मसाला डोसा, प्लेन डोसा, चीज डोसा असे डोशाचे वेगवेगळे प्रकार जसे अनेकांना आवडतात तसाच आणखी एक प्रकार खूप प्रसिद्ध आहे आणि तो म्हणजे बेन्ने डोसा. बेन्ने डोसा करताना तो खालच्या बाजुने थोडा क्रिस्पी असतो पण वरच्याबाजुने मऊ असतो. या डोशाला थोडं जास्त प्रमाणात बटर लावलेलं असतं. हा डोसा अनेकांना अतिशय आवडतो. म्हणूनच बेन्ने डोसा जर घरीच तयार करायचा असेल तर त्यासाठी १५ मिनिटांचा वेळ पुरेसा आहे. कारण डाळ- तांदूळ भिजत न घालता तो अगदी सहज आणि झटपट करता येतो (Instant Benne Dosa Recipe). मुलांच्या डब्यासाठी तसेच नाश्त्यासाठीही बेन्ने डोसा हा एक उत्तम पदार्थ आहे. बघा त्याचीच ही सोपी रेसिपी...(benne dosa or ghee poda dosa in just 15 minutes)
इंस्टंट बेन्ने डोसा रेसिपी
१ वाटी रवा
१ चमचा बेसन
१ चमचा गव्हाचे पीठ
थंडीमुळे त्वचा कोरडी पडून चेहरा भुरकट दिसतो? चेहऱ्यावर शिंपडा 'हे' पाणी, त्वचा हायड्रेटेड राहील
२ चमचे साखर
१ टीस्पून इनो
चवीनुसार मीठ
२ चमचे साखर
१ चमचा तूप
कृती
बेन्ने डोसा करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा, दही, बेसन, गव्हाचे पीठ, मीठ आणि साखर असे सगळे पदार्थ घाला.
थोडंसं पाणी घालून हे सगळे पदार्थ मिक्सरमधून एखाद्या मिनिटासाठी अगदी बारीक फिरवून घ्या. ते चांगले एकजीव झाले पाहिजेत आणि पीठ मऊसूत झालं पाहिजे.
थंडी पडताच केस कोरडे झाले, कोंडाही वाढला? 'या' पद्धतीने काेरफड लावा- केस होतील मऊ, सिल्की
यानंतर हे बॅटर एका भांड्यामध्ये घाला. त्यामध्ये इनो घाला. गरज वाटल्यास पुन्हा थोडं पाणी घाला. पण पीठ पातळ होणार नाही याची काळजी घ्या. कारण पीठ घट्ट असेल तरच डोसा खालच्या बाजुने क्रिस्पी होईल. आता ५ मिनिटांसाठी हे पीठ झाकून ठेवा.
त्यानंतर तव्याला तेल किंवा तूप लावून त्याचे नेहमीसारखे डोसे करा. बेन्ने डोसाला जास्त तूप लावलेलं असतं. त्यामुळे त्याला वरच्या बाजुने भरपूर बटर लावा. तसेच पोडी मसाला असेल तर तो घालून तुम्ही घी- पोडी डोसाही करू शकता. एकदा नक्की ट्राय करून पाहा ही झटपट होणारी रेसिपी
