग्यदायी संस्कृती मानली जाते. 5000 वर्षांपूर्वी खिचडी या खाद्यप्रकारचा शोध लागला आणि नंतर खिचडी केवळ आपल्या देशातच नव्हे तर भारतीय खिचडी जगभरात प्रसिध्द झाली. खाद्यपदार्थात सर्वात जास्त प्रयोग खिचडीच्या बाबतीतच करण्यात आले. अर्थात खिचडीचा शोधही स्वयंपाकाच्या प्रयोगातूनच लागला. पण खिचडी करताना झालेल्या अनेक प्रकारांमुळे खिचडीचे चविष्ट आणि पौष्टिक प्रकार आज उपलब्ध आहे. या खिचडीची चव संस्कृती, हवामान, माती, शेती, प्रदेश, खाद्य संस्कृती यानुसार बदलते तशीच खिचडीची चव ही प्रत्येक घरानुसार देखील बदलते. इतक्या वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळे जिन्नस, जास्त मसाले, कमी मसाले, बिना मसाले वापरुन, डाळी-साळी- विविध तृणधान्यं वापरुन, भाज्या, फळं वापरुन खिचडी केली जाते. खिचडीकडे एक आरोग्यदायी प्रयोग, चवींचा प्रयोग म्हणून पाहिलं तर अजूनही खिचडीत अनंत प्रयोग करता येतील इतका खिचडी हा प्रकार प्रयोगासाठी मनमोकळा आहे.  

Image: Google

खिचडीचा असाच एक चविष्ट आणि आरोग्यदायी प्रकार म्हणजे ताकातली खिचडी. हा प्रकार अजून इतका रूळला नसल्यानं हा खिचडीचा प्रकार नवीन वाटू शकतो. पण भारतात विविध ठिकाणी ताकातली खिचडी केली जाते. उत्तम चवीची ही ताकातली खिचडी करताना गाजर, फ्लाॅवर या दोन  भाज्या आवश्यक असतात. या दोन भाज्यांसोबत आपल्या आवडीच्या कोणत्याही भाज्या ताकातली खिचडी करताना वापरता येतात. या खिचडीसाठी अख्खे मसाले मोजकेच लागतात. ताकातली खिचडी ही दोन तीन प्रकारे केली जाते.  त्यानुसार या खिचडीसाठी थोडं बेसनपीठही लागतं. तेलाऐवजी साजूक तुपात केलेली ही खिचडी चविष्ट आणि पौष्टिक होते. 

Image: Google

कशी करायची ताकातली खिचडी

ताकातली खिचडी करण्यासाठी दीड कप अख्खे मूग ( 3 ते 4 तास आधी भिजवलेले),  अडीच कप ताक, 1 कप तांदूळ ( अर्धा तास भिजवून निथळून घेतलेले) , 1 ते 2 चमचे साजूक तूप, 1 चमचा जिरे,  3-4 लवंगा, अर्धा कप मध्यम आकाराच्या गाजराच्या फोडी, अर्धा कप फ्लाॅवरचे तुकडे, 3-4 हिरव्या मिरच्या ( मिरच्या कमी करुन थोडं लाल तिखटही वापरावं.) , हळद, कढीपत्ता, कोथिंबीर, आवडत असल्यास गरम मसाला आणि मीठ घ्यावं. 

खिचडी करताना कुकरमधे आधी तूप घालून ते तापवावं. तूप तापलं की त्यात जिरे , लवंगा घालाव्यात. ते तडतडले की त्यात हिरव्या मिरच्या घालून त्या परतून घ्याव्यात.कढीपत्ता घालावा. हवा असल्यास आणि कांदा उभा किंवा बारीक चिरुन तोही घालता येतो.  नंतर गाजर, फ्लाॅवर या भाज्या घालून त्या परताव्यात. यात हळद घालावी. हळदी नंतर या खिचडीत तिखट आणि गरम मसाला घालायचा असल्यास तो घालावा.  मग तांदूळ घालून ते हलक्या हातानं दोन मिनिटं परतावेत. तांदूळ परतले की त्यात ताक घालावं. मिश्रण चांगलं हलवून घ्यावं. मीठ टाकून मिश्रण पुन्हा हलवावं. कुकरला झाकण लावून मोठ्या आचेवर कुकरला दोन शिट्या घ्याव्यात. नंतर गॅसची आच मंद करुन खिचडी 8-10 मिनिटं शिजवावी. गॅस बंद केल्यावर कुकरची वाफ पूर्ण जिरु द्यावी. मग कुकर उघडून कोथिंबीर घालावी आणि खिचडी तूप घालून गरम गरम खावी. 

