Lokmat Sakhi >Food > नॉनस्टिक तवा नसेल तर, नेहमीच्या तव्याला करा इन्स्टंट पद्धतीने नॉनस्टिक! स्वयंपाक होईल झटपट...

नॉनस्टिक तवा नसेल तर, नेहमीच्या तव्याला करा इन्स्टंट पद्धतीने नॉनस्टिक! स्वयंपाक होईल झटपट...

How to Make Any Pan Non Stick : Turn any pan into a non-stick pan now with this simple hack : Turn Any Pan Non-Stick in 30 Seconds : How To Make Any Pan Non Stick : Simple Method to Make Your Frying Pan Non Stick : नेहमीच्या वापरातील तव्याला इन्स्टंट पद्धतीने मिनिटभरात नॉनस्टिक कसे करायचे याची भन्नाट ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2025 10:21 IST2025-06-07T07:53:28+5:302025-06-07T10:21:20+5:30

How to Make Any Pan Non Stick : Turn any pan into a non-stick pan now with this simple hack : Turn Any Pan Non-Stick in 30 Seconds : How To Make Any Pan Non Stick : Simple Method to Make Your Frying Pan Non Stick : नेहमीच्या वापरातील तव्याला इन्स्टंट पद्धतीने मिनिटभरात नॉनस्टिक कसे करायचे याची भन्नाट ट्रिक...

How to Make Any Pan Non Stick Turn any pan into a non-stick pan now with this simple hack Simple Method to Make Your Frying Pan Non Stick | नॉनस्टिक तवा नसेल तर, नेहमीच्या तव्याला करा इन्स्टंट पद्धतीने नॉनस्टिक! स्वयंपाक होईल झटपट...

नॉनस्टिक तवा नसेल तर, नेहमीच्या तव्याला करा इन्स्टंट पद्धतीने नॉनस्टिक! स्वयंपाक होईल झटपट...

आपल्या स्वयंपाक घरात काही भांडी अशी असता जी नेहमी हमखास वापरली जातात. या खास भांड्यांच्या वापराने किचनमधील काम आणि  झटपट कोणताही पदार्थ (How to Make Any Pan Non Stick) करणे सोपे जाते. शक्यतो आजकाल बऱ्याचप्रमांणात नॉनस्टिक भांडीच (Turn any pan into a non-stick pan now with this simple hack) वापरली जातात. नॉनस्टिक भांडयांमध्ये अन्नपदार्थ कमी तेलात अगदी पटकन तयार करता येतो, याचबरोबर पदार्थच करपत नाही किंवा भांड्यांच्या तळाशी (Turn Any Pan Non-Stick in 30 Seconds) चिकटून बसत नाही. नॉनस्टिक तवा (How To Make Any Pan Non Stick) असेल तर पराठे, डोसे किंवा थालीपीठ करताना ते तळाशी चिकटून बसण्याची अडचण येत नाही. परंतु काहीवेळा आपल्याकडील नॉनस्टिक तत्वाचे कोटिंग सततच्या वापराने निघून जाते किंवा नॉनस्टिक तव्यावरील विशिष्ट प्रकारचा थर हा निघून गेल्याने अशी भांडी वापरण्यायोग्य राहत नाही(Simple Method to Make Your Frying Pan Non Stick).

कोटिंग निघालेल्या नॉनस्टिक भांड्यात जर आपण कोणताही पदार्थ केला तर तो हमखास भांड्यांच्या तळाशी चिकटून बसतो. अशावेळी अशा भांड्यात पदार्थ करणे कठीण होऊन बसते. यासाठीच, जर तुमच्याकडील नॉनस्टिक तवा किंवा भांड कोटिंग निघून खराब झालं असेल तर आपल्या नेहमीच्या तव्याला देखील इन्स्टंट पद्धतीने मिनिटभरात नॉनस्टिक करता येऊ शकते. नेहमी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी किंवा अ‍ॅल्युमिनियमच्या तव्याला जर तुम्ही योग्य पद्धतीने तयार केलं, तर तोही नॉनस्टिकसारखेच  काम करू शकतो. यामुळे स्वयंपाक करणे अधिक सोपे होईल. नेहमीच्या वापरातील तव्याला इन्स्टंट पद्धतीने मिनिटभरात नॉनस्टिक कसे करायचे याची भन्नाट ट्रिक पाहूयात. 

