हिवाळा सुरु झाला की शरीराला उबदार, पौष्टिक आणि ताकद देणाऱ्या पदार्थांची सगळ्यात जास्त गरज असते. थंडीच्या दिवसात आपली ऊर्जा लवकर खर्च होते.(Bajra halwa recipe) ज्यामुळे स्नायूंवर ताण, हाडं दुखणे, सांधेदुखीचा त्रास किंवा थकवा अधिक जाणवतो. (Winter special bajra halwa) अशा वेळी आपल्याला रोज नाश्त्यात काही तरी गरम, पौष्टिक आणि पोटभरीचे पदार्थ हवे असतात. बदलेल्या जीवनशैलीनुसार आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो.(Healthy millet dessert)
हिवाळ्यात आपल्या आहारात बाजरी, ज्वारी, नाचणीसारखे पदार्थ खाल्ले जातात. याची भाकरी, खिचडी किंवा पुलाव खाल्ला जातो.(Bajra sweet recipe) पण कधी बाजरीचा हलवा खाल्ला आहे का? हिवाळ्यात सूपरफूड म्हणून ओळखला जाणारा बाजरीचा हलवा हा अगदी बेस्ट पर्याय ठरतो. बाजरीमध्ये भरपूर कॅल्शियम, आयर्न, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि प्रोटीन असतं. (Jaggery bajra halwa)ज्यामुळे हाडांना बळकटी मिळते. शरीर गरम राहतं, पचनसंस्था सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. हलवा जितका चविष्ट असतो तितकाच तो आरोग्यासाठी चांगला. बाजरीचा पौष्टिक हलवा कसा बनवायचा पाहूया.
लग्नात नवरीची हेअरस्टाइल सजवणारे ५ जबरदस्त स्टायलिश हेअर ब्रोच- नजर हटू नये इतके सुंदर आणि स्पेशल
साहित्य
तूप - १ कप
बाजरीचे पीठ - १ कप
गूळ - १ कप
गरम पाणी - दीड कप
ड्रायफ्रुट्स
सुंठ पावडर - १ चमचा
वेलची पावडर - अर्धा चमचा
कृती
1. सगळ्यात आधी कढई गरम करुन त्यात तूप घाला. नंतर त्यात बाजरीचे पीठ घालून व्यवस्थित भाजून घ्या. पीठ भाजताना त्यात चमचा ढवळत राहा. रंग बदलोस्तोवर पीठ भाजत राहा.
2. यानंतर त्यात पाणी घालून पुन्हा ढवळून घ्या. बाजरीचे पीठ व्यवस्थित शिजेपर्यंत ढवळत राहा. रंग बदल्यानंतर त्यात गूळ, सूठ पावडर घालून ढवळा. गूळ वितळल्यानंतर त्यात वेलची पूड, ड्रायफ्रुट्स घालून पुन्हा ढवळा. तयार होईल गरमागरम पौष्टिक बाजरीचा हलवा.
