Join us
Daily Top 2Weekly Top 5

हलवाईकडे मिळते तशी परफेक्ट बुंदी घरीच करण्याची एकदम सोपी रेसिपी, बुंदी लगेच करून पाहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2026 14:28 IST

How to Make Boondi at Home?: बुंदी घरी तयार करणं अवघड वाटत असेल तर पुढे सांगितलेली एक सोपी रेसिपी पाहा आणि चटकन घरीच बुंदी करून बघा..(easy recipe of making boondi)

बुंदीचे लाडू हा अनेकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. बुंदीचे लाडू तर छान लागताच, पण अनेकांना गरमागरम बुंदी खायलाही खूप आवडतं. तुम्हीही बुंदीचे चाहते असाल तर हलवाईच्या दुकानात मिळते त्याहूनही छान आणि अतिशय उत्तम दर्जाची बुंदी घरीच करून खा. बुंदी तयार करण्याची रेसिपी अतिशय सोपी आहे आणि मुख्य म्हणजे अगदी मोजक्या पदार्थांमध्ये ती तयार होते. शिवाय बुंदी तयार करण्यासाठी आधीपासूनच खूप काही तयारी करण्याची गरजही नसते (How to Make Boondi at Home?). त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने अतिशय झटपट बुंदी कशी करायची ते पाहुया..(easy recipe of making boondi)

बुंदी करण्याची रेसिपी

 

साहित्य

१ वाटी बेसन

२ वाट्या साखर

चमचाभर दह्यात घाला चिमूटभर हळद, त्वचेला मिळतील ५ जादुई फायदे, पाहा नेमकं करायचं काय

अर्धा टीस्पून बेकिंग सोडा

सुगंधासाठी केशर, वेलची

तळण्यासाठी तेल आणि खाण्याचा केशरी रंग

कृती

 

सगळ्यात आधी तर एका भांड्यात १ वाटी बेसन घ्या. त्यात थोडा बेकिंग सोडा घाला आणि अर्धी वाटी पाणी घालून हे मिश्रण मिक्सरमध्ये काही सेकंद फिरवून घ्या.

यानंतर साखरेचा पाक करण्यासाठी गॅसवर पातेले गरम करायला ठेवा. त्यामध्ये २ वाट्या साखर आणि दिड वाटी पाणी घाला. चवीसाठी केशर, वेलची पूडही घालू शकता.

कुंडीतल्या रोपांना विकतच्या खताची गरजच पडणार नाही, घ्या घरगुती उपाय- रोपांच्या सगळ्या तक्रारी गायब

तसेच छान रंग येण्यासाठी केशरी रंगही घाला. पाकाला उकळी आल्यानंतर साधारण एखाद्या मिनिटाने गॅस बंद करा.

त्यानंतर झाऱ्याचा वापर करून गरम तेलामध्ये बुंदी पाडून ती तळून घ्या आणि तळलेली बुंदी गरम असताना लगेचच साखरेच्या पाकात घाला. पाकात छान मुरली की बुंदी खाण्यासाठी तयार. हवी तर तशीच खा किंवा तिचे लाडू वळून खा. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Easy Boondi Recipe: Make perfect, halwai-style boondi at home instantly.

Web Summary : Craving boondi? Make perfect, halwai-style boondi at home with this easy recipe! This recipe requires minimal ingredients and preparation. Fry boondi and soak in sugar syrup. Enjoy it as is or make ladoos!
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.