lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > दाणेदार - रवाळ तोंडात टाकताच विरघळणारे बेसन लाडू बनवण्यासाठी ९ टिप्स, लाडू होतील परफेक्ट...

दाणेदार - रवाळ तोंडात टाकताच विरघळणारे बेसन लाडू बनवण्यासाठी ९ टिप्स, लाडू होतील परफेक्ट...

How to make perfect besan laddu : बेसनाचे लाडू सगळ्यांनाच आवडतात पण ते बनवताना होणाऱ्या कॉमन चुका टाळा, लाडू होतील झक्कास..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2023 09:00 AM2023-11-02T09:00:15+5:302023-11-02T09:05:01+5:30

How to make perfect besan laddu : बेसनाचे लाडू सगळ्यांनाच आवडतात पण ते बनवताना होणाऱ्या कॉमन चुका टाळा, लाडू होतील झक्कास..

How to Make Besan Ladoo, How To Make Perfect Besan Laddu | दाणेदार - रवाळ तोंडात टाकताच विरघळणारे बेसन लाडू बनवण्यासाठी ९ टिप्स, लाडू होतील परफेक्ट...

दाणेदार - रवाळ तोंडात टाकताच विरघळणारे बेसन लाडू बनवण्यासाठी ९ टिप्स, लाडू होतील परफेक्ट...

दिवाळीत (Diwali 2023) प्रत्येक घरात आवर्जून फराळ बनवला जातो. फराळामधे जरी आपले सगळेच पदार्थ आवडीचे असले तरीही लाडू वर आपले विशेष प्रेम असते. फराळाचे ताट समोर आले की आपण त्यातून हमखास सर्वात आधी बेसनाचा लाडू (Homemade Besan Ladoo) उचलतो. बेसनाचे लाडू म्हटल्यावर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटत. हे बेसनाचे लाडू अगदी परफेक्ट झाले तर लाडूचा डब्बा अगदी झटपट रिकामी होतो. पण तेच फराळाचा कोणताही पदार्थ फसला की तो खायला नकोसे वाटते(How to make perfect besan laddu).

बेसनाचे लाडू (Diwali Sweets Recipe) हे घरांतील सगळ्यांच्याच आवडीचे असल्यामुळे ते परफेक्ट बनवलेच पाहिजे, याची मोठी जबाबदारी गृहिणीवर असते. परंतु असे असले तरीही लाडू बनवताना आपण काही बेसिक लहान - सहान चुका करतोच. ज्यामुळे अथक प्रयत्न करुनही लाडू (Diwali Faral) फसतात. असे होऊ नये म्हणून बेसनाचे लाडू परफेक्ट बनवण्यासाठी काही खास टिप्स फॉलो करुयात(How To Make Perfect Besan Laddu).      

१. बेसन पिठात गुठळ्या राहू नये म्हणून... 

बेसन पिठात गुठळ्या राहू नयेत म्ह्णून लाडू बनवण्यासाठी बेसन भाजताना ते सतत चमच्याने ढवळत राहावे. यामुळे बेसन पिठात गुठळ्या राहत नाहीत. एवढे करून सुद्धा गुठळी राहिलीच तर एक पेला घेऊन त्याच्या पृष्ठभागाने दाब देत पिठातील गुठळ्या मोडून घ्याव्यात. 

२. लाडू खाताना तो टाळूला चिकटू नये म्हणून... 

लाडू खाताना काहीवेळा बेसन आपल्या टाळूला चिकटते, बेसन व्यवस्थित भाजले गेले नाही तर असे होते. यामुळे लाडू बनवताना बेसन व्यवस्थित भाजून घ्यावे. बेसन भाजताना जर ते व्यवस्थित भाजले गेले नाही तर ते टाळूला चिकटते. गॅसच्या मंद आचेवर चमच्याने सारखे ढवळत राहून बेसनाचा खरपूस भाजल्याचा जोपर्यंत सुगंध येत नाही तोपर्यंत बेसन भाजून घ्यावे. 

३. भाजलेले बेसन पातळ होऊ नये म्हणून... 

गरम भाजलेल्या बेसनामध्ये साखर, तूप किंवा पाक अगदी लगेच घातल्यास हे जिन्नस लगेच विरघळतात आणि बेसनचे मिश्रण पातळ होते. यामुळे लाडू नीट  बांधता येत नाहीत. त्यामुळे असं अजिबात करू नका. आधी बेसनाला थोडं थंड होऊ द्या त्यानंतरच त्यात साखर, तूप किंवा पाक घालावा. 

दिवाळीच्या सुटीत मुलं म्हणणारच आई आज काय स्पेशल ? पालक - मेथी पुऱ्यांची घ्या झटपट रेसिपी-खुसखुशीत खाऊ...

४. लाडूला परफेक्ट रंग यावा म्हणून... 

लाडू बनवल्यावर काहीवेळा त्याचा रंग पूर्णपणे गडद होतो. असे होऊ नये म्हणून बेसन चांगले भाजून झाल्यावर गॅस बंद करा आणि गॅस बंद केल्यानंतरही बेसन सतत ढवळत राहा. अशावेळी भांडे खूप गरम असते आणि जर आपण बेसन ढवळणे बंद केले तर बेसन खालून करपून त्याचा रंग गडद होऊ शकतो. असे झाल्यास जेव्हा आपण त्यात तूप मिसळू तेव्हा आपले सर्व लाडू गडद रंगाचे होतील. लाडूला परफेक्ट रंग येण्यासाठी ही टीप लक्षात ठेवा. 

५. लाडू नीट बांधता येत नसतील तर... 

लाडू बांधत असताना बेसन थोडे गरमच असू द्यावे. यामुळे लाडू पटापट बांधले जातात व त्यांचा आकार व्यवस्थित एकसारखा येण्यास मदत होते. बेसन जास्त थंड होऊ देऊ नका. अगदी थंड बेसनात पाक मिसळल्याने मिश्रण व्यवस्थित तयार होत नाही आणि लाडू बांधताना ते विखुरले जातात. लाडू नीट बांधता येण्यासाठी मिश्रणात थोडं तूप गरम करून नीट मिसळा यामुळे लाडू सहज बांधले जातील.   

६. लाडू बनवल्यानंतर ते कडक होऊ नयेत म्हणून... 

गरम बेसन पिठात पाक घालून मिक्स केले तर ते पातळ होते आणि नंतर थंड झाल्यावर त्यापासून लाडू बनवले तर ते घट्ट होऊन थोडे कडक लाडू बनू शकतात. याउलट लाडू बनवून ते दीर्घकाळ टिकण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवले तरी ते कडक होतात. त्यामुळे बेसन पिठात पाक मिसळून घेताना बेसन पीठ एकदम थंड किंवा गरम नसून ते साधारणतः मध्यम गरम असावे. 

मेथीची भाजी कडवट होते ? ९ गोष्टी - मेथीची भाजी होईल एकदम चमचमीत - कडू अजिबात लागणार नाही...

दिवाळीत खा - खा फराळ खाऊन वजन वाढू नये म्हणून लक्षात ठेवा या ६ गोष्टी, खा पोटभर...

७. लाडूत रंग मिसळणार असाल तर... 

लाडूंना पिवळा - सोनेरी रंग येण्यासाठी बेसनाच्या मिश्रणात पिवळा फूड कलर घालू शकता किंवा त्यात थोडी हळदसुद्धा मिक्स करु शकता. 

८. बेसनाचा कच्चेपणा दूर करण्यासाठी... 

लाडू बनवण्यासाठी बेसन कच्चे राहू नये म्हणून बेसन नेहमी मंद आचेवरच भाजून घ्यावे. बेसन कधीही मोठ्या आचेवर भाजू नये. असे केल्याने भांड्यातील  काही भागांतील बेसन जास्त भाजले जाते तर काही भागातील बेसन कमी भाजले जाते. यामुळे बेसन कच्चे राहण्याची शक्यता असते. यामुळे बेसन मंद आचेवर सारखे चमच्याने ढवळत राहून भाजून घ्यावे. 

९. बेसनाचे लाडू अधिक आकर्षक दिसावेत म्हणून... 

बेसनाचे लाडू बांधण्यासाठी काहीजण वरुन तूप मिसळतात. असे अजिबात करू नका, यामुळे लाडूंची चव खराब होऊ शकते. याचबरोबर लाडू अधिक आकर्षक दिसावेत म्हणून त्यावर आपल्या आवडीप्रमाणे काजू, बेदाणे, मनुके लावून घ्यावेत.

Web Title: How to Make Besan Ladoo, How To Make Perfect Besan Laddu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.