 नेहमीच्या वापरातील तव्याला इन्स्टंट पद्धतीने नॉनस्टिक कसे करायचे ? 

 पद्धत १ :- सर्वातआधी नेहमीच्या वापरातील लोखंडी किंवा अ‍ॅल्युमिनियम तवा घ्या. त्यानंतर हा तवा नेहमीप्रमाणे गॅसच्या मध्यम आचेवर व्यवस्थित गरम करून घ्यावा. तवा व्यवस्थित गरम झाल्यावर त्यावर २ ते ३ टेबलस्पून तेल ओतावे. हे तेल देखील हलका धूर  येईपर्यंत व्यवस्थित गरम करून घ्यावे. त्यानंतर हे गरम झालेले तेल एका बाऊलमध्ये काढून घ्यावे. त्यानंतर तवा पुन्हा गॅसच्या मध्यम आचेवर ठेवून त्यावर हाताने थोडे पाणी घेऊन शिंपडून घ्यावे. त्यानंतर जास्तीचे पाणी टिश्यू पेपरने पुसून घ्यावे. आपला नेहमीचा लोखंडी किंवा अ‍ॅल्युमिनियमचा तवा नॉनस्टिक झाला असेल, आता आपण हा तवा नॉनस्टिक म्हणून वापरु शकता. अशा तव्यावर पराठे, डोसे किंवा थालीपीठ करताना ते तळाशी चिकटून बसत नाही. अशा ही एक सोपी ट्रिक वापरून आपण आपल्या नेहमीच्या लोखंडी किंवा अ‍ॅल्युमिनियमच्या तव्याला मिनिटभरात इन्स्टंट पद्धतीने नॉनस्टिक करु शकता.     

कौतुकानं लोणचं घातलं पण महिनाभरात त्यात अळ्या-बुरशी? आजीच्या ३ पारंपरिक टिप्स-लोणचं टिकेल वर्षभर...

शिळ्या भाताचा करा मस्त मऊ हलका ढोकळा, फोडणीच्या भातापेक्षा भारी आणि होतो झटपट...

पद्धत २ :- तव्यावर एक चमचा भरून साधं मीठ घाला आणि मध्यम आचेवर ५ ते ७ मिनिटं परतून घ्या. हे मीठ तव्याच्या उष्णतेचा स्तर समतोल ठेवण्यास आणि तव्याचा चिकटपण दूर करण्यास मदत करते. मग मीठ फेकून द्या. त्यानंतर तव्यावर तेल घालून ते संपूर्ण तव्यावर पसरवून हलकेच टिश्यू पेपरच्या मदतीने चोळा. तेलाचा थर तवा नॉनस्टिक करण्यासाठी मदत करतो. तेल लावलेला तवा मध्यम आचेवर २ ते ३ मिनिटं गरम करा. यामुळे तेल तव्याच्या छिद्रांमध्ये शोषले जाईल आणि त्याचा एक थर तयार होईल. तवा थोडा थंड होऊ द्या आणि मग हा तवा आपण नॉनस्टिक म्हणून वापरु शकता. प्रत्येक वापरानंतर तवा नीट कोरडा करून ठेवा आणि वेळोवेळी वरील प्रक्रिया पुन्हा करा, म्हणजेच तवा कायम नॉनस्टिकसारखा वापरता येईल.


Web Title: How to Make Any Pan Non Stick Turn any pan into a non-stick pan now with this simple hack Simple Method to Make Your Frying Pan Non Stick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.