Image: Google

दुसऱ्या पध्दतीनं खिचडी करताना आख्ख्या मुगाऐवजी मूग किंवा तूरडाळ वापरावी.  कांदा , वाटल्यास लसूण आल्याची पेस्ट घालून डाळ तांदूळ परतून आधी पाणी घालून कुकरला दोन शिट्या घ्याव्यात. नंतर कुकर उघडून त्यात ताकात थोडं बेसन मिसळून मग ते खिचडीत घालून पुन्हा खिचडी मंद आचेवर 8- 10 मिनिटं होवू द्यावी. नंतर गॅस बंद करुन कुकरचं झाकण उघडून वरुन गरम मसाला घालून खिचडी हलवावी. ही खिचडीही छान लागते. 

  

Web Title: How To Make Buttermilk Khichadi: Khichadi in Buttermilik is Special one dish meal for dinner! Tasty - Healthy formula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

Tutti Frutti Recipe: मुलांना आवडणारी टुटीफ्रुटी आता झटपट करा घरीच, टरबुजाच्या सालाचा बघा खास वापर  - Marathi News | Food And Recipe: How to make tutti frutti from water melon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना आवडणारी टुटीफ्रुटी आता झटपट करा घरीच, टरबुजाच्या सालाचा बघा खास वापर 

Tutti Frutti Recipe: आईस्क्रिम, केक यामध्ये दिसणारी आणि जवळपास सगळ्याच लहान मुलांना आवडणारी टुटीफ्रुटी घरच्याघरी करणं अगदीच सोपं आहे.. बघा ही खास रेसिपी ...

आंबा खाऊन वजन वाढण्यासह उष्णतेचा त्रास, पोट बिघडण्याची भीती वाटते? ७ उपाय, आंबा बाधणार नाही - Marathi News | Worried about weight gain and heat problem by eating mango? 7 special tips, weight and heat both will get controlled | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंबा खाऊन वजन वाढण्यासह उष्णतेचा त्रास, पोट बिघडण्याची भीती वाटते? ७ उपाय, आंबा बाधणार नाही

Proper Method of Eating Mango: दररोज आंबा खाऊनही वजन (weight) आणि शरीरातील उष्णता (heat) दोन्हीही कंट्रोलमध्ये राहू शकतं... त्यासाठीच या काही खास टिप्स ...

Purity Of Paneer: पनीरमधली भेसळ कशी ओळखाल? ५ टिप्स, पौष्टिकच्या नावाखाली खराब पनीर खाण्याचा धोका टाळा - Marathi News | Purity Of Paneer: How to identify adulteration in Paneer? 5 Tips, Avoid the risk of eating bad paneer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पनीरमधली भेसळ कशी ओळखाल? ५ टिप्स, पौष्टिकच्या नावाखाली खराब पनीर खाण्याचा धोका टाळा

5 Steps To Check The Purity Of Paneer: हेल्दी, पौष्टिक म्हणून आपण पनीर खातो. पण त्याच्या नावाखाली भलतंच काही पोटात जात असेल तर ते वेळीच ओळखता यायला हवं.. म्हणूनच पनीरमध्ये असणारी भेसळ ओळखण्यासाठी या काही टिप्स..( adulteration in Paneer) ...

How To Grow Tej Patta Plant At Home : घरीच सोप्या पद्धतीनं तमालपत्राचं रोप लावा; कोणत्याही खर्चाशिवाय मिळेल भरपूर तमालपत्र - Marathi News | How To Grow Tej Patta Plant At Home : How do you grow bay leaves at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरीच सोप्या पद्धतीनं तमालपत्राचं रोप लावा; कोणत्याही खर्चाशिवाय मिळेल भरपूर तमालपत्र

How To Grow Tej Patta Plant At Home : जर तुम्हाला बागकामाची आवड असेल, तर तुम्ही घरी एका भांड्यात तमालपत्राची रोपे सहजपणे वाढवू शकता. (Bay Leaf Farming Information Guide) ...

ओट्स-भात कटलेट; परफेक्ट नाश्त्याची चविष्ट सोय, सिक्रेट रेसिपी कुणाला सांगू नका.. - Marathi News | Oats-rice cutlets; tasty Perfect Breakfast, try this Secret Recipe .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओट्स-भात कटलेट; परफेक्ट नाश्त्याची चविष्ट सोय, सिक्रेट रेसिपी कुणाला सांगू नका..

उरलेल्या भाताचं काय करायचं असा प्रश्न असतो, त्यात ओट्स घालून केलेले हे कटलेट्स हातोहात संपतील. ...

आज खायला काय स्पेशल करणार? उत्तर हवं तर करा ४ स्पेशल चमचमीत पदार्थ - Marathi News | What's special about eating today? If you want the answer, do 4 special recipes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आज खायला काय स्पेशल करणार? उत्तर हवं तर करा ४ स्पेशल चमचमीत पदार्थ

तीच ती भाजी पोळी खाऊन आणि करुन कंटाळा आल्यावर करता येतील असे पोटभरीचे पदार्थ; घरातील सगळेच होतील खूश ...