Join us

विकतसारखा बदामशेक घरीच करा, घ्या एकदम सोपी रेसिपी- उन्हाळ्यात प्यायलाच हवा हा गारेगार शेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2025 16:41 IST

How To Make Badam Shake At Home: बाहेर आईस्क्रिमच्या गाडीवर मिळतो तसा बदाम शेक आता घरीच करण्याची ही बघा एकदम सोपी रेसिपी.(easy and simple recipe of making almond shake)

ठळक मुद्देथंड झालेले दूध आणखी चांगले सेट होण्यासाठी २ ते ३ तास फ्रिजमध्ये ठेवून द्यावे. यानंतर मग त्यावर काजू, बदाम, पिस्ताचे तुकडे आणि थोडे केशर घालून सर्व्ह करावे.. 

उन्हाळा म्हटलं की गारेगार पदार्थ कसे मनसोक्त खाता येतात. सर्दी होईल, शिंकाच येतील, घसा खवखवेल असं टेन्शन अजिबात नसतं. त्यामुळे आईस्क्रिम, कुल्फी, वेगवेगळे सरबत असं सगळं उन्हाळ्यात खाता- पिता येतं.. या यादीतच येणारा आणखी एक पदार्थ म्हणजे बदाम शेक.. बदाम शेक अनेकांच्या आवडीचा. हा शेक एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन पिण्यापेक्षा रस्त्याच्या कडेला ज्या गाड्या असतात, त्यावर जाऊन पिणंच अनेकांना आवडतं..(how to make badam shake at home?) तुम्हीही त्याच चवीच्या बदाम शेकचे शौकिन असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा (summer special badam shake recipe). रेसिपी खूप सोपी आहे आणि शिवाय त्यासाठी कोणतीही पुर्वतयारी करण्याची गरज नाही.(easy and simple recipe of making badam shake)

बदाम शेक करण्याची रेसिपी

 

साहित्य 

१ लीटर दूध

दिड चमचा कस्टर्ड पावडर

पाण्यात भिजवलेले १५ ते २० बदाम 

१ टीस्पून जायफळ पावडर

उन्हाळ्यासाठी उत्तम घरगुती फेसपॅक- केळीच्या सालींमध्ये 'हा' पदार्थ मिसळून लावा, टॅनिंग निघून जाईल 

१ टीस्पून वेलची पावडर

८ ते १० केशराच्या काड्या

१ टेबलस्पून काजू आणि पिस्त्याचे तुकडे

अर्धी वाटी साखर

 

कृती 

सगळ्यात आधी तर गॅसवर दूध गरम करायला ठेवा आणि ते थोडंसं आटेपर्यंत उकळवून घ्या.

डॉ. जगन्नाथ दीक्षित सांगतात 'या' पद्धतीने जेवा; शुगर वाढणार नाही- वजनही राहील नियंत्रणात

दूध जरा आटलं आहे असं लक्षात आल्यानंतर त्यामध्ये साखर घाला. तसेच एका रुम टेम्परेचरवर असणाऱ्या दुधामध्ये कस्टर्ड पावडर कालवा आणि ती ही हळूहळू आटवलेल्या दुधात घाला. यावेळी दूध हलवत राहा जेणेकरून त्यामध्ये गाठी होणार नाहीत.

 

यानंतर ८ ते १० तास पाण्यात भिजवलेले बदाम दूध किंवा पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या आणि त्याची पेस्ट आटवलेल्या दुधामध्ये घाला. याच दुधात आता वेलची पावडर, जायफळ पावडर आणि केशर घाला. आता गॅस बंद करा आणि दूध थंड होऊ द्या.

गार्डनिंगची हौस, पण मोकळी जागाच नाही? ४ टिप्स- छोट्याशा बाल्कनीत लावता येतील भरपूर रोपं..

थंड झालेले दूध आणखी चांगले सेट होण्यासाठी २ ते ३ तास फ्रिजमध्ये ठेवून द्यावे. यानंतर मग त्यावर काजू, बदाम, पिस्ताचे तुकडे आणि थोडे केशर घालून सर्व्ह करावे.. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.समर स्पेशल