Join us
Daily Top 2Weekly Top 5

घरीच तयार करा विकतपेक्षाही चवदार बटर, चमचाभर तूपात 'हा' पदार्थ घाला- १० मिनिटांत बटर तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2025 16:29 IST

How To Make Butter From Ghee At Home: विकत मिळतं तसं बटर घरच्याघरीच अगदी झटपट तयार करायचं असेल तर पुढे सांगितलेली रेसिपी ट्राय करून पाहा..

ठळक मुद्देकोणताही पदार्थ करताना तुम्ही विकतचं बटर आणण्यापेक्षा हेच बटर वापरू शकता. पदार्थांना खूप छान चव येईल.

बटर हा पदार्थ आपल्याला वेगवेगळ्या भाज्यांमध्ये लागतो. पंजाबी भाज्या केल्या की त्यात बटर हवंच असतं. शिवाय पावभाजी, गार्लिक ब्रेड, चीज ब्रेड, सॅण्डविच असे कोणतेही प्रकार करायचे असतील तरी बटर लागतंच..बऱ्याचदा आपल्या घरात ते असेलच असं नाही. म्हणूनच घरच्याघरी अगदी १० मिनिटांत अतिशय चवदार बटर कसं तयार करायचं ते पाहूया.. हे बटर विकतच्या तुलनेत अगदी कमी पैशांत तयार होतं आणि शिवाय त्यात कोणतेही प्रिझर्व्हेटीव्ह किंवा केमिकल्सही नसतात. त्यामुळे ते बाहेरच्या बटरपेक्षा नक्कीच जास्त आरोग्यदायी ठरू शकतं.(How To Make Butter From Ghee At Home?)

 

तुपापासून बटर कसं तयार करायचं?

बाहेर जे बटर मिळतं त्यासाठी कोणतं तूप वापरलं जातं हे आपल्याला माहिती नसतं. म्हणूनच तुम्ही नेहमी खाता तेच भरवश्याचं तूप विकत आणा आणि त्याच्यातलंच थोडंसं तूप बाजुला काढून त्याचं बटर करून खा..

Champa Shashti 2025 : चंपाषष्ठीला हवंच झणझणीत वांग्याचं भरीत, घ्या अस्सल पारंपरिक रेसिपी-भरीत भाकरीचा नैवैद्य

साहित्य

१ वाटी तूप

चिमूटभर हळद

१ टीस्पून मीठ

बर्फाचे ५ ते ६ क्यूब

कृती

 

बटर तयार करण्यासाठी एका पसरट भांड्यामध्ये अर्धी वाटी तूप घाला. त्यात चिमूटभर हळदही घाला. बाजारात विकत मिळणाऱ्या बटरला थोडी सॉल्टी टेस्ट असते. त्यासाठी तुपामध्ये थोडंसं मीठसुद्धा घाला. आता बर्फाचे ५ ते ६ तुकडेही तुपामध्ये घाला आणि हे मिश्रण चमचाने अगदी जलदपणे एकाच दिशेने फिरवा.

थंडीत ज्येष्ठमधाची काडी चघळा आणि केसांनाही लावा, जावेद हबीब सांगतात काळ्याभोर केसांचा उपाय

५ ते ६ मिनिटांतच बटर तयार झालेलं जाणवेल. ते अधिक घट्ट होण्यासाठी मिश्रण आणखी थोडे मिनिट फिरवा. नंतर मिश्रण चांगलं घट्ट झाल्यानंतर उरलेले बर्फाचे तुकडे त्यातून काढून टाका आणि हे तयार झालेलं बटर एअर टाईट डब्यात घालून फ्रिजमध्ये ठेवून द्या. कोणताही पदार्थ करताना तुम्ही विकतचं बटर आणण्यापेक्षा हेच बटर वापरू शकता. पदार्थांना खूप छान चव येईल.   

English
हिंदी सारांश
Web Title : Make delicious butter at home in 10 minutes with ghee!

Web Summary : Prepare flavorful butter at home in just 10 minutes using ghee, turmeric, salt, and ice. This homemade butter is healthier, preservative-free, and adds a rich taste to dishes like Pav Bhaji and garlic bread.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.