Join us

२ मिनिटांत करा विकतसारखं बटर, हवं फक्त चमचाभर तूप- बघा एकदम सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2025 17:25 IST

Homemade Butter Recipe: तुपाचा वापर करून बाजारात विकत मिळतं तसं बटर करणं अतिशय सोपं आहे (How to make butter from ghee?). बघा त्यासाठी नेमकं काय करावं लागतं...

ठळक मुद्दे ही रेसिपी करण्यासाठी आपण कोणतेही केमिकल्स वापरत नाही. त्यामुळे लहान मुलांनाही ते तुम्ही अगदी बिंधास्त खाऊ घालू शकता.

बऱ्याचदा असं होतं की आपण सॅण्डविच करण्याचा किंवा पावभाजी करण्याचा बेत आखतो. त्यासाठी आपण पुर्ण तयारीही करतो. आणि मग शेवटी लक्षात येतं की ब्रेडला किंवा सॅण्डविचला लावण्यासाठी आपल्याकडे बटरच नाही. अशावेळी दुकान जवळच असले तरीही घराबाहेर पडून दुकानात जाऊन बटर आणण्याचा भारी कंटाळा येतो. बटरशिवाय त्या पदार्थाला चव येतच नाही. म्हणूनच आता अशावेळी घरच्याघरी बटर तयार करण्याचा हा एक सोपा उपाय पाहून घ्या (Homemade Butter Recipe). कधी कधी बटर घरात नसताना हा उपाय तुमच्या नक्कीच उपयोगाला येऊ शकतो.(How to make butter from ghee?)

 

विकतसारखं बटर तयार करण्याची रेसिपी

तुपापासून अगदी बाजारात विकत मिळतं तसं बटर करणं अगदी सोपं आहे. शिवाय ही रेसिपी करण्यासाठी आपण कोणतेही केमिकल्स वापरत नाही. त्यामुळे लहान मुलांनाही ते तुम्ही अगदी बिंधास्त खाऊ घालू शकता.

रमजान ईद: शीरखुर्म्याची खास रेसिपी, चवीला लाजवाब आणि तब्येतीसाठी उत्तम...

तुपापासून बटर तयार करायचं असेल तर सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये साधारण एक ते दोन वाट्या तूप घ्या आणि ते फेटून एकसारखं करून घ्या.

या तुपामध्ये आता बर्फाचे ४ ते ५ तुकडे टाका. बर्फाचे तुकडे घरात नसतील तर तुम्ही त्यामध्ये फ्रिजमधलं थंडगार पाणीही टाकू शकता.

 

तूप आणि बर्फाचे तुकडे हे मिश्रण साधारण एक ते दिड मिनिट फेटून घ्या. तूप थोडं घट्ट झाल्यासारखं जाणवेल. यानंतर या मिश्रणामध्ये चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ घाला.

चैत्रगौर डेकोरेशनसाठी खास आयडिया- सगळ्यांपेक्षा आकर्षक होईल तुमच्या घरची सजावट

सगळं पुन्हा एक ते दिड मिनिटासाठी व्यवस्थित फेटून घ्या. त्यानंतर काही वेळातच अगदी विकतसारखं घट्ट बटर तयार झालेलं दिसेल..

हे बटर एखाद्या एअरटाईट डब्यात भरून काही मिनिटांसाठी फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवू शकता. अगदी विकत मिळतं तसं घट्ट बटर तयार होईल. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती