उन्हाळा सुरू झाला की आईस्क्रिम, कुल्फी, मिल्कशेक, वेगवेगळे ज्यूस, उसाचा रस असे पदार्थ हमखास लागतातच.. शिवाय या दिवसांत ते पदार्थ खाऊन त्रासही होत नाही. त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळेच त्यावर ताव मारतात. याच यादीतला सगळ्यांना आवडणारा आणखी एक पदार्थ म्हणजे बर्फाचा गोळा. लहान मुलांसकट सगळ्यांनाच तो आवडतो. पण बऱ्याचदा गाड्यावर विकत मिळणारा बर्फ गोळा खायला नको वाटतं. कारण त्यासाठी कोणतं पाणी वापरलं असेल ते सांगता येत नाही. म्हणूनच बर्फ गोळा मनापासून आवडत असेल आणि तो घरीच ट्राय करून पाहायचा असेल तर पुढे सांगितलेली एक सोपी रेसिपी पाहा..(how to make barf gola or ice gola at home?)
बर्फाचा गोळा घरीच करण्याची रेसिपी
ही रेसिपी अतिशय सोपी आहे. यासाठी तुम्हाला बर्फ तर लागणारच आहे, पण त्यासोबतच १ कप साखर, अर्धा कप पाणी आणि एका लिंबाचा रस लागेल.
पौष्टिक म्हणून ‘या’ भाज्या भरपूर खाणं म्हणजे पोटाच्या आजारांना आमंत्रण, १ चूक पोटाला ताप
सगळ्यात आधी तर एक पातेले घ्या. त्यामध्ये साखर, पाणी आणि लिंबाचा रस घाला. साखर पाण्यात विरघळल्यानंतर ते पाणी गॅसवर गरम करायला ठेवा आणि ते उकळून घ्या. खूप जास्त उकळवू नये. पाक थंड झाला की त्यात थोडं मीठ घाला. हा झाला बर्फ गोळ्याचा पाक तयार.
आता फ्रिजमध्ये सेट केलेले बर्फाचे तुकडे घ्या. ते मिक्सरमध्ये घालून क्रश करून घ्या. यानंतर ते दाबून एखाद्या छोट्या ग्लासमध्ये भरा. त्यात आईस्क्रिमची काडी घाला. आणि गोळा सेट करून घ्या.
काही केल्या सुटलेलं पोट कमीच होत नाही? 'हा' सोपा व्यायाम करा, १५ दिवसांत फरक दिसेल
आता जो पाक किंवा शुगर सिरप तयार केलेले आहे त्यात तुमच्या आवडीचा कोणताही फ्लेवर घाला. रुहअफ्झा, पायनॅपल, खस असे वेगवेगळे क्रश बाजारात मिळतात. त्यापैकी तुमच्या आवडीचं क्रश सिरपमध्ये घालून गोळ्यावर टाका. मस्त गारेगार आईस गोला तयार. एकदा करून खाऊन पाहा.
Web Summary : Beat the heat with homemade ice gola! This easy recipe uses simple ingredients like sugar, lemon, and your favorite flavored syrup. Crush ice, shape it, and enjoy a refreshing treat.
Web Summary : घर पर बर्फ का गोला बनाकर गर्मी को मात दें! इस आसान रेसिपी में चीनी, नींबू और आपकी पसंदीदा फ्लेवर्ड सिरप जैसी सरल सामग्री का उपयोग होता है। बर्फ को क्रश करें, आकार दें और एक ताज़ा आनंद लें।