Join us

इंस्टंट नूडल्स खाऊन मुलं होतात लठ्ठ? घरीच करा आटा नूडल्स, कणकेच्या नूडल्स बनविण्याची भन्नाट ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2024 16:20 IST

How To Make Atta Noodles At Home: लहान मुलांना बाजारात मिळणाऱ्या मैद्याच्या इंस्टंट नूडल्स खाऊ घालायला नको वाटतं ना, म्हणूनच आता घरच्याघरी या आटा नूडल्स करा...(simple recipe of making atta noodles)

ठळक मुद्देमुलांना आवडीचा पदार्थ खाल्ल्याचं समाधान आणि तुम्हाला मुलांना पौष्टिक खाऊ घातल्याचा आनंद...

नूडल्स म्हटलं की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच अतिशय आवडतात. नूडल्स नावाच्या चायनिज पदार्थाने आपल्याकडच्या खवय्यांना वेड लावलं आहे. त्यामुळेच तर घरीही आपण इंस्टंट नूडल्सचे पॅकेट आणून ठेवतो. पण त्यामध्ये मैदा असतो. त्यामुळे आपल्या किंवा मुलांच्या आरोग्यासाठी त्या चांगल्या नाहीतच. म्हणूनच तर आता आटा नूडल्स करण्याची ही एकदम सोपी रेसिपी पाहून घ्या आणि यापुढे मुलांनी कधीही नूडल्स मागितल्या तर या कणकेच्या नूडल्स करून त्यांना खाऊ घाला (how to make atta noodles at home).. मुलांना आवडीचा पदार्थ खाल्ल्याचं समाधान आणि तुम्हाला मुलांना पौष्टिक खाऊ घातल्याचा आनंद...(simple recipe of making atta noodles)

 

घरच्याघरी आटा नूडल्स कशा करायच्या?

घरच्याघरी गव्हाच्या पिठाच्या आटा नूडल्स कशा तयार करायच्या याविषयीचा व्हिडिओ मास्टरशेफ पंकज भदोरिया यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

भोपळ्याची भाजी नको? गरमागरम सूप करून प्या! अतिशय चवदार- पौष्टिक, चटकन बघा रेसिपी

साहित्य

२ कप कणिक

१ टीस्पून मीठ

१ टेबलस्पून तेल

 

कृती

सगळ्यात आधी मीठ टाकून कणिक मळून घ्या. कणिक खूप सैलसर मळू नका. पुऱ्या करण्यासाठी मळतो तशी थोडी घट्ट असावी.

कणिक मळून झाल्यानंतर ती १० ते १२ मिनिटांसाठी झाकून ठेवा.

डोक्यात सतत नको ते विचार येतात? छोट्या गोष्टींचाही ताण येतो? मन शांत होण्यासाठी बघा उपाय

यानंतर एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवा. मळून घेतलेल्या कणकेचा मध्यम आकाराचा गोळा घ्या आणि त्याची गोलाकार पोळी लाटा. पोळी खूप पातळ लाटू नये. 

आता लाटून झालेली पोळी कढईतल्या उकळत्या पाण्यात सोडा आणि साधारण एखाद्या मिनिटासाठी ती पाण्यात तशीच राहू द्या.

यानंतर पोळी पाण्यातून काढून घ्या आणि ती थोडी थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर सुरीने तिचे नूडल्ससारखे अगदी बारीक काप करा आणि त्यांना व्यवस्थित तेल लावून घ्या. जेणेकरून ते काप एकमेकांना चिकटणार नाहीत. 

आता नेहमीप्रमाणे करतो तशा वेगवेगळ्या भाज्या, सॉस, आलं- लसूण पेस्ट टाकून नूडल्स करा. पौष्टिक आटा नूडल्स तयार.. